Home » Budget : निर्मला सीतारमण यांचा क्लासी ‘बजेट लूक’

Budget : निर्मला सीतारमण यांचा क्लासी ‘बजेट लूक’

by Jyotsna Kulkarni
0 comment
Budget
Share

आज १ फेब्रुवारी रोजी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचे बजेट संसदेमध्ये सादर केले. निर्मला सीतारामन यांनी त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. त्यांच्या या विक्रमाची आणि यंदाच्या बजेटमध्ये कोणाला काय मिळणार याची सगळीकडेच चर्चा रंगलेली दिसली. मात्र यासोबतच सोशल मीडियावर अजून एक चर्चा चांगलीच होताना दिसत आहे, आणि ती म्हणजे निर्मला सीतारामन यांनी नऊ अर्थसंकल्प सादर करताना नेसलेल्या साड्यांची. निर्मला सीतारामन यांनी दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना नेसलेल्या वेगवेगळ्या साड्यांमधून भारतीय हातमाग, पारंपरिक कला आणि साधेपणाचा संदेश दिला. त्यांनी कायमच यांच्या या साड्यांमधून भारताच्या संस्कृतीची झलक दाखवत हातमागाला प्रोत्साहन दिले आहे. त्यांचा यंदाचा अर्थसंकल्पीय लूक कमालीचा गाजत असून, त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जाणून घेऊया निर्मला सीतारामन यांच्या नऊ लुकबद्दल. (Budget)

२०२६ अर्थसंकल्प
निर्मला सीतारामन यांनी यंदाचा २०२६ चा अर्थसंकल्प सादर करताना तामिळनाडूची मॅजेंटा रंगाची कट्टम कांजीवरम रेशमी साडी नेसली होती. या कांजीवरम साडीवर सोनेरी रंगाचे कट्टम असून, तिला कॉफी-ब्राउन रंगाची किनार आणि त्यावर नाजूक धाग्याचे काम आहे. त्यांनी यासोबत पिवळ्या रंगाचा, पूर्ण बाह्यांचा साधा ब्लाउज परिधान केला होता. ही कांजिवरम साडी तामिळनाडूची आहे. (Todays Marathi Headline)

Budget

२०२५ अर्थसंकल्प
२०२५ सालाचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पारंपारिक मत्स्य आकृतीनी सजवलेली पांढरी मधुबनी साडी निवडली. पद्मश्री पुरस्कार विजेत्या मधुबनी कलाकार दुलारी देवी यांनी ही साडी त्यांना भेट दिली होती. ही साडी बिहारच्या समृद्ध लोककलांना उजाळा देते आणि हातमाग परंपरेला जोरदार प्रोत्साहन देते. या साडीवर माशांच्या थीमवरील हाताने केलेले नाजूक काम आणि सोनेरी रंगाची बॉर्डर होती, ज्यामुळे ती अत्यंत सुबक आणि वेगळी भासत होती. (Top Marathi Headline)

Budget

२०२४ अर्थसंकल्प
२०२४ सालाचा अर्थसंकल्प सादर करताना वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी पांढऱ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली होती, ज्याला जांभळ्या आणि सोनेरी रंगाची बॉर्डर होती. हलके रंग आणि पारंपरिक सिल्कचा पोत यामुळे ही साडी केवळ आकर्षकच दिसत नव्हती, तर भारतीय हातमाग आणि सिल्क उद्योगाला सन्मान देण्याचा संदेशही देत होती. ही साडी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात बनवली जाते. ती तिच्या साध्या डिझाइन, आकर्षक लूक आणि स्वच्छ बॉर्डरसाठी ओळखली जाते. (Latest Marathi News)

Budget

२०२३ अर्थसंकल्प
२०२३ सालाचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी २०२३ मध्ये काळ्या आणि टेंपल बॉर्डर्स असलेली लाल रेशीम साडी परिधान केली होती. कसूती धाग्याच्या नाजूक कामाची विण दिसत होती. ही दक्षिण भारतीय शैलीचे प्रतीक मानली जाते. साडीच्या डिझाइनमध्ये रथ, मोर आणि कमळाची फुले समाविष्ट होती. निर्मला सीतारमण यांनी ही साडी कर्नाटकातील इल्कल विणकाम कंपनीची नेसली होती. (Top Marathi Headline)

Budget

२०२२ अर्थसंकल्प
२०२२ सालाचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी गडद तपकिरी बोमकाई साडी परिधान केली होती. ओडिशातील गंजम जिल्ह्यातील बोमकाई गावात बनवलेली, त्यावर चांदीची जरीकाम आणि आकर्षक बॉर्डर पॅटर्न होता. ही साडी गंजम जिल्ह्याच्या समृद्ध कलात्मक वारशाचे प्रतिबिंबित करते. ही साडी परिधान करून निर्मला सीतारमण यांनी ओडिशाच्या हातमाग परंपरेचा सन्मान केला. (Top Marathi News)

Budget

२०२१ अर्थसंकल्प
२०२१ सालाचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी तेलंगणाची रंगीत पोचमपल्ली इकत साडी परिधान केली होती. ही साडी लाल आणि ऑफ-व्हाइट सिल्कची होती, ज्याला हिरव्या रंगाची बॉर्डर होती. पोचमपल्लीची नाजूक सिल्क विण आणि पारंपरिक डिझाइन अतिशय आकर्षक होती. (Latest Marathi Headline)

Budget

२०२० अर्थसंकल्प
२०२० सालाचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी पिवळ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली होती, ज्याला हिरव्या रंगाचा बॉर्डर होता. पिवळा रंग वाढ, आशा आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. (Top Stories)

Budget

========

Budget : भारतीय अर्थसंकल्पाशी संबंधित रंजक गोष्टी

Budget : सर्वाधिक वेळा बजेट सादर करणारे अर्थमंत्री

========

२०१९ अर्थसंकल्प
२०१९ साली निर्मला सीतारमण यांनी त्यांचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी सोनेरी बॉर्डर असलेली चमकदार गुलाबी रंगाची मंगलागिरी साडी परिधान केली होती. ज्याला सोनेरी बॉर्डर आणि सोन्याच्या जरीचे काम होते. त्यावर्षी त्यांनी पारंपारिक ब्रीफकेसऐवजी अर्थसंकल्पीय कागदपत्रांसाठी ‘बही खाते’ वापरण्यास सुरुवात केली होती. (Social News)

Budget

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.