Home » Budget 2022 Highlights: काय स्वस्त काय महाग?

Budget 2022 Highlights: काय स्वस्त काय महाग?

by Correspondent
0 comment
Budget 2022 Highlights in Marathi
Share

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आपला चौथा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. कोरोना काळात जगातील बहुतांश देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झालेली असताना त्यास भारत देश अपवाद कसा असेल? या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. परंतु, काही आशा मात्र नक्की होत्या. त्या पूर्ण झाल्या नाही झाल्या, मत मतांतरे टीका टिप्पणी आठवडाभर होतच राहणार. डिजिटलायझेशनला चालना देणाऱ्या या अर्थसंकल्पाने करदात्यांची निराशा केली आहे, हे मात्र नक्की. या अर्थसंकल्पामधील काही महत्वाच्या घोषणा (Budget 2022 Highlights). 

Budget 2022 Highlights:  डिजिटल भारत

  • आरबीआयचे डिजिटल चलन येणार डिजिटल रुपी हे ब्लॉक चेनच्या माध्यमातून इश्यू होईल.
  • डिजिटल करन्सीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक विशेष योजना राबवेल
  • ७५ जिल्ह्यात ७५ डिजीटल बँकिंग युनिट सुरु करणार
  • पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन हस्तांतरण शक्य
  • डिजीटल विद्यापीठ सुरु करणार 
  • कौशल्य विकासासाठी ऑनलाईन ट्रेनिंग 
  • पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र चॅनेल
  • 5G सेवा २०२२-२३ मध्ये सुरु करणार 
Union Budget 2022

Budget 2022 Highlights: – शेती 

  • नाबार्डच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी तरुणांना आर्थिक मदत. कर्जपुरवठा आणि आयटी बेस सपोर्टसाठीही विशेष प्रयत्न 
  • शेतीक्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचं सहकार्य 
  • आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बजेट फार्मिंग तसेच पीक मूल्यांकन, जमिनीच्या नोंदी, कीटकनाशकांची फवारणी यासाठी ‘किसान ड्रोन’चा वापर
  • सेंद्रिय शेती आणि तेलबियांच्या शेतीला प्राधान्य
  • जलसिंचन योजनेअंतर्गत ९ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणणार तसेच सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद
  • कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीचा समावेश 
  • गंगा नदीच्या क्षेत्रातील पाच किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आणि नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न 

=====

हे देखील वाचा: What is Budget? – बजेट (अर्थसंकल्प) म्हणजे काय?

=====

Budget 2022 Highlights – काय स्वस्त काय महाग ?

स्वस्त 

  • मोबाईल फोन, चार्जर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कॅमेरा लेन्सेस, 
  • कपडे, चामड्याचा वस्तू, चप्पल आणि बुट्स 
  • हिऱ्याच्या वस्तू, दागिने 
  • इम्पोर्टेड केमिकल
  • मशिन्स व शेतीची अवजारे 
  • इंधन

महाग 

  • छत्र्या 
  • क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक 

Budget 2022 Highlights: वाहतूक 

  • पीएम गतीशक्ती योजनेद्वारे एकस्प्रेस हायवे विकसित करण्याचे ध्येय. रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल
  • रस्ते, रेल्वे, जल आणि हवाई वाहतूक सुविधांसाठी मोठी गुंतवणूक 
  • वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आणणार
  • रेल्वेचं जाळं विकसित करण्याचा प्रयत्न करणार
  • मोठ्या शहरांत मेट्रोची सुविधा 
  • येत्या ३ वर्षात ४०० नवीन बुलेट ट्रेन ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध होणार 
  • ४०० नव्या वंदे भारत रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी धावणार
  • सन २०२३ पर्यंत २५ हजार किलोमीटरचा महामार्ग बांधला जाणार
Budget 2022-23 : काय स्वस्त काय महाग?

Budget 2022 Highlights: थोडक्यात महत्वाचे 

  • अर्थसंकल्प २०२२ मध्ये पुढच्या २५ वर्षाची ब्लु प्रिंट
  • देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोव्हिडचा मोठा परिणाम. जीडीपी ९.२ टक्के राहणार
  • तरुणांना ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध करून देणार 
  • पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार 
  • सूक्ष्म लघू उद्योगासाठी २ लाख कोटींची तरतूद
  • १५ क्षेत्रांसाठी पीएलआय योजना राबवणार
  • साखर कारखान्यांचा आयकर कमी केला होता
  • सहकारी क्षेत्राचा कर १५ टक्क्यांवर आणला आहे
  • लवकरच LIC चा आयपीओ शेअर बाजारात येणार 
  • २०२२-२३ मध्ये चिप आधारित ई-पासपोर्ट सुविधा सुरू केली जाईल
  • एनपीएस मधील गुंतवणुकीवरील करांमध्ये बदल
  • कॉर्पोरेट सरचार्च कमी करण्यात येणार
  • सौरऊर्जा निर्मितीवर भर आणि स्टार्टअपला केंद्राचं प्रोत्साहन
  • राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी १ लाख कोटींची गुंतवणूक
  • कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवर
  • देशात २१ मानसिक समस्या समुपदेशन केंद्र सुरु करणार
  • देशातील ५ मोठ्या नद्या जोडण्याची योजना 
  • २०२२-२३  मध्ये आठ ठिकाणी रोप वे सुरु करणार
  • हॉस्पिटलिटी उद्योगांना कोरोनापूर्व स्थितीत पोहोचण्यासाठी प्रयत्न
  • सेझचा कायदा बदलणार, राज्य सरकार भागीदार होणार
  • अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी भांडवली गुंतवणूक महत्त्वाची. भांडवली खर्च ३५.४ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.