Home » हिंदू संस्कृती जपणारा ब्रुनेई देश मुस्लिम कसा झाला?

हिंदू संस्कृती जपणारा ब्रुनेई देश मुस्लिम कसा झाला?

by Team Gajawaja
0 comment
Brunei History
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ब्रुनेई या देशाचा दौरा केला. ब्रुनेई या छोट्या आशियाई देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. यावेळी ब्रुनेईचा सुलतान हसनल बोलकिया याच्याबद्दलच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या. या सलतानाचा सोन्याचा महल, त्याची अलिशान रहाणी, गाड्यांचा भलामोठा ताफा, ही माहिती आवडीनं वाचली गेली. मात्र यासोबतच ब्रुनेई देशाबाबत आणखी एक माहिती पुढे आली ती म्हणजे, एकेकाळी या छोट्या देशात हिंदू आणि बौद्ध संस्कृती मोठ्या प्रमाणात होती. मात्र कालांतराने हा देश मुस्लिम बहुसंख्याक झाला. आता या देशात ८२.१ टक्के मुस्लिम जनसंख्या आहे. ६.३ टक्के बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. तर त्याहून अल्प हिंदू धर्माचे नागरिक या देशात रहातात. (Brunei History)

आपल्या देशातील एखाद्या राज्यापेक्षाही ब्रुनेई लहान देश आहे. ब्रुनेईची लोकसंख्या जेमतेम 5 लाखांच्या आसपास आहे. या देशात मलय भाषा बोलली जाते. मलय ही ब्रुनेई सोबत मलेशियाचीही अधिकृत भाषा आहे, तर सिंगापूरमध्ये मलय भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा आहे. सिंगापूर, ब्रुनेई आणि दक्षिण थायलंडमध्ये याच भाषेला मेलायु असेही म्हटले जाते. इस्लामच्या आगमनापूर्वी ब्रुनेईवर हिंदू आणि बौद्ध राज्यांचा प्रभाव होता. येथील लोकसंख्या प्रामुख्याने बौद्ध असल्याचे सांगितले जाते. ही जनता दक्षिणेच्या श्रीविजया साम्राज्याशी संबंधित होती. साम्राज्य विस्तारासाठी या श्रीविजया साम्राज्याची एक पिढी या ब्रुनेईमध्ये आली आणि तिथेच त्यांची वंशमुळे रोवली गेली. पुढे ब्रुनेईला बौद्ध देशातून इस्लामिक देशामध्ये बदलण्यासाठी जवळपास 500 वर्षे लागल्याची माहिती आहे. यासंदर्भात अनेक पुरावे येथे उपलब्ध आहेत. (Brunei History)

ब्रुनेई पूर्वी दक्षिणपूर्व आशियातील एक प्रमुख बौद्ध राज्य होते. पुरातत्वीय पुराव्यावरून हे स्पष्ट झाले आहे. या देशात विविध वांशिक गट राहत होते. मुख्य म्हणजे, श्रीविजया साम्राजाचा एक भाग म्हणूनच ब्रुनेई या देशाकडे पाहिले जायचे. त्यामुळे या देशावर श्रीविजया साम्राज्यातील संस्कृतीची आणि परंपरांचा प्रभाव होता. हा प्रभाव 14 व्या शतकादरम्यान राहिला. त्यानंतर ब्रुनेईमध्ये बौद्ध संस्कृतीचाही प्रभाव दिसून येतो. यासंदर्भात चीनी प्राचीन ग्रंथ पुनीमध्येही उल्लेख आहे. कारण याच शतकात ब्रुनेईचे भारत आणि चीनसोबतचे व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाले. 15 व्या शतकानंतर ब्रुनेईमध्ये इस्लाम धर्माचा प्रचार सुरु झाला. त्याला कारण म्हणजे, ब्रुनेईच्या व्यापाराच्या कक्षा वाढल्या होत्या. येथून अरबी द्वीपकल्प आणि भारतातील मुस्लिम व्यापाऱ्यांशी व्यापार सुरु झाला. (Brunei History)

त्यासोबतच इस्लाम धर्माचा प्रभाव या देशावर पडायला सुरुवात झाली. 1515 च्या सुमारास ब्रुनेईच्या बौद्ध राजाने सुलतान मुहम्मद नाव घेऊन इस्लाम स्वीकारल्याचा उल्लेख आहे. या राजाचे नाव अवांग अलक बेटाटर होते. हा राजा सुलतान मुहम्मद झाल्यानं ब्रुनेईच्या इतिहासात इस्लामिक युगाची सुरुवात झाली. राजा सुलतान झाल्यामुळे ब्रुनेईमधील बहुतांश बौद्ध धर्मियांनी आपलाही धर्म बदलून इस्लामचा स्विकार केला. पुढे हा देश मुस्लिम बहुल देश झाला. ब्रुनेईच्या सुलतानाने राज्य शासनाला इस्लामी तत्त्वांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्येक पिढीतील राजानं यासंदर्भात नव्या सुधारणा केल्या. 1959 मध्ये स्थापन झालेल्या ब्रुनेईच्या संविधानाने इस्लामला अधिकृत धर्म म्हणून घोषित केले. तथापी, या देशात आजही बौद्ध धर्मिय रहात आहेत. आपल्या पूर्वजांचा वारसा ही मंडळी जपत आहेत. (Brunei History)

ब्रुनेईमध्ये 2002 मध्ये सुंगाई लिमाउ मनिस या पुरातत्व स्थळाबाबत झालेले संशोधन जाहीर करण्यात आले. या ठिकाणी बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव आहे. तसेच 1950 मध्ये कोटा बातू येथून काही कलाकृतीं शोधण्यात आल्या. यावरुन ब्रुनेईमध्ये एकेकाळी बौद्ध धर्म किती प्रभावशाली होता, हे स्पष्ट झाले आहे. 1997 मध्ये, ब्रुनेईच्या किनाऱ्याजवळ एक अतिशय प्राचीन जहाज सापडले. त्यात बौद्ध आणि हिंदू धर्माचा प्रभाव असलेल्या कलाकृती सापडल्या आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हे जहाज ब्रुनेईच्या किना-यावर जहाज आल्याची शक्यता आहे. मात्र त्यावेळी आलेल्या तुफानामुळे या जहाजाला जलसमाधी मिळाली. यातील वस्तुंवरुन ब्रुनेईमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू आणि बौद्ध धर्मिय रहात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. (Brunei History)

==============

हे देखील वाचा :  बलुच शेरनी मेहरंग

===============

मुस्मिम बहुल ब्रुनेईमध्ये हिंदूंची संख्या अगदी कमी आहे. 2001 च्या जनगणनेनुसार, 124 हिंदू नागरिक या देशात आहेत. शिवाय 91 कायमचे रहिवासी आहेत. यात प्रामुख्याने डॉक्टर, अभियंते आणि ब्रुनेईमधील शिक्षण क्षेत्रात काम करणारे प्राध्यापक, संशोधक आणि शिक्षक यांचा समावेश आहे. ब्रुनेईमध्ये दोन हिंदू मंदिरे आहेत. तरीही ब्रुनेई सरकारच्या अंतर्गत फक्त एका मंदिराची नोंदणी आहे. हे मंदिर सेरिया, ब्रुनेई येथील गोरखा रेजिमेंटच्या परिसरात आहे. या हिंदू मंदिरात स्थानिक हिंदू आणि बौद्ध समुदाय प्रार्थनेसाठी येतात. ब्रुनेईचे हिंदू कल्याण मंडळ ही 50 वर्षे जुनी हिंदू धार्मिक संघटना आहे. (Brunei History)

सई बने.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.