Home » ब्रोकन हार्ट सिंड्रोमपासून असे राहा दूर

ब्रोकन हार्ट सिंड्रोमपासून असे राहा दूर

आपल्या शरीरातील सर्वाधिक नाजुक आणि संवेदनशील अवयवस म्हणजे हृदय. जेव्हा शरीर भावनात्मक किंवा शारिरीक तणावाचा सामना करतो तेव्हा अस्थायी रुपात एक हार्ट कंडीशन निर्माण होते, ज्याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम नावाने ओखळले जाते.

by Team Gajawaja
0 comment
Broken Heart Syndrome
Share

Broken Heart Syndrome : आपल्या शरीरातील सर्वाधिक नाजुक आणि संवेदनशील अवयवस म्हणजे हृदय. जेव्हा शरीर भावनात्मक किंवा शारिरीक तणावाचा सामना करतो तेव्हा अस्थायी रुपात एक हार्ट कंडीशन निर्माण होते, ज्याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम नावाने ओखळले जाते. या स्थितीत हार्ट फंक्शनिंग कमी होते. याशिवाय काही स्थितींमध्ये माइनर हार्ट अटॅक येऊ शकतो. ही समस्या कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. तर जाणून घेऊयात ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे नक्की काय आणि यापासून कसे दूर राहाल याबद्दल अधिक….

ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे काय?
ब्रोकन हार्ट सिंड्रोम ही एक प्रकारची हार्ट कंडीशन आहे. जी मानसिक आणि भावनात्मक तणावाच्या कारणास्तव निर्माण होतो. याला टॅकोत्सुबो कार्डियोमायोपॅथी नावानेही ओखळले जाते. या स्थितीत शरीर वेगाने हार्मोन उत्सर्जित करतात. यामुळे हृदयाच्या स्थितीवर ताण पडला जाऊ शकतो. याची लक्षणे हार्ट अटॅकसमान असतात. जसे की, छातीत दुखणे, श्वास घेण्यास समस्या आणि चक्कर येणे याशिवाय हृदय देखील मंद गतीने काम करू लागते. ही एक अस्थायी समस्या असून यापासून बरे होण्यासाठी दोन ते तीन आठवड्याचा वेळ लागू शकतो.

ब्रोकन हार्ट सिंड्रोमची कारणे
ब्रोकन हार्ट सिंड्रोमची ठोस अशी कारणे नाहीत. पण असे मानले जाते की, ही समस्या एड्रेनालाइन नावाच्या स्ट्रेस हार्मोनमध्ये वाढ झाल्याने निर्माण होते. यासाठी मानसिक आणि भवनात्मक तणाव कारणीभूत असतो. जसे की, ब्रेकअप, एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा अपघात. याशिवाय शारिरीक तणाव देखील या स्थितीसाठी जबाबदार असू शकतो. (Broken Heart Syndrome)

ब्रोकन हार्ट सिंड्रोमपासून असे राहा दूर
-ब्रोकन हार्ट सिंड्रोमपासून दूर राहण्यासाठी आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.
-शरिरातील हार्मोन स्थिर आणि सामान्य करण्यासाठी नियमित रुपात व्यायाम आणि योगासने करू शकता.
-तणाव कमी करण्यासाठी औषधांव्यतिरिक्त काउंसिलिंगची मदत घेऊ शकता.
-काहीवेळेस उपचारानंतरही ब्रोकन हार्ट सिंड्रोमची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे चार ते सहा आठवड्यानंतर ईकोकार्डियोग्राम आवश्यक रुपात करून घेऊ शकता.


आणखी वाचा :
‘या’ फूड्समुळे होते तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी
हिवाळ्यात नवजात बालकांची अशी घ्या काळजी
हिवाळ्यात सांधेदुखीपासून दूर राहण्यासाठी करा ही सोपी योगासने

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.