Home » ब्रोकोली खात असाल तर ‘या’ व्यक्तींनी सावध रहा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

ब्रोकोली खात असाल तर ‘या’ व्यक्तींनी सावध रहा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

by Team Gajawaja
0 comment
Broccoli side effects
Share

सध्याच्या काळात प्रत्येकाला आपली लाइफस्टाइल बदलायची आहे. त्यामुळे ती व्यायामाच्या माध्यमातून असो किंवा आपल्या दररोजच्या सवयींमधून असो. या सर्वांव्यतिरिक्त पोषक तत्व असलेल्या गोष्टी खाणे आरोग्यासाठी फार महत्वाच्या असतात.तर ब्रोकोलोची वापर सॅलेड म्हणून केला जातो. याचे कारण म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. वजन कमी करणे ते शरिराला तंदुरस्त ठेवण्यासाठी ब्रोकोली खाणे फार फायदेशीर आहे. परंतु ब्रोकोलीच्या अधिक सेवनाने आरोग्याला नुकसान ही पोहचू शकते. ब्रोकोली तुमच्या मुत्रपिंड ते पाचन तंत्र आणि गर्भधारणेला नुकसान पोहचवू शकते. अशातच यामध्ये असलेले फायबर, विटामिन असतात ते पाचन एंजाइम्ससोबत गडबड करु शकतात. यामुळे तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकते. (Broccoli side effects)

कोणत्या लोकांनी ब्रोकोली खाण्यापासून सावध राहिले पाहिजे?

-डाएटमध्ये कधीच ब्रोकोलीचा समावेश करु नका
ज्या लोकांचे मुत्रपिंड कमजोर असते किंवा त्यांना त्या संबंधित काही आजार असतात त्यांनी ब्रोकोलीचे सेवन अजिबात करु नये. कारण यामध्ये भरपुर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे तुम्हाला गॅस आणि आतड्यांमध्ये जळजळीची समस्या उद्भवू शकते. तसेच मुत्रपिंडाला त्याचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी ही अडथळे आणू शकते.अशातच तुमचे पोट फुगण्याची समस्या ही होऊ शकते.

-कमजोर पाचन तंत्र असलेल्या लोकांनी दूर रहावे
ब्रोकोलीचे सेवन कमजोर पाचन तंत्र असलेल्या लोकांनी करण्यापासून दूर रहावे. याचे कारण असे की, डाइजेस्टिव्ह एंजाइम्सला नुकसान पोहचते. तुम्ही खाल्ले पदार्थ पचण्यास अडथळा येते. हाइपोथायरायडिज्मने ग्रस्त असलेल्या लोकांनी ब्रोकोलीचे सेवन करु नये. यामुळे थायरॉइडची समस्या वाढू शकते.

-अधिक ब्रोकोली खाणे टाळा
अधिक प्रमाणात ब्रोकोली खाल्ल्याने पोटासंबंधित समस्या सुरु होतात. यामध्ये पोट खराब होणे ते कब्ज होण्याची शक्यता असते. ते शरिरातील पाणी शोशून घेते. ऐवढेच नव्हे तर बॉवेल मुवमेंट ही प्रभावितहोते. अशातच ब्रोकोलीचा कमीतकमी वापर खाण्यात केला पाहिजे. ते खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून उकळवा. त्यानंतर त्यावर मीठ टाकून तुम्ही खाऊ शकता.(Broccoli side effects)

-एलर्जीची समस्या उद्भवते
ब्रोकोलीच्या अधिक सेवनाने तुम्हाला एलर्जी सुद्धा होऊ शकते. तुमच्या त्वचेवर खाज येणे, पुळ्या येणे किंवा लाल होण्यासारखी समस्या निर्माण होऊ शकते.

हे देखील वाचा- फक्त सफरचंदच नाही तर त्याचा रसही आरोग्यदायी…

-प्रेग्नेंसीमध्ये अधिक ब्रोकोली खाणे टाळा
प्रेग्नेंसी दरम्यान, अधिक ब्रोकोलीचे सेवन करु नये. यामुळे गर्भवती महिला आणि बाळाच्या आरोयाला नुकसान पोहचू शकते. फ्रिजमध्ये ठेवलेली थंड आणि कच्ची ब्रोकोली ही खाणे घातक ठरते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.