अमेरिकेमध्ये बेकादेशीर स्थलांतरितांवर कारवाई सुरु झाली आहे. यातूनच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत रहायला आलेल्यांपैकी काही खास व्यक्तींच्या व्हिसाची नव्यानं तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काही सेलिब्रिटीही अमेरिकेतून हद्दपार होण्याची शक्यता आहे. यात ब्रिटन राजघराण्याचा राजकुमार हॅरी याचाही समावेश होण्याची शक्यता आहे. त्याला कारण म्हणजे हॅरीनं व्हिसा घेतांना ड्रग्ज संदर्भात वस्तुस्थिती लपवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जुना खटला उघडला असून आरोप सिद्ध झाले तर प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कल यांना अमेरिका सोडावी लागणार आहे. हॅरी आणि मेघनसोबत त्यांच्या दोन मुलांवरही देश सोडण्याची वेळ येऊ शकते. ट्रम्प यांनी निवडणुकी दरम्यान एका मुलाखतीमध्ये प्रिन्स हॅरी यांनी अमेरिकन व्हिसा अर्जात ड्रग्ज वापराबद्दल माहिती लपवली असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे, असे सुचवले होते. आता ट्रम्प राष्ट्राध्याक्षपदी असतांना त्यांनी प्रिन्स हॅरीचा खटलाही नव्यानं उघडला असून यामुळे ब्रिटिश राजकुमार चिंताग्रस्त झाला आहे. (America)
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान प्रचार करतांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. विजयी झाल्यावर शपध घेताच ट्रम्प यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली. त्यात त्यांनी अशा स्थलांतरितांची यादी करण्याचे आदेश दिले. शिवाय अमेरिकेत घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना अटक करुन त्यांना थेट त्यांच्या मायभूमीत पाठवण्यात येत आहे. अशा 104 भारतीयांनाही ट्रम्प यांनी परत पाठवले आहे. मात्र हे होत असतांना अमेरिकेतील अनेक श्रीमंताकडे येथे रहाण्याचा परवानाही नाही, त्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवणार का, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर ट्रम्प यांनी अमेरिकेचा कायदा सर्वांना समान आहे, त्यात गरीब-श्रीमंत असा भाग नसल्याचे स्पष्ट करत, कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्याकडे योग्य कागदपत्र नसतील तर त्यांना बाहेर पाठवण्यात येईल असे सांगितले. (International News)
याच चर्चेत ब्रिटनचे राजकुमार हॅरी यांचेही नाव आले. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रिन्स हॅरी यांचीही फाईल उघडण्याचे संकेत दिले आहेत. या सर्वाला कारणीभूत ठरले आहे, ते प्रिन्स हॅरी यांचे स्पेअर नावाचे आत्मचरित्र. या आत्मचरित्रात हॅरी यांनी किशोरावस्थेत ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र प्रिन्स हॅरी यांनी अमेरिकेचा व्हिसा मिळवतांना याबाबत कुठलिही माहिती दिली नाही. अमेरिकेच्या व्हिसा नियमांनुसार, अर्जदारांने ड्रग्जच्या वापराबद्दल माहिती देणे आवश्यक आहे आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांचा व्हिसा अवैध ठरू शकतो. हा गुन्हा सिद्ध झाला तर प्रिन्स हॅरीला अमेरिकेतून बाहेर पडावे लागणार आहे. प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मार्कल ही अमेरिकन नागरिक आहे. (America)
जून 2020 पासून प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कल हे अमेरिकेतील कॅलिफोर्नियात रहात आहेत. या दोघांना आर्ची आणि लिलिबेट अशी दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांचा जन्मही अमेरिकेतच झाला आहे. आता अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरित नागरिकांविरोधात मोहीम सुरु झाली असतांना येथे राहणा-या श्रीमंतावरही कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. कोकेन, गांजा आणि सायकेडेलिक मशरूम घेण्याबद्दल हॅरीने केलेल्या स्पेअर या आत्मचरित्रातील टिपण्णीनंतर कंझर्व्हेटिव्ह अमेरिकन थिंक टँक द हेरिटेज फाउंडेशनने हॅरीच्या यूएस इमिग्रेशन स्टेटसबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याबाबत स्थानिक न्यायालयात संबंधित फाउंडेशनने दादही मागितली होती. (International News)
===============
हे देखील वाचा : डबल चीनची समस्या होईल दूर, डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल
Donald Trump : ट्रम्पना कुठे करायची आहे, रिसॉर्ट सिटी
===============
सप्टेंबर 2024 मध्ये, अमेरिकन न्यायाधीश कार्ल निकोल्स यांनी प्रिन्स हॅरीचा व्हिसा अर्ज खाजगी ठेवला पाहिजे असा निर्णय दिला. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर या फाउंडेशनने पुन्हा प्रिन्स हॅरीसह अमेरिकेत रहाणा-या अन्यही सेलिब्रिटीबद्दल दाद मागायला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी यासंदर्भात दखल घेत प्रिन्स हॅरीची फाईल पुन्हा खुली कऱण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिका सोडण्याची वेळ प्रिन्स हॅरीवर आली तर ते त्यांच्या स्पेअर आत्मचरित्रामुळे दुस-यांदा मोठ्या अडचणीत येणार आहेत. स्पेअरमध्ये त्यांनी ब्रिटीश राजघराण्याबाबतही केलेल्या उल्लेखामुळे त्यांच्यात आणि प्रिन्स विल्यम यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. हॅरीचे पिता आणि राजा चार्ल्स यांच्यामध्येही याच स्पेअरमुळे दुरावा आला आहे. अशात आता याच स्पेअरमुळे हॅरीवर अमेरिकेतून हद्दपार होण्याची तलवार लटकत आहे. (America)
सई बने