ब्रिटिश मुलींना ड्रग्जचे व्यसन लावण्यात येत आहे. या व्यसनाधिन झालेल्या मुलींवर बलात्कार करुन त्यांचे लैगिंक शोषण करण्यात येत आहे. अशा मुलींमध्ये लहान मुलींची संख्या अधिक आहे. या सर्वांमागे जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यात ब्रिटीश पाकिस्तानी नागरिकांची संख्याच अधिक असल्याचा खुलासा ब्रिटीश सरकारच्या गृहमंत्र्यानं केल्यानं एकच खळबळ उडाली आहे (British minister). बाललैंगिक शोषणाबाबतचा हा अहवाल सादर करताना ब्रिटनमध्ये वाढत्या गुन्हेगारीमागे ड्रग्जचा पुरवठा करणा-या टोळ्याच असल्याचा जाहीर आरोप करण्यात आला आहे आणि या सर्वांमागे पाकिस्तानचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी असल्याचा धक्कादायक आरोपही आहे. या संदर्भात अहवाल मांडताना अशा टोळ्यांमुळे अनेक ब्रिटीश मुलींचे आयुष्य उद्धस्त झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी हा अहवाल मांडल्यावर ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या टोळ्यांना अटकाव करण्यासाठीचे आदेश दिले आहेत. या टोळ्यांना “ग्रूमिंग गँग’ असे म्हणण्यात येते. या टोळ्या विशेषकरुन ब्रिटीश मुलींनाच लक्ष करतात असे निदान करण्यात आले आहे. या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी आता नवीन टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केली आहे. पण गृहमंत्री सुएला यांच्या रोखठोक भुमिकेमुळे आणि त्यांनी थेट ब्रिटनमधील पाकिस्तानी नागरिकांवर टिका केल्यामुळे ब्रिटनमध्ये एकच खळबळ उडाली आहे(British minister).

ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी गेल्या आठवड्यात सादर केलेल्या एका अहवालानं खळबळ उडाली आहे. सुएला यांच्या अहवालानुसार ब्रिटनमध्ये अशा अनेक ब्रिटीश पाकिस्तानी नागरिकांच्या टोळ्या आहेत ज्या गोर्या मुलींना ड्रग्जचा पुरवठा करतात आणि त्यांच्यावर बलात्कार, लैंगिक अत्याचार करतात. ब्रिटनमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. विशेषत: महिला, मुली आणि लहान मुलांबाबत गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांच्या मते, लैंगिक गुन्हे करणाऱ्या टोळ्यांमध्ये जवळपास सर्वच ब्रिटिश पाकिस्तानी आहेत. ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी वाढत्या बाल लैंगिक अत्याचाराविरोधात नवीन योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत मुलींची काळजी घेण्याबाबत अनेक उपाययोजना सुचवण्यात आले आहेत. या अहवालानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या “ग्रूमिंग गँग’ला तोंड देण्यासाठी कमिटीच जाहीर केली आहे. त्याअंतर्गत एक नवीन टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. लैंगिक शोषणासाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी या टास्क फोर्समध्ये तज्ज्ञ अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली असून आता यावर मौन धरणे चुकीचे आणि धोकादायकही ठरणार असल्याचे ब्रिटनच्या गृहसचिवांनी म्हटले आहे. यासंदर्भात ब्रिटनमध्ये लवकरच नवा कायदाही आणला जाणार आहे आणि या सर्वातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. (British minister)
=======
हे देखील वाचा : जनतेसाठी खुले होणार शिमला मधील १७३ वर्ष जुने राष्ट्रपती भवन
=======
या अहवालात गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी पाकिस्तानच्या नागरिकांचे नाव घेतल्यानं त्यात वाद होण्याची शक्यता आहे. सुएला या भारतीय वंशाच्या ब्रिटीश नागरिक आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान असाही रंग या घटनेला देण्याचा प्रयत्न होणार आहे. मात्र सुएला या अत्यंत स्पष्टवक्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांनी या सर्वांवर खुलासा केला असून राजकीय फायद्यासाठी गैरवर्तनाकडे डोळेझाक होता कामा नये. आज हजारो मुलांचे बालपण उद्ध्वस्त झाले असून गुन्हेगार मोकाट फिरत आहेत आणि त्यांना शिक्षा देणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे सुएला यांनी सांगितले आहे. सुएला यांनी यासाठी यासाठी गेल्या काही वर्षांची आकडेवारी सादर केली आहे. बीबीसीशी बोलताना त्यांनी ‘या गुन्हेगारांमध्ये ब्रिटिश पाकिस्तानी पुरुषांचा एक गट आहे ज्यांची सांस्कृतिक वृत्ती ब्रिटिश मूल्यांशी पूर्णपणे विसंगत आहे.’ असा जाहीर आरोप केला आहे. सुएला यांच्या या अहवालानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एक टास्क फोर्सची निर्मिती केली असून सांस्कृतिक संवेदनशीलतेच्या नावाखाली आशियाई समुदायातील कोणताही गुन्हेगार आता सुटणार नाही, असे आश्वासन त्यातील अधिकाऱ्यांनी दिले आहे. ब्रिटनने गेल्या वर्षी पाकिस्तानशी करार केला होता. या अंतर्गत अवैध पाकिस्तानींना त्यांच्या देशात पाठवता येणार आहे. आता अशा अवैध व्यवसायात जे पाकिस्तानी नागरिक आहेत, त्यांचा शोध घेण्याचे आदेश ऋषी सुनक यांनी दिले आहेत.
सई बने