ब्रिटिश राजा चार्ल्स तिसरा यांचे धाकटे भाऊ प्रिन्स अँड्रयू यांनी त्यांच्या सर्व शाही पदव्यांचा त्याग केला आहे. अँड्रयू यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत आपण यापुढे “ड्यूक ऑफ यॉर्क” ही पदवी वापरणार नाही, हे सांगितले आहे. गेल्यावर्षी प्रिन्स अँड्रयू यांचे नाव लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनच्या प्रकरणात समोर आले. तेव्हापासून त्यांच्यावर ही पदवी सोडण्यासाठी दबाव होता. सोबतच एका कथित चिनी गुप्तहेराशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दलही प्रश्न विचारण्यात आल्यामुळे प्रिन्स अँड्रयू वादात सापडले होते. त्यांच्यामुळे राजघराण्याची बदनामी होत असल्याची चर्चा सुरु झाली. तसेच या सर्व जेफ्री एपस्टाईन प्रकरणावर लवकरच एक पुस्तक प्रकाशित होत आहे, त्यामध्ये प्रिन्स अँड्रयू यांच्याबाबत स्वतंत्र प्रकरण असण्याची शक्यता आहे. यासर्व बाबी लक्षात घेऊन त्यांनी आपल्या शाही पदव्या सोडण्याचे निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. (Prince Andrew)

ब्रिटनचे प्रिन्स अँड्रयू यांनी त्यांच्या शाही पदवी सोडण्याची घोषणा केल्यावर त्यांचे नाव वादग्रस्त जेफ्री एपस्टाईन प्रकरणामध्ये नक्कीच आहे, यावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. मुख्य म्हणजे, दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्या विनंतीवरून देण्यात आलेली ड्यूक ऑफ यॉर्क या पदवीचाही प्रिन्स अँड्रयू यांनी समाविष्ट आहे. प्रिन्स अँड्रयू यांनी त्याग केल्यामुळे त्यांचा जेफ्री प्रकरणात सहभाग असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. (International News)
बाल लैंगिक शोषण करणाऱ्या जेफ्री एपस्टाईनशी असलेल्या संबंधांमुळे त्यांच्यावर सर्वबाजूने टीका होत होती. त्यामुळेच ६५ वर्षीय प्रिन्स अँड्रयू यांनी, माझी पदवी किंवा मला देण्यात आलेले सन्मान मी वापरणार नाही, असे जाहीर केले आहे. ब्रिटनचे राज्यप्रमुख राजा चार्ल्स तिसरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बकिंगहॅम पॅलेसमधून जाहीर केलेल्या निवेदनातून प्रिन्स अँड्रयू यांनी सांगितले आहे की, माझ्यावरील आरोप महाराणी आणि राजघराण्याच्या प्रतिष्ठेला बाधा आणत आहेत, अर्थात त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप या निवेदनातून फेटाळून लावले आहेत. ६५ वर्षीय प्रिन्स अँड्रयू हे दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांचे तिसरे अपत्य आहेत. सध्या ते ब्रिटिश सिंहासनाच्या उत्तराधिकाराच्या रांगेत आठवे आहेत. (Prince Andrew)
किंग चार्ल्स तिसरे आणि प्रिन्सेस अँनी यांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांचे लग्न सारा फर्ग्युसनशी झाले. त्यानंतर प्रिन्सेस सारा यांना डचेस ऑफ यॉर्क ही उपाधी देण्यात आली होती, मात्र या दाम्पत्याचा घटस्फोट झाल्यावर सारा यांना ही पदवी सोडावी लागली. प्रिन्स अँड्रयू आणि सारा यांना दोन मुली आहेत. अँड्रयू यांनी रॉयल नेव्हीमध्ये २२ वर्षे काम केले आहे. १९८२ च्या फॉकलंड युद्धादरम्यान त्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून काम केले. २००१ मध्ये ते कमांडर पदावरुन सक्रिय सेवेतून निवृत्त झाले. त्यांना २०१० मध्ये रिअर अॅडमिरल आणि २०१५ मध्ये व्हाइस अॅडमिरल म्हणून मानद पदोन्नती मिळाली. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर, त्यांनी २००१ मध्ये त्यांचा व्यवसायही सुरू केला होता. त्याच दरम्यान त्यांचे अमेरिकेमध्ये दौरे वाढले. यातच ते जेफ्री एपस्टाईनच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. एपस्टाईनशी संबंधित नाव समोर आल्यानंतर प्रिन्स अँड्रयू यांनी सुरुवातीला २०१९ मध्ये सार्वजनिक जीवनापासून दूर रहाणे पसंत केले. पण अलिकडच्या वर्षात जेफ्री प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाल्यावर प्रिन्स अँड्रयू यांचे नावही पुढे आला, आणि राजघराण्याची बदनामी होऊ लागली. (International News)

यातच जेफ्री एपस्टाईन प्रकरणातील पीडित व्हर्जिनिया गिफ्रे हिचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. पुस्तकात प्रिन्स अँड्र्यू आणि एपस्टाईन यांच्यातील जवळच्या संबंधांचे तपशीलवार वर्णन केले आहे. व्हर्जिनिया गिफ्रेचा दावा आहे की, प्रिन्स अँड्रयूने ती अल्पवयीन असताना तिचे तीन वेळा लैंगिक शोषण केले. तिने असेही लिहिले आहे की, प्रिन्सला तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे हा त्याचा जन्मसिद्ध हक्क वाटायचा. तथापि, प्रिन्स अँड्र्यू यांनी हे सर्व आरोप नाकारले आहेत. पण २०११ मध्ये प्रिन्स अँड्रयू आणि व्हर्जिनिया यांचा फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे प्रिन्स खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय १५ फेब्रुवारी २०२२ रोजी, अँड्रयू आणि गिफ्रे यांनी १२ दशलक्ष युरोसाठी न्यायालयाबाहेर तडजोड केल्याचेही उघड झाले. हे सर्व पुरावे पुढे आल्यावर प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर वाढता दबाव होता, त्यातूनच त्यांनी आपल्या सर्व पदव्या सोडल्या आहेत. प्रिन्स अँड्रयूने ही पदवी सोडल्यानंतर, ड्यूक ऑफ यॉर्क या पदवीचे काय होईल हा प्रश्न आहे. (Prince Andrew)
=======
हे देखील वाचा :
Donald Trump : ट्रम्पची दुधाची तहान ताकावर !
======
सध्याच्या ब्रिटिश शाही नियमांनुसार, जर ड्यूक ऑफ यॉर्कला मुले नसतील, तर त्यांच्या मृत्यूनंतर ही पदवी राजघराण्याकडे परत जाते. मात्र प्रिन्स अँड्रयू यांना दोन मुली आहे. मुलींना या पदव्या बहाल करता येत नसल्यामुळे ही पदवी आता कोणाकडे जाणार यासाठी दोन नावे पुढे आली आहेत. राजघराण्यातील परंपरेनुसार, ही पदवी राजाच्या दुसऱ्या मुलाला दिली जाते, म्हणूनच प्रिन्स हॅरी यॉर्कचा ड्यूक बनण्याच्या शर्यतीत आहेत. मात्र त्यांनीही २०२० पासून आपल्या पत्नीसह शाही कर्तव्य नाकारत अमेरिकेत वास्तव्य करणे पसंत केले आहे. राजकुमार विल्यम हे सिंहासनाच्या रांगेत आहेत. म्हणून, त्यांचा दुसरा मुलगा, ७ वर्षांचा प्रिन्स लुईस, याला यॉर्कचा ड्यूक ही पदवी मिळणार अशी चर्चा सुरु झाली आहे. अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही, तरी प्रिन्स लुईस आणखी काही वर्षांनी मोठे झाल्यावर त्यांना ही पदवी देण्यात येईल, अशी माहिती आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
