Home » ब्रिटनमधील मशिदी चौकशीच्या फे-यात

ब्रिटनमधील मशिदी चौकशीच्या फे-यात

by Team Gajawaja
0 comment
Britain Violence
Share

युरोपमध्ये बेकायदेशीर रहात असलेल्या मुस्लिम नागरिकांविरोधात मोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच बेकायदा उभ्या राहिलेल्या मशिदींवरही कारवाई सुरु करण्यात आली आहे. यात ब्रिटनचा क्रमांक वर आहे. ब्रिटनमध्ये २४ मशिदींवर कारवाई झाली आहे. त्यातील मौलानाची चौकशी सुरु असून मौलाना दोषी आढळल्यास १४ वर्षाची शिक्षा सुनवण्यात येणार आहे. तसेच जर्मनीमध्येही अशाच प्रकारची मोहीम सुरु झाली आहे. बेकायदेशीर रहाणा-या मुस्लिम नागरिकांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची तयारी त्यांनी सुरु करण्यात आली आहे. (Britain Violence)

ब्रिटनमध्ये महिन्यापूर्वी हमास समर्थक मोठ्या प्रमाणावर गाझाच्या समर्थनार्थ रस्त्यावर जमले होते. या हमास समर्थकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तसेच ब्रिटीश वास्तूवर सेव्ह गाझा असे लिहून ठेवले. या गाझा समर्थकांनी केलेल्या दादागिरीमुळे हताश झालेल्या ब्रिटीश पोलीसाचे छायाचित्र सोशल मिडियामध्ये फिरत होते. यातून भविष्यात ब्रिटनमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती तयार होईल, असे मेसेजही ब्रिटनच्या सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यातच गेल्या महिन्यात ब्रिटनमध्ये झालेल्या दंगलींची पार्श्वभूमी पहाता ब्रिटन सरकारने मशिदींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या मशिदीमधून द्वेष पसरवल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. इस्रायल आणि ज्यूंच्या विरोधात संतापजनक वक्तव्य करणा-या मौलवींची चौकशी आता ब्रिटनमध्ये सुरु झाली आहे. (Britain Violence)

ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानी वंशाचे नागरिक रहात आहेत. आता त्यांच्या कागदपत्रांची पहाणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ज्या २४ मशिदींची चौकशी सुरु आहे, त्या या मशिदी लंडन, बर्मिंगहॅम, लिव्हरपूल आणि मँचेस्टरसारख्या शहरांमध्ये आहेत. या मशिदींमधून गैरमुस्लिमांविरुद्ध फतवे काढण्यात आले आहेत. बर्मिंगहॅमच्या मोहम्मदी मशिदीतील मौलवी अबू इब्राहिम हुसेन यांनी ज्यूंविरुद्ध केलेले द्वेषपूर्ण भाषण व्हायरल झाले होते. त्यासंबंधात अनेकांनी तक्रार केली. त्याचा तपास सुरु असून ब्रिटिश तपासात मौलाना दोषी आढळल्यास त्याला १४ वर्षांची शिक्षा होऊ शकते. ब्रिटनच्या २०२१ च्या जनगणनेनुसार, इंग्लंड आणि वेल्समध्ये मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबत जर्मनीमध्येही बेकायदेशीर रहाणा-या आणि अशांतता निर्माण करणा-या मुस्लिम नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्याची मोहीम सुरु झाली आहे. (Britain Violence)

जर्मनीनं नुकतेच २८ अफगाण नागरिकांना परत त्यांच्या देशात पाठवले आहे. या सर्वांवर गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. यातील काही नागरिकांना जर्मन नागरिकांवर चाकूहल्ला करत त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. अशा गुन्हेगारांना पकडून पुन्हा अफगाणिस्तानमध्ये पाठवण्यात आले आहे. यासाठी जर्मनीनं कतार देशाची मदत घेतली. कतारनं तालिबान सरकारबरोबर बोलणे केले. तेव्हा हे २८ गुन्हेगार पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहेत. जर्मनीमध्ये २०२५ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत निर्वासीतांचा मुद्दा तिथे प्रमुख झाला आहे. जर्मनीमध्ये आखाती देशातून जाणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे. यातील अनेकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. जर्मनीमध्ये गेल्या काही महिन्यात चाकूहल्ल्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात हेच निर्वासीत मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या सर्वांमुळे जर्मनीच्या नागरिकांनी निर्वासीतांना देशातून हाकलावून लावा अशी मागणी केली होती. यानंतर जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सीरियन आणि अफगाण नागरिकांना त्यांच्या देशात पाठवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच जर्मनीच्या हॅम्बुर्ग शहरात इस्लामिक संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. (Britain Violence)

====================

हे देखील वाचा : जगातला सर्वात गरीब देश मंगळ ग्रहावर उतरणार होता !

====================

इराण सरकारच्या विचारसरणीचा प्रचार आणि लेबनॉनच्या हिजबुल्लाह गटाला पाठिंबा दिल्याचा आरोप या संघटनेवर आहे. जर्मन सरकारने इराणशी संबंधित शिया धर्मगुरू मोहम्मद हादी मोफ्ताह यांना हद्दपारीचे आदेशही दिले आहेत. ५७ वर्षीय मोफ्तेहला हद्दपारीची नोटीस बजावत त्याला दोन आठवड्यांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मोहम्मद हादी मोफातेह यांनी आदेशाचे पालन केले नाही तर ११ सप्टेंबरपर्यंत त्याला स्वखर्चाने जर्मनीतून जबरदस्तीने बाहेर काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे जर्मनीमधील मुस्लिम धर्मियांमध्ये खळबळ उडाली आहे. शिया धर्मगुरू मोहम्मद हादी मोफातेह हे जर्मनीतील इस्लामिक केंद्राचे प्रमुख म्हणून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे अधिकृत उपनियुक्त होते. मात्र आपल्या देशातून कुठल्याही प्रकारचे अतिरेकी विचार खपवून घेणार नसल्याचे जर्मनीनं स्पष्ट करीत मोहम्मद यांना त्वरित देश सोडण्याचे आदेश दिले. त्यांच्या मालमत्तांची चौकशीही सुरु आहे. एकूणच युरोपमध्ये निर्वासितांचा मुद्दा भविष्यात तापदायक ठरणार आहे. (Britain Violence)

सई बने.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.