ब्रिटेनमध्ये दीर्घकाळापासून सुरु असलेल्या कंजरवेटिव्ह पार्टीच्या निवडणूक प्रक्रियेनंतर आता अखेर ठरवण्यात आले आहे की, ब्रिटेनच्या नव्या पंतप्रधान पदी कोण असणार आहे. पक्षामध्ये सुरु असलेल्या पंतप्रधानांच्या पदासाठीच्या स्पर्धेत लिज ट्रस यांनी बाजी मारली आहे. त्यांचा या निवडणूकीत विजय झाला आहे. लिज ट्रस यांना आधीच त्या पंतप्रधान पदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असतील असे मानले जात होते. दरम्यान, वर्षानुवर्ष पीएम बनवण्याची घोषण्याची ही ब्रिटेनच्या महाराणींकडून बकिंघम पॅलेसमधून केली जात होती. मात्र यंदा असे झाले नाही. याची घोषणा स्कॉटलँन्डमध्ये झाली. कारण महाराणी एलिजाबेथ सध्या स्कॉटलँन्डमधील बलमॉरल कॅसलमध्ये आहेत. (Britain New PM)
पंतप्रधान पदी विराजमान होण्याच्याच पार्श्वङभूमीवर लोकांना त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. अशातच आम्ही तुम्हाला ट्रस यांच्याबद्दल अधिक माहिती आणि राजकरणातील त्यांच्या प्रवासाबद्दल अधिक सांगणार आहोत.
कोण आहेत लिज ट्रेस?
४७ वर्षीय ट्रेस बोरिस सरकारमध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या रुपात काम करत होत्या. त्या २२ वर्षे राजकरणात सक्रीय आहेत. यापूर्वी त्या लिबरल डेमोक्रेट्स सोबत होत्या मात्र नंतर त्यांनी कंजर्वेटिव पक्षात एन्ट्री केली. त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचा जन्म ऑक्सफॉर्डमध्ये झाला आणि त्या लंडन येथे राहतात. ट्रेस गणित प्राध्यापक आणि नर्स यांची मुलगी आहे. त्यांनी ऑक्सफॉर्ड युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले आहे. ट्रस यांचा विवाह अकाउंटेट Hugh O’Leary यांच्यासोबत झाला आहे. त्यांना दोन मुली आहेत. जेव्हा त्या चार वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचा परिवार ग्लास्गोच्या जवळील पॅसली येथे आले.
त्यांच्याबद्दल त्यांच्या भावाने बीबीसी रेडियो यांना सांगितले होते की, ट्रस यांना लहानपणापासूनच पराभव आवडायचा नाही. त्यामुळे त्या जिंकण्यासाठीच्या धाडसापोटी त्या गायब व्हायच्या. त्यांनी ऑक्सफॉर्ड युनिव्हर्सिटीमध्ये दर्शनशास्र, राजकरण आणि अर्थशास्राचे शिक्षण घेतले आहे. स्टुडेंट पॉलिटिक्समध्ये सक्रिय होत्या. त्यांनी सुरुवात लिबरल डेमोक्रेट्स सोबत केली होती. मात्र नंतर त्या कंजरवेटिव्ह सोबत जोडल्या गेल्या. ट्रस आधीपासूनच राजेशाहीचा विरोध करत होत्या. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ट्रस यांनी अकाउंटेटच्या रुपात काम केले. लग्न सुद्धा एका अकाउंटटशीच केले.(Britain New PM)

ट्रस यांचा राजकीय प्रवास
जर त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी २००१ मध्ये निवडणूका लढण्यास सुरुवात केली होती. पहिल्यांदा त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २००५ मध्ये त्यांना पुन्हा West Yorkshire मध्ये पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळेच नंतर त्या २००६ मध्ये ग्रीनविचमध्ये काउंसर झाल्या आणि २००८ मध्ये त्यांनी राइट ऑफ सेंटर रिफॉर्म थिंक टॅंकसाठी काम करण्यास सुरुवात केली. नंतर २०१० मध्ये त्यांना राजकरणात खास ओळख मिळाली आणि त्या २०१० मध्ये खासदार झाल्या, २०१० मध्ये निवडणूका जिंकल्यानंतर २०१२ मध्ये त्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री झाल्या आणि २०१४ मध्ये त्या पर्यावरण सेक्रेटरी झाल्या. (Britain New PM)
त्यानंतर त्यांनी ब्रेक्झिटचा सामना केला आणि त्यावेळी बोरिस जॉनसन हे ब्रेक्झिटचे हिरो झाले होते, तरीही त्यांनी त्याचा विरोध केला. दरम्यान, त्यांचा पक्ष हरला आणि त्यांनी ब्रेक्झिटच्या नव्या विचारांची साथ दिली. त्यावेळी त्यांचे असे मानणे होते की, ब्रेक्झिटच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याची संधी दिली गेली आहे. जेव्हा २०१९ मध्ये बोरिस जॉनसन जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी इंटरनॅशनल ट्रेड सेक्रेटरी बनवले. नंतर २०२१ मध्ये सर्वाधिक महत्वाचे पद फॉरेन सेक्रेट्रीची जबाबदारी मिळाली. पण जेव्हा नुकत्याच बोरिस यांनी राजीनामा दिला त्यानंतर काही मंत्र्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामध्ये ऋषि सुनक सुद्धा होते. पण त्यांनी राजीनामा दिला नव्हता.
हे देखील वाचा- शिंजो आबे यांच्यावर अंतिम संस्कार एका महिन्यानंतर का केले जातायत?
पक्षात कशाप्रकारे पंतप्रधान पदासाठी ठरवले जाते?
ब्रिटेनमध्ये पक्षांकडून पंतप्रधानांच्या दाव्याचा निर्णय त्यांच्या सदस्यांच्या मतावरुन होतो जे ब्रिटेनच्या लोकसंख्येच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. विजेत्याची निवड कंजरवेटिव्ह पक्षाचे सदस्य करतात. ज्या उमेदवाराला निवडतात. ते संसदेचे कनिष्ठ सदन हाउस ऑफ कॉमन्सच्या बहुमत असणाऱ्या पक्षाच्या नेत्याच्या रुपात आपोआपच पंतप्रधान होतात.