Home » अबब राजाच्या सैनिकाची लाखो रुपयांची टोपी !

अबब राजाच्या सैनिकाची लाखो रुपयांची टोपी !

by Team Gajawaja
0 comment
Bearskin Caps
Share

जगातील सर्वात मोठं आणि शक्तीशाली राजघराणं म्हणून ब्रिटनच्या राजघराण्याचे नाव घेतले जाते. एकेकाळी या राजघराण्याच्या सत्तेचा सूर्यास्त कधी होत नसे. मात्र आता हेच ब्रिटीश राजघराणे आणि ब्रिटनची जनता यांच्यामध्ये वाद होत आहेत. हे वाद आहेत, राजघराण्याचील व्यक्तींच्या शाही थाटाबद्दल आणि त्यावर होणा-या खर्चाबद्दल. राजघराण्याची सत्ता संपली. ब्रिटीशांची सत्ता उलथावून देश स्वतंत्र झाले. इंग्लडमध्येही लोकशाही आली, मात्र राजघराण्याची सत्ती काही संपली नाही. ब्रिटनच्या जनतेनं राजघराण्याला पहिले स्थान दिले. पण आता याच राजघराण्यावर होत असलेल्या खर्चावर नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. ब्रिटनच्या राजघराण्यावर जो खर्च होतो, तो जनतेच्या पैशातून होतो. (Bearskin Caps)

एकीकडे ब्रिटनची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. अशावेळी राजघराण्यावर खर्च होणा-या करोडो रुपयांवर जाहीरपणे टिका होऊ लागली आहे. ब्रिटनच्या राजघराण्यावर खर्च होणा-या पैशाचा आणि त्याचा वापर होऊन ज्या वस्तू खरेदी केल्या जातात, त्याचा तपशील समोर आल्यावर ही टिका अधिक प्रखर होऊ लागली आहे. कारण राजाच्या संरक्षणासाठी जे सैनिक राजघराण्याकडे आहेत, त्यांच्या एका टोपीची किंमत काही लाखात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय ही टोपी अस्वलाच्या कातडीपासून बनवण्यात येते. त्यामुळे ब्रिटनच्या राजघराण्यावर आता दुहेरी टिका करण्यात येत आहे. जनतेच्या पैशातून अशा दिखावी टोप्या कशाला, शिवाय प्राणीमित्रांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. (Bearskin Caps)

ब्रिटनच्या राजघराण्याचे सैनिक म्हटले की त्यांच्या डोक्यावरील फराची झुपकेदार टोपी आठवते. लाल सैनिकी पोशाख आणि डोक्यावर गोल आकाराची आणि काळ्या रंगाची टोपी अशा वेशात हे ब्रिटनचे शाही सैनिक असतात. पण या टोप्यांची किंमत जेव्हा जनतेसमोर आली,तेव्हा मात्र ब्रिटनच्या जनतेनं डोक्यावर हात मारुन घेतला आहे. कारण या टोपीच्या किंमतीमध्ये एखादी विकत घेता येऊ शकते. बकिंगहॅम पॅलेस ही राजघराण्याची ओळख आहे.

या बकिंमहॅम पॅलेस बाहेर जे सैनिक उभे असतात, त्यांचे पोशाख खास असतात. त्यांच्या बेअरस्किन कॅप्स चर्चेचा विषय बनल्या आहेत. या झुपकेदार टोप्या घातलेल्या सैनिकांबरोबर फोटो काढण्यासाठी जगभरातले प्रवासी प्रतीक्षेत असतात. आता याच टोप्या ब्रिटनमध्ये वादाचा विषय ठरल्या आहेत. कारण ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या टोप्या अस्वलांच्या कातडी पासून बनवण्यात येतात. आणि यातील एका टोपीची किंमत 2,000 पौंड म्हणजेच 2,19,211 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे. राजघराण्याकडे आता हजारहून अधिक सैनिकांचा ताफा आहे. त्यांच्या डोक्यावरील टोपीचीच जर काही लाखात किंमत असेल, तर त्यांच्या पोशाखावर किती खर्च होत असेल, हा विचार करुन सध्या ब्रिटनच्या जनतेला सरकारी खजिन्याची चिंता लागली आहे. कारण ब्रिटन गेल्या काही वर्षापासून आर्थिक मंदीमध्ये आहे. विशेषतः कोरोनानंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशातच राजघराण्याचे खर्च दिवसेंदिवस वाढत असल्यानं नाराजी व्यक्त होत आहे. (Bearskin Caps)

राजसैनिकांच्या डोक्यावरील टोप्या या काळ्या अस्वलाच्या फरपासून बनवण्यात येतात. या टोपीच्या किंमतीत एका वर्षात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे,. या टोप्यांसाठी वापरण्यात येणा-या अस्वलाच्या फरवर पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स यांनीही आक्षेप घेतला आहे. तसेच या टोप्यांसाठी दुसरा पर्याय शोधावा, असेही सांगितले आहे. या टोप्यांसाठी जे अस्वलांचे फर लागते, त्यासाठी कॅनडातील अस्वलांचा वापर करण्यात येतो. त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होते. ही अस्वलंही आता दुर्मिळ होत आहेत. किंग्ज गार्डच्या टोपीची किंमत या अस्वलांची संख्या जशी कमी होत आहे, तशी किंमत वाढत आहे. आता या टोप्यांची किंमत आणि त्याच्यासाठी होणारी अस्वलांची कत्तल पहाता, यासाठी अन्य पर्याय निवडावा अशी मागणीही होत आहे. (Bearskin Caps)

==============

हे देखील वाचा : रशियावर युक्रेनची आणि व्हॅक्यूम बॉम्बची एन्ट्री

===============

प्राण्यांच्या फर ऐवजी कृत्रिम पर्याय वापरुन टोप्या केल्यास त्यांची किंमतही कमी होईल, असेही राजघराण्याला सुचवण्यात आले आहे. 1815 मध्ये वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनच्या सैन्याचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिश सैनिकांनी या अस्वलाच्या फरपासून तयार झालेल्या टोप्या प्रथम परिधान केल्या होत्या. या टोप्यांची उंची 18 इंच आहे. त्यांचे वजन 1.5 पौंड आहे. असे असले तरी ही टोपी हलकी आणि थंड असल्याचे सैनिकांचे म्हणणे आहे. ब्रिटनच्या सैनिकांची ओळख असलेल्या या टोप्या जाऊन त्यांची जागा दुस-या टोप्या घेणार का हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. (Bearskin Caps)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.