Home » राजकारण ते कुस्तीचे अध्यक्षपद… कसे पोहचले बृज भूषण सिंह?

राजकारण ते कुस्तीचे अध्यक्षपद… कसे पोहचले बृज भूषण सिंह?

by Team Gajawaja
0 comment
Brij Bhushan Singh
Share

अयोध्येतील राम मंदिराचे अद्याप बांधकाम सुरु आहे. येथे एक काळ असा होता की, वादग्रस्त ढाचा होता. सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी रामल्ला आणि हिंदू धर्माच्या पक्षात निर्णय सुनावला. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराच्या भूमी पूजनाचा सोहळा पार पडला आणि त्यानंतर मंदिर उभारणीची सुरुवात झाली. दीर्घकाळ हा वाद सुरु राहिला. तीन दशकांपूर्वी १९९२ मध्ये हा वादग्रस्त ढाचा पाडला गेला. यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांच्यासह ४० जणांना आरोपी मानले गेले होते. या आरोपींमध्ये बृह भूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांचा सुद्धा समावेश होता. दीर्घकाळ कायद्याची लढाई लढल्यानंतर कोर्टाने त्यांना आरोपातून मुक्त केले.

तेच ते बृज भूषण सिंह जे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. परंतु आता त्यांच्या विरोधात दिग्गज कुस्तीपटूंनी काही खुलासे केले आहेत. ओलंपियन पहलवान विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासह ३० हून अधिक पहलवानांनी कुस्ती महासंघावर शोषण आणि बृजभूषण सिंह यांच्यावर आपल्या मनमानीने संघ चालवल्याचा आरोप केला आहे. सिंह यांनी या आरोपांना मात्र फेटाळून लावले आहे.

बृजभूषण सिंह हे खुप प्रसिद्ध आहेत. हिंदू फायरब्राँन्डचे नेते राहिलेले बृजभूषण आता उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज सीटवरुन भाजपचे खासदार आहेत. ते सातत्याने ६ वेळा निवडणूका जिंकले आहेत. सध्या त्यांच्याबद्दल सुरु असलेल्या चर्चांनुसार ते पहिल्यांचा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले नाही तर त्यांच्या करियरची सुरुवात ही वादासोबतच झाली होती. तर त्यांच्याबद्दलच अधिक विस्ताराने जाणून घेऊयात.

विद्यार्थी असतानाच सुरु झाला होता राजकीय प्रवास
८ जानेवारी १९५६ रोजी युपीतील गोंडात जन्मलेले बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांना कुस्तीची फार आवड होती. १९७९ मध्ये विद्यार्थी असतानाच राजकरणाच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता अशी होती की, जेव्हा त्यांनी विद्यार्थी संघाची निवडणूक लढवली होती. तेव्हा रेकॉर्डब्रेक मतं त्यांना मिळाली होती. युवा नेत्याच्या रुपात त्यांनी आपले व्यक्तिमत्व उभे केले.

१९८८ च्या आसपास ते भाजपच्या संपर्कात आले आणि पक्षाशी जोडले गेले. १९९१ मध्ये त्यांनी रेकॉर्ड ब्रेक करत पुन्हा निवडणूक जिंकली. टाडा संबंधित तुरुंगात राहिल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास मंदावला होता. मात्र त्यांनी पुन्हा वापसी करत सातत्याने निवडणूक जिंकली.

रेकॉर्डब्रेक विजय मिळत गेला
युपीतील बलरामपुरात भाजपला सातत्याने पराभव स्विकारावा लागत होता. १९९१ चा काळ होता. भाजपने पहिल्यांदाच बृजभूषम सिंह यांना येथील सीटवर तिकिट दिले. त्यांनी निवडणूकीत प्रतिस्पर्धी उमेदवार आनंद सिंह यांचा १.१३ लाख मतांनी पराभव केला. जेथे भाजपचा विजय होईल याची वाट पाहिली जात होती ते खरं झाले आणि रेकॉर्ड ब्रेक विजय मिळाला.

१९९२ मध्ये राम मंदिर आंदोलनावेळी सुद्धा वादग्रस्त ढाचा त्यांनी पाडल्याचा ही आरोप लावला गेला. त्यांची लोकप्रियता वाढत होती. १९९९ नंतर त्यांची विविध निवडणूकीची सीट बदलली गेली. मात्र त्यांना निवडणूकीत कधीच पराभव मिळाला नाही. प्रत्येकवेळी निकाल हा त्यांच्या बाजूने लागला.

भाजप सोडला आणि पुन्हा घर वापसी
पक्षातील काही लोकांसोबत मतभेद असल्याने त्यांनी भाजपला गुडबाय केले होते. २००९ मध्ये लोकसभा निवडणूकीत त्यांना समाजवादी पक्षाच्या तिकीटावर कैसरगंज मधून निवडणूक लढवली. पक्ष बदलल्यानंतर ही त्यांना विजय मिळाला. दरम्यान, मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणाऱ्या २०१४ मध्ये सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी पुन्हा ते भाजपात सहभागी झाले. २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणूकीत कैसरगंज सीटवरुन भाजपच्या तिकिटावर लढले आणि जिंकले. बृजभूषण सिंह यांचा मुलगा प्रतीक भूषण सुद्धा राजकरणात असून तो गोंडा मधील आमदार आहे.

मंचावरच कुस्तीपटूंना कानशिलात लगावली होती
बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांचे आयुष्य वादग्रस्त राहिले होते. डिसेंबर २०२१ मध्ये एकदा त्यांना मंचावरच अंडर-१५ कुस्तीपटूने कानशिलात लगावली होती. रांची मध्ये एका स्पर्धेत वयाच्या पडताळणीसाठी निवडकर्त्यांनी कुस्तीपटूला अपात्र ठरवले होते. त्या निर्णयाच्या विरोधात अर्ज करणारा कुस्तीपटू मंचावर पोहचला होता आणि आपला तर्क सुनावण्याचा प्रयत्न करत होता.

कुस्ती संघाच्या अध्यक्षांनी कुस्तीपटूला असे म्हटले होते की, जेव्हा टेक्निकल टीमने त्याला अयोग्य घोषित केल्याने स्पर्धेत सहभागी होणार नाही. कुस्तीपटू सातत्याने विनवणी करत होता. सिंह भडकले आणि जोरदार कानशिलात दिली. या घटनेचा विरोध झाला तरीही त्यांनी दु:ख व्यक्त केले नाही.

हे देखील वाचा- ईराणने आपल्याच देशातील माजी मंत्र्यांना दिली फाशी, कोण होते अलीरेज अकबरी?

सातत्याने तिसऱ्यांदा WFI चे अध्यक्ष
बृजभूषण शरण सिंह २०२११ पासून कुस्ती संघाचे अध्यक्ष आहे. ते सातत्याने तिसऱ्यांदा या पदावर निवडगले गेले. फेब्रुवारी २०१९ मध्ये ते पुन्हा अध्यक्ष झाले आणि आता कुस्तीपटूंच्या आरोपांचा सामना करत आहेत. त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला आहे की, ते आपल्या मनमानीने संघ चालवत आहेत. पहलवानांसोबत त्यांचे कोच पाठवले जात नाहीत आणि विरोध केल्यास त्यांना धमकावले जाते.

महिला पहलवान विनेश फोगाटने ऐवढे सुद्धा म्हटले होते की, बृजभूषण सिंहने काही मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. त्यांच्या आवडीच्या सरदार मुलींचे सुद्धा शोषण करतात. केवळ खेळाडूंचा नव्हे तर महिला कोच यांचे सुद्धा शोषण होते. दुसऱ्या बाजूला बृजभूषण सिंह यांचे असे म्हणणे आहे की, १० वर्षांपासून काही समस्या आली नव्हती. अचानक नवे आरोप लावले गेले. लैंगिक शोषणासारख्या कोणत्या घटना ही झाल्या नाहीत. जर झाल्यास तर ते फाशी लावून घेतली. त्यांनी असे ही म्हटले की, ते प्रत्येक तपासासाठी तयार आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.