जगभरात लग्नाबाबत विविध पद्धती आणि नियम आहेत. भारतात अनेक धर्माचे लोक राहतात. धर्मानुसार, संस्कृतीनुसार नियम, रीतीरिवाज प्रत्येकासाठी वेगवेगळे असतात. याशिवाय त्यांच्या परंपराही वेगळ्या आहेत. लग्नाच्या शुभमुहूर्तावर वधू कुठे पांढऱ्या गाऊनमध्ये, तर कुठे काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये सजलेली दिसते. (bride in white)
आपल्या देशात बहुतेक लग्नसमारंभात वधूला लाल रंगाचा पेहराव असतो. लाल रंग शुभ मानला जातो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आपल्या देशात एक गाव असे आहे, जिथे नववधूची विदाई विधवेच्या वेशात होते. एका समाजात, पालक स्वतः आपल्या मुलीला लाल साडीऐवजी पांढर्या रंगाच्या पोशाखात निरोप देतात. लोक असे का करतात? आजच्या लेखात या अनोख्या प्रथेबद्दल जाणून घेऊया. (bride in white)

आई वडीलच मुलीला घालतात पांढरे कपडे
हे अनोखे गाव मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील भामडोंगरी गावात आदिवासी समाजाचे लोक राहतात. या ठिकाणी मुलीच्या लग्नानंतर आई-वडील पांढऱ्या कपड्यात तिची विदाई करतात. या आदिवासी लोकांचे रीतिरिवाज इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. या गावात लग्नानंतर पांढऱ्या कपड्यात मुलीला निरोप देण्याची परंपरा आहे. एवढेच नाही, तर लग्नाला उपस्थित असलेले सर्व लोक पांढऱ्या कपड्यात दिसतात. (bride in white)
हे देखील वाचा: जगातील रहस्यमय नदी! जिच्यात वाहते एकूण ५ रंगांचे पाणी
…म्हणून घातले जातात पांढरे कपडे
भामडोंगरी गावात राहणारे लोक गोंडी धर्माचे पालन करतात. त्यांच्या धर्मानुसार पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. हा रंग पवित्र मानला जातो, कारण त्यात कशाचीही भेसळ नसते. त्यामुळे लग्नाच्या वेळी पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाते. लग्नाला येणारे सर्व लोक देखील पांढरे कपडे घालतात. (bride in white)

वराच्या घरी ३ फेरे घेण्याची प्रथा
येथील लग्नात इतर समाजापेक्षा वेगळ्या प्रथांचे पालन केले जाते. साधारणपणे लग्नाच्या वेळी वधू तिच्या घरी सात फेरे घेते. पण या समाजात वराच्या घरी देखील फेरे घेतले जातात. चार फेरे वधूच्या घरी आणि उरलेले तीन फेरे वराच्या घरी होतात. या गावात राहणारे गोंडी धर्माचे लोक इतर आदिवासी चालीरीतींपेक्षा वेगळे नियम पाळतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की येथे दारूवर पूर्णपणे बंदी आहे. (bride in white)