Home » स्वत:हून ब्राइडल मेकअप करणार असल्यास या टिप्स ठेवा लक्षात

स्वत:हून ब्राइडल मेकअप करणार असल्यास या टिप्स ठेवा लक्षात

लग्नाच्या दिवशी प्रत्येक तरुणीला सुंदर दिसायचे असते. अशातच तरुणी एक महिनाआधीपासून पार्लरमध्ये जाऊन महागड्या ब्युटी ट्रिटमेंट करतात.

by Team Gajawaja
0 comment
bridal makeup tips
Share

Bridal Makeup Tips : लग्नाच्या दिवशी प्रत्येक तरुणीला सुंदर दिसायचे असते. अशातच तरुणी एक महिनाआधीपासून पार्लरमध्ये जाऊन महागड्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. याशिवाय लग्नाच्या दिवशी लूक खुलवण्यासाठी उत्तम मेकअप आर्टिस्टला बुक केले जाते. त्याएवजी तुम्ही स्वत:हून ब्राइडल मेकअप करणार असल्यास काही टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजेत.

-मेकअपचे ट्रायल
तुम्हाला ब्राइडल मेकअप करायचा असल्यास त्याआधी ट्रायल नक्की करा. यामुळे तुम्ही स्वत:हून ब्राइडल मेकअप केल्यानंतर कळेल की, कितपत योग्य केला गेलाय. याशिवाय मेअकप व्यवस्थिती होत नसल्याचे वाटत असल्यास मेअकप आर्टिस्टची मदत घ्या अथवा लग्नासाठी त्यांना बुक करा.

-आयमेकअपकडे लक्ष द्या
तुमचा संपूर्ण लूक कसा असेल हे आयमेकअपवर अवलंबून असते. यामुळेच आधीच ठरवा कोणत्या प्रकारचा आयमेकअप तुम्हाला करायचा आहे. सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट अशी की, डोळ्यांच्या मेकअपसाठी कोणती शेड निवडणार आहात याकडे खास लक्ष द्या.

-हेअरस्टाइलकडे लक्ष द्या
लांबसडक केस महिलांचे सौंदर्य खुलवते. लग्नाच्या दिवशी पार्लरमध्ये जाऊन तयार होणार असाल ते तुम्हाला वेगवेगळ्या हेअरस्टाइलचे ऑप्शन देतात. पण स्वत:हून तयार होण्याचा निर्णय घेतल्यास लग्नाआधी आपल्या पसंतीची हेअर स्टाइल प्रॅक्टिस जरुर करा. जेणेकरुन लग्नाच्या दिवशी हेअर स्टाइल करण्याचे टेंन्शन येणार नाही. (Bridal Makeup Tips)


आणखी वाचा :
फाउंडेशन लावल्यानंतरच चेहरा जाड दिसतो? जाणून घ्या परफेक्ट शेप देण्याची सोपी पद्धत
तेलकट त्वचेवरील मेकअप निघून जातो? लक्षात ठेवा या टिप्स

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.