Home » ब्रेस्ट कँन्सर पासून बचाव करण्यासाठी WHO ने सांगितल्या टीप्स

ब्रेस्ट कँन्सर पासून बचाव करण्यासाठी WHO ने सांगितल्या टीप्स

जगभरात असा कोणताही देश नाही जेथे ब्रेस्ट कँन्सरचे रुग्ण आढळत नाहीत. कँन्सरमुळे होणाऱ्या आजारामध्ये सर्वाधिक प्रमाण हे ब्रेस्ट कँन्सरचे असते.

by Team Gajawaja
0 comment
breast cancer
Share

जगभरात असा कोणताही देश नाही जेथे ब्रेस्ट कँन्सरचे रुग्ण आढळत नाहीत. कँन्सरमुळे होणाऱ्या आजारामध्ये सर्वाधिक प्रमाण हे ब्रेस्ट कँन्सरचे असते. डब्लूचओच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये ६.८५ लाख लोकांचा मृत्यू ब्रेस्ट कँन्सरमुळे झाला होता. तर २३ लाख लोक या आजाराचा सामना करत आहेत. केवळ ०.५ टक्के ते १ टक्के ब्रेस्ट कँन्सरची प्रकरणे ही पुरुषांची असतात. अन्य ९९ टक्के ब्रेस्ट कँन्सरचा महिला सामना करत असतात. या आजारात ब्रेस्टच्या आतमध्ये सेलचा ग्रोथ अनियंत्रित होतो. त्याच कारणास्तव ट्युमर होतो. सुरुवातीला ब्रेस्ट कँन्सर (Breast cancer) आरोग्याला फार मोठे नुकसान होत नाही.

काही आजाराने हा ठिक होऊ शकतो. मात्र जेव्हा तो अधिक ठिकाणी फैलावला गेला तर त्यापासून बचाव करणे मुश्किल होते. याच कारणास्तव ट्युमर ब्रेस्टमध्ये गाठीच्या रुपात किंवा मोठा दिसून येतो. सुरुवातीला जर याची ओळख पटल्यास तर ब्रेस्ट कँन्सरवर उपचार करणे सोप्पे होते. यासाठी डब्लूएचओने ब्रेस्ट कँन्सर पासून बचाव करण्यासाठी महिलांना काही खास टीप्स दिल्या आहेत.

या महिलांमध्ये असतो सर्वाधिक ब्रेस्ट कँन्सरचा धोका
डब्लूचओच्या मते, महिलांमध्ये वय, लठ्ठपणा, अल्कोहोलचे सेवन, फॅमिली हिस्ट्री, रेडिएशनसोबत संपर्क, प्रजनन हिस्ट्री, पहिले बाळ कधी झाले, तंबाखूचा वापर, पोस्टमेनोपॉड हार्मोन थेरपी कारणीभूत असतात. मात्र अर्ध्याहून अधिक महिलांमध्ये कोणत्याही जोखमीशिवाय ब्रेस्ट कँन्सर होतो.

ब्रेस्ट कँन्सरपासून बचाव करण्यासाठी WHO ने सांगितले नियम
-आजकाल काही महिला बाळाला त्याच्या जन्मानंतर एक-दोन महिन्यांनी लगेच दूध पाजण्यास बंद करतात. मात्र अधिक काळ जरी दूध देत राहिले तरीही ब्रेस्ट कँन्सरची जोखिम निर्माण होऊ शकते.
-अधिक वजन खरंतर अनेक आजारांचे आमंत्रण असते. मात्र अधिक वजन असलेल्या महिलांमध्ये ब्रेस्ट कँन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लठ्ठपणावर नियंत्रित करावा.
-अल्कोहोले सेवन करणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कँन्सर होण्याचा धोका असते. त्यामुळे महिलांनी ब्रेस्ट कँन्सरपासून दूर राहण्यासाठी अल्कोहोलचे सेवन करू नये. (Breast cancer)
-जर तुम्ही सिगरेट पीत असाल तर ब्रेस्ट कँन्सरचा धोका अधिक वाढला जातो.
-काही आजार किंवा आपण सुंदर दिसावे म्हणून महिला हार्मोनचा वापर करतात. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असे करू नये.
-काही महिलांना लॅबमध्ये काम करावे लागते जेथे अधिक रेडिएशन असतात. अशातच त्यांच्या मध्ये ब्रेस्ट कँन्सरचा धोका वाढला जातो.

हेही वाचा- गरजेपेक्षा अधिक टीव्ही पाहणे मुलांच्या आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

महिलांनी या फूड्सचे सेवन करावे
महिलांनी अशा फूड्सची निवड केली पाहिजे त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँन्टीऑक्सिडेंटचे प्रमाण अधिक असेल. यासाठी दररोज सलाद, सीड्स, नट्स, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं खावीत. भोपळ्याच्या बिया, नाचणी, ज्वारी, बाजरी, बदाम, आक्रोड यांचे सुद्धा सेवन दररोज करावे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.