सर्व धातुंमध्ये पितळ सर्वाधिक शुभ आणि पवित्र मानले जाते. जर पुजेबद्दल किंवा धार्मिक परंपरेबद्दल बोलायचे झाल्यास या वेळी सुद्धा अन्य कोणत्याही धातुची भांडी वापरण्याऐवजी पितळेची भांडी (Brass utensils) वापरली जातात. धार्मिक शास्र आणि ज्योतिषात ही पितळेच्या भांडी ही पुजेसाठी सर्वाधिक उत्तम असल्याचे म्हटले आङे. पितळेची भांडी वापरुन पूजा केल्यास फक्त देवी-देवताच प्रसन्न होत नाही तर यामुळे ग्रहांची शांती सुद्धा होते. तर जाणून घेऊयात पूजेसाठी पितळेचीच भांडी का वापरली जातात याबद्दल अधिक.
ज्योतिष शास्रानुसार, पितळ किंवा ब्रासच्या भांड्यांचा रंग हा पिवळा असतो. त्यामुळे धार्मिक किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी पिवळा रंग हा शुभ मानला जातो. पितळ हा शब्द पीत पासून तयार करण्यात आला आहे तर संस्कृतात पीतचा अर्थ पिवळा होतो. तर पिवळा रंग हा भगवान विष्णूला समर्पित करतो. पितळेच्या भांड्याचा वापर करुन गुरु ग्रहाचा सुखद प्रभाव जीवनावर पडतो. या व्यतिरिक्त भलगाव गणेशाला सुद्धा पिवळा रंग अत्यंत प्रिय असतो. पुजेवेळी देवाला दाखवला जाणारा नैवेद्य हा सुद्धा पितळेच्या भांड्यात तयार केला पाहिजे. तसेच पितळेच्या भांड्यातच तो देवाला दाखवला पाहिजे. शंकराला सुद्धा पितळेच्या कलशाने अभिषेक करण्याचे सांगितले आहे. या व्यतिरिक्त घरातील पूजेला सुद्धा पाण्याने भरलेला पितळेचा कलश आवश्यक ठेवावा.
हे देखील वाचा- वास्तुकलेचा अद्भुत अनुभव! दिवसा शुभ्र दिसणारे हे मंदिर संध्याकाळी दिसते वेगवेगळ्या रंगछटांमध्ये…
पितळेच्या भांड्यांचा वापर फक्त पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमांसाठी नव्हे तर हिंदू धर्मात पितळेच्या भांड्याचा वापर हा जन्म ते मृत्यू पर्यंत केला जातो.तर पूजेवेळी तुम्ही पितळेसह तांब आणि कांस्यची भांडी सुद्धा वापरु शकता. परंतु कधीच लोखंड, अॅल्युमिनियम किंवा काचेची भांडी ही पूजेसाठी वापरु नका. या धातुने तयार करण्यात आलेली भांडीच नव्हे तर मुर्त्या सुद्धा अशुभ मानल्या जातात. पितळेसह शास्रात सोन, चांदी आणि तांब्याची भांडी उत्तम असल्याचे मानले आहे.
धार्मिक मान्यतेनुसार पितळेची भांडी (Brass utensils) वापरुन पूजा केल्यास देवी-देवता प्रसन्न होतात. तसेच पितळेच्या पात्रात तुळशीला पाणी दिल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यामुळे घरात सुख-समृद्धी कायम टिकून राहते.त्याचसोबत घरात पितळेच्या भांड्यात जेवण तयार केले तर ते स्वादिष्ट होते आणि आरोग्यासह शरिराला तेज प्राप्त होते. पितळेचे भांड लवकर गरम होते त्यामुळे गॅस आणि अन्य उर्जेची कमी बचत होते. पितळेचे भांड हे अन्य भांड्यांपेक्षा अधिक मजबूत असते.