स्वप्न पाहणे किंवा ती पडणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींमधून मिळणारे संकेत हे काही वेळेस हलक्यात घेणे योग्य नव्हे. कारण स्वप्नात दिसणाऱ्या घटना काही वेळेस शुभ किंवा अशुभ ही असू शकतात. मात्र स्वप्न तुम्हाला कोणत्या वेळेत पडले हे सुद्धा फार महत्वाचे असते, त्यावरुनच ठरते की ते शुभ आहे की अशुभ. जसे की, तुम्ही ऐकले असेल पहाटे पडलेले स्वप्न खरं होते. तर स्वप्न शास्रात असे लिहिले आहे की, मध्यरात्री ३ ते पहाटे ५ वाजल्याच्या दरम्यान पडलेली स्वप्न ही खरी होतात. अशातच जर स्वप्न तुम्हाला ब्रम्ह मुहूर्तावर पडले असेल तर त्याचे महत्व अधिकच वाढते. त्यामुळे आपण आज अशाच काही स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्याला ब्रम्ह मुहूर्तावेळी पडतात आणि धनलाभ होण्याचे संकेत खरंच देतात का त्याबद्दल अधिक.(Bramha Muhurat Dreams)
-हसणारे बाळं
स्वप्न शास्रानुसार, ब्रम्ह मुहूर्तावेळी जर तुम्हाला स्वप्नात हसणारे-खेळणारे बाळं दिसले तर तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार असल्याचे संकेत दिले जातात.
-स्वत:ला नदीत स्नान करताना पाहणे
ब्रम्ह मुहूर्तावेळी असे स्वप्न पडणे फार शुभ मानले जाते. कारण कोणताही व्यक्ती जर असे स्वप्न पाहत असेल तर त्याने कोणाला उधार दिलेले पैसे असतील ते त्याला लवकरच मिळणार असतात.
-पाण्याने भरलेले मटकं पाहणे
स्वप्नात तुम्ही पाण्याने भरलेले मटकं किंवा कलश पाहिल्यास त्याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला धन लाभ होणार आहे. अशातच हे स्वप्न ब्रम्ह मुहूर्तावर पडले असेल तर तुम्हाला भासत असलेली पैशांसंबंधतची समस्या सहजपणे पूर्ण होणार आहे.
हे देखील वाचा- एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवणयासाठी विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील ‘ही’ योगासन
-तुटलेला दात दिसणे
व्यक्तीला जर स्वप्नात स्वत: चा तुटलेला दात दिसला तर ते स्वप्न शुभ आणि फलदायी मानले जाते कारण स्वप्न शास्रानुसार, व्यक्तीला या स्वप्नामुळे नोकरी आणि व्यापारात लाभ होणार असल्याचे संकेत मिळतात.(Bramha Muhurat Dreams)
-अन्नधान्याचा साठा दिसणे
स्वप्न शास्रानुसार जर व्यक्तीला सकाळच्या वेळेस अन्नधान्याचा साठा दिसला किंवा तो त्यावर चढलेला दिसत असेल तर लवकरच तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता असते. असे स्वप्न पाहिल्यानंतर डोळे उघडल्यास तर आणखीच उत्तम मानले जाते. अशा प्रकारचे स्वप्न तुम्हा घराची प्रगती होणार असल्याचा इशारा देतात.