मथुरा, वृंदावनसह संपूर्ण ब्रजमध्ये आता होळीच्या रंगांची उधळण सुरु झाली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात होळीचा सण साजरा होत असला तरी या ब्रजमध्ये होणा-या होळीची लोकप्रियता मोठी आहे. मथुरा, वृंदावन, गोकूळ आणि बरसाना या भागात होणा-या होळीला भारतातील कानाकोप-यातील भाविकांसह आता परदेशातील भाविकही मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. ही ब्रजची होळी पाहण्यासाठी आणि त्याच्या रंगात रंगण्यासाठी मथुरा, वृंदावनमध्ये भाविकांनी गर्दी होत आहे. (Holi)
मथुरा, वृंदावन, गोकूळ आणि बरसानामध्ये होळी ही काही एक दिवसाची नसते. या भागात जवळपास चाळीस दिवस होळी साजरी केली जाते. या भागात होळीचा सण हा वसंत पंचमीपासून सुरू होतो. येथे फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदा तिथीला, रंगांची होळी केली जाते. या दरम्यान येथे प्रत्येक दिवस एक उत्सव साजरा होतो. मथुरा, वृंदावन येथील प्रत्येक मंदिरात आलेल्या भाविकांचे स्वागत रंग उधळून केले जाते. सोबत फुलांचीही होळी साजरी केली जाते. याच मथुरा, वृंदावनचा ब्रज असा उल्लेख केला जातो. या ब्रजमधील होळीसाठी प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि श्रीजी, म्हणजेच, देवी राधाही येतात, अशी येथील लोकांची भावना असते. (Social News)
या होळीची सुरुवात वसंत पंचमीपासून होते. वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात यावेळी भक्तांची मोठी गर्दी होते. या मंदिरा पहाटेच्या वृंदावनातील ठाकूर बांके बिहारी मंदिरात, सकाळच्या शृंगार आरतीनंतर, भगवानांच्या गालावर गुलाल लावला जातो. यानंतर, प्रसादाच्या स्वरूपात भाविकांवर गुलाल शिंपडला जातो आणि यासोबत ब्रजच्या होळीचा उत्सव देखील सुरू होतो. ब्रज होळीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि दररोज होळीचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून हजारो लोक ब्रजमध्ये येतात. या जगप्रसिद्ध ब्रजहोळीमध्ये ज्यांना सहभागी व्हायचे असेल, त्यांच्यासाठी या होळीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यावर्षी ब्रजमध्ये 13 मार्चच्या रात्री होलिका दहन होईल. त्यानंतर 14 मार्च रोजी रंगांची होळी साजरी होईल. ब्रजमध्ये, होळी बांके बिहारी मंदिरापासून सुरू होते आणि रंगनाथ मंदिरात संपते. यावेळी या भागातील महिला होळीची गाणी म्हणतात. ही एक प्राचीन परंपरा असून याला समाज गायन असे म्हणतात. द्वापर काळापासून ही परंपरा आहे. (Holi)
3 फेब्रुवारीला वसंत पंचमीला ब्रजमध्ये होळीचा ध्वजारोहण झाले. त्यानंतर 7 मार्च रोजी नंदगाव आणि बरसाना येथे फाग निमंत्रणे दिली जातील. याच दिवशी संध्याकाळी लाडलीजी मंदिरात लाड्डुमार होळी उत्सव साजरा होईल. त्यानंतर 8 मार्च रोजी बरसाना येथील रंगिली परिसरात प्रसिद्ध लठ्ठमार होळी साजरी होणार आहे. 9 मार्च रोजी नंदगाव मध्ये लठ्ठमार होळी साजरी होईल. 10 मार्च रोजी बांकेबिहारी मंदिरात फुलांची होळी खेळली जाईल. याच दिवसापासून कृष्णजन्मभूमीवर हुरंगाचे आयोजन केले जाईल. 11 मार्च रोजी गोकुळमधील रामरेती आणि द्वारकाधीश मंदिरात होळी खेळली जाईल. तसेच 12 मार्च रोजी वृंदावनातील बांके बिहारी मंदिरात होळी साजरी केली जाईल. तर 13 मार्च रोजी होलिका दहन केले जाईल. त्यानंतरचा दिवस म्हणजे, 14 मार्च रोजी संपूर्ण ब्रज संगमय होणार आहे. यादिवशी ब्रजमध्ये होळी साजरी होणार आहे. (Social News)
===============
हे देखील वाचा : Taliban : तालिबानने बामियानमधील बुद्धमूर्ती नष्ट का केल्या?
Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !
===============
15 मार्च रोजी बलदेव दौदी मंदिरात हुरंगा बाजवला जाईल. तर 16 मार्च रोजी नंदगावमध्ये हुरंगा खेळला जाईल. 17 मार्च रोजी जाव गावात पारंपारिक हुरंगा वाजवला जाईल. याशिवय 18 मार्च रोजी मुखराय येथे पारंपारिक चारकुला नृत्याचे आयोजन करण्यात येईल. 22 मार्च रोजी वृंदावन येथील भव्य अशा रंगनाथ मंदिरात होळी खेळली जाईल. या होळीनंतर संपूर्ण ब्रजमध्ये चालू असलेल्या 40 दिवसांच्या होळीच्या उत्सवाची समाप्ती होईल. ब्रजच्या या होळीची अनेकांना मोहिनी आहेच, त्यातही बरसाना येथे होणा-या लठ्ठमार होळीसाठीही मोठ्या प्रमाणात भाविक बरसानामध्ये हजर होतात. 8 मार्च रोजी होणा-या या लठ्ठमार होळीसाठी बरसाना येथील राधारानी मंदिराला सजवण्यात येत आहे. बरसाना येथे जाण्यासाठी वृंदावन, मथुरा आणि गोळूळमधून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. (Holi)
सई बने