सनातन धर्मात ब्रम्ह मुर्हूताला अत्यंत शुभ आणि पवित्र मानले गेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जो व्यक्ती ब्रम्ह मुर्हूतावर उठतो त्याच्या आयुष्यात यशाचे मार्ग खुले होतात. ब्रम्ह मुहूर्तावर उठणारा व्यक्ती सदैव निरोगी आणि उर्जावान राहतो. तु्म्ही सुद्धा तुमच्या आजी-आजोबांकडून ऐकले असेल की, मनुष्याने नेहमीच ब्रम्ह मुहूर्तावर उठले पाहिजे. ब्रम्ह मुहूर्त हिंदू धर्मात आध्यात्मिक आणि मानसिक रुपात सर्वोत्तम मानला गेला आहे. परंतु काही काम अशी असतात जी ब्रम्ह मुहूर्तावेळी चुकून ही करु नयेत. (Brahma muhurta)
ज्योतिष विज्ञानानुसार, ब्रम्ह मुहूर्त हा पहाटे ४ वाजल्यापासून ते सकाळी ५.३० दरम्यान असतो. ही वेळ दिवसातील सर्वोत्तम वेळ मानली जाते आणि यावेळी काही गोष्टी करणे वर्जित असते. तसेच प्राचीन काळात ऋषीमुनी ध्यान-साधना करण्यासाठी ब्रम्ह मुहूर्ताला सर्वोत्तम वेळ मानायचे. धार्मिक शास्रानुसार, ब्रम्ह मुहूर्तावेळी करण्यात आलेल्या पूजेचे फळ लवकर मिळते. यावेळी झोपणे वर्जित मानले जाते.
-नकारात्मक विचार
धार्मिक मान्यतांनुसार, जो व्यक्ती ब्रम्ह मुहूर्तावेळी नकारात्मक विचार करत असेल किंवा वाईट विचार मनात आणतो त्याचा परिणाम त्याच्यावर संपूर्ण दिवस होतो. ब्रम्ह मुहूर्तावेळी येणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे व्यक्ती तणावाखाली राहतो.
-कोणत्याही गोष्टीचे सेवन करू नका
धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही गोष्टीचे सेवन ब्रम्ह मुहूर्तावेळी कधीच करू नये. कोणतेही फूड्स सुद्धा यावेळी खाऊ नये.
-दुर्व्यवहार करू नये
ब्रम्ह मुहूर्तावेळी चुकून ही कोणासोबत दुर्व्यवहार किंवा अनादर करू नये. असे केल्याने तुमच्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात.
-करु नका ही चूक
धार्मिक शास्रानुसार, ब्रम्ह मुहूर्तावेळी कधीच प्रणय संबंध प्रस्थापित करू नयेत. यावेळी डोळे उघडल्यानंतर देवाच्या भक्तीत लीन होणे सर्वोत्तम मानले जाते.
ब्रम्ह मुहू्र्तावेळी उठण्याचे फायदे
-धार्मिक मान्यतेनुसार, ब्रम्ह मुहूर्तावर आपल्या देवी-देवता आणि पितृ आपल्या घरात आगमन करतात. त्यांच्यामुळे आपल्या घराची उन्नती होते.
-जेव्हा व्यक्ती ब्रम्ह मुहूर्तावेळी उठतो तेव्हा वातावरणातील सकारात्मक उर्जा मनुष्याच्या शरिरात प्रवेश करते, त्यामुळे मनात सकारात्मक विचार ही येतात.
-ब्रम्ह मुहूर्त मेडिटेशन आणि ब्रम्ह ज्ञानासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे.
-यावेळी उठल्यास शरिरातील शक्ती आणि सहनशीलता वाढते. (Brahma muhurta)
-जो व्यक्ती ब्रम्ह मुहूर्तावेळी उठतो त्याला उत्तम आरोग्य, बल, बुद्धी आणि विद्या प्राप्त होते. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीला आयुष्यात अधिक यश मिळते.
हेही वाचा- दक्षिण दिशेला पाय करुन का झोपू नये?
ब्रम्ह मुहूर्तावेळी या मंत्राचा करा जाप
धार्मिक ग्रंथानुसार जेव्हा तुम्ही ब्रम्ह मुहूर्तावेळी उठता तेव्हा सर्वात प्रथम आपल्या दोन्ही हातांकडे पाहून “ओम कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद प्रभाते कर दर्शनम्” या मंत्राचा जाप करणे सर्वोत्तम मानले गेले आहे.