जगातील २० टक्के हिरे अफ्रिकन देश बोत्सवानामधील खाणीमधून मिळतात. आता याच खाणीतून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा मिळाला आहे. हा २,४९२ कॅरेटचा असून अद्याप त्याचे मुल्य किती असेल याचा अंदाज जाणकारांना घेता आलेला नाही. जगातील सर्वात मोठा हिरा कलिनन या नावाचा असून तो ब्रिटीश राजघराण्याच्या मालकीचा आहे. बोत्सवाना येथे मोठ्या प्रमाणात हि-यांच्या खाणी आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हि-यांचा शोध घेण्यात येतो. आता सापडलेला हिरा हा क्ष-किरण तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधण्यात आला असून त्याचा दर्जा हा उच्च असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या १०० वर्षात सापडलेला हा सर्वात मोठा हिरा आहे. कलिनन हा सर्वात मोठा हिरा असून तो १९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील खाणीत सापडला होता. आता जवळपास शंभर वर्षानंतर सर्वात मोठा हिरा सापडल्यामुळे कॅनेडियन फर्म लुकारा डायमंड यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Botswana Second Largest Diamond)
आफ्रिकन देश बोत्सवाना येथील कॅनेडियन फर्म लुकारा डायमंडच्या खाणीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा सापडला आहे. हा हिरा २,४९२ कॅरेटचा आहे. या शोधानंतर कॅनडातील खाण कंपनीचे अधिकारी आणि बोत्सवाना सरकारनेही आनंद व्यक्त केला आहे. २,४९२ कॅरेटचा हा हिरा म्हणजे देशातील सर्वात मोठा नैसर्गिक हिरा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्यात हा हिरा सापडला ती खाण बोत्सवानाची राजधानी गॅबोरोनपासून ५०० किमी अंतरावर आहे. कैरो नावाच्या या खाणीत यापूर्वी २०१९ मध्ये १७५८ कॅरेटचा सावेलो हा हिरा सापडला होता. हा हिरा फ्रेंच फॅशन कंपनी लुई व्हिटॉनने विकत घेतला. पण शेवटपर्यंत त्याची किंमत कोणालाही कळली नाहे. दक्षिण अफ्रिकेतील हि-यांच्या खाणीत आत्तापर्यंत असेच मोठे हिरे सापडले आहेत. १९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत ३,१०६ कॅरेटचा कलिनन हिरा सापडला आहे. हा हिरा आत्तापर्यंतच्या हि-यांमध्ये सर्वात मोठा हिरा आहे. या हि-याची मालकी ब्रिटीश राजघराण्याकडे असून राजाच्या छडीमध्ये त्याचा समावेश असल्याची माहिती आहे. (Botswana Second Largest Diamond)
कॅनेडियन कंपनी लुकारा डायमंड कॉर्प गेल्या अनेक वर्षापासून बोत्सवानामध्ये हिरे संशोधानाचे काम करते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान संबंधिक खाणीत लावण्यात आले आहे. हिरे काढतांना मुळ हि-याच्या आकाराला कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी एक्सरे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. आता मिळालेला हिराही तसाच शोधून काढण्यात आला आहे. बोत्सवाना हिरे उत्पादन करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि अलीकडच्या काही वर्षांत जगातील सर्व मोठे हिरे येथे सापडले आहेत. हिरा जेवढा मोठा तेवढी त्याची किंमत असते, शिवाय त्याचा दर्जाही महत्त्वाचा असतो. आता मिळालेला हिरा हा उच्च दर्जाचा असल्यामुळे त्याची किंमत नेमकी किती हे समजण्यासाठीही काही दिवस जाणार आहेत. २०१७ मध्ये, अशाच प्रकारे १,१११ कॅरेटचा लेसेडी ला रोना हिरा ४४४ कोटी रुपयांना एका ब्रिटीश ज्वेलरने विकत घेतला. त्यामुळे आता मिळालेला हिरा हा त्या हिऱ्याच्या दुप्पट आकाराचा आहे. त्यामुळे या हिऱ्याची किंमत १.००० कोटींहून अधिक असू शकते. (Botswana Second Largest Diamond)
आत्तापर्यंत १९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ३१०६ कॅरेटच्या कलिनन हि-याबाबत अनेक आख्यायिका सांगण्यात येतात. खाण मालक थॉमस कलिनन यांच्या नावावरून त्या हि-याला कलिनन हे नाव देण्यात आले. १९०७ मध्ये ब्रिटीश राजा एडवर्ड सातवा यांना हा हिरा देण्यात आला. ॲमस्टरडॅमच्या जोसेफ आशेर यांनी कलिनन हि-याला आकार दिला. त्यासाठी त्याचे 9 तुकडे केले. कुलीनन हिऱ्याला आफ्रिकेचा ग्रेट स्टार देखील म्हणतात. त्याचा सर्वात मोठा तुकडा ब्रिटनचा राजा चार्ल्स यांच्या राजदंडात आहे. त्याचा दुसरा सर्वात मोठा तुकडा राजघराण्याच्या इम्पीरियल स्टेट क्राउनमध्ये लावण्यात आला आहे. (Botswana Second Largest Diamond)
======
हे देखील वाचा : हि-यांचा ग्रह !
======
सध्या बोत्सवानाच्या अनेक खाणींमध्ये हि-याचे उत्खलन केले जाते. बोत्सवानाने गेल्या महिन्यात खाणकाम संदर्भात नवीन कायदा प्रस्तावित केला आहे. या अंतर्गत, परवाना मिळाल्यानंतर खाण कंपन्यांना स्थानिक गुंतवणूकदारांना २४ टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे. त्यामुळे हा मोठा हिरा जरी कॅनडीयन कंपनीला मिळाला असला तरी त्याच्या किंमतीपैकी २४ टक्के किंमत बोत्सवाना सरकारला मिळणार आहे. (Botswana Second Largest) Diamond
सई बने.