जगभरातील महिला सुंदर दिसण्यासाठी खुप काही करतात. मात्र त्या तमाम महिलांसाठी पुढील रिपोर्ट हा फार धक्कादायक असू शकतो ज्या आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दिसून नये म्हणून बोटॉक्स इंजेक्शनचा वापर करुन त्या घालवतात. सौंदर्य देणाऱ्या या इंजेक्शन संदर्भातीलच एक भयंकर रिपोर्ट समोर आला आहे. यावर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार बोटॉक्स इंजेक्शन व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम करतो. हळूहळू त्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता बंद करतो.(Botox Injections)
अशातच या शोधामुळे त्या महिलांना नाराज केले आहे जे कला, फॅशन आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहेत. वयाने मोठ्या असल्या तरीही त्या तरुण कलाकारांना मागे टाकण्यासाठी बोटॉक्स इंजेक्शनचा सर्रास वापर करतात. तर पाहूयात या रिसर्च मधून नक्की काय समोर आले आहे.
-प्राप्त झालेल्या माहितीनुसार ब्रिटेन मध्ये प्रत्येक वर्षी जवळजवळ ९ लाख महिलांना हे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन कपाळ, डोळे आणि तोंडाच्या आजूबाजूला दिले जाते. या इंजेक्शनमुळे त्वचेचे आकुंचन होत नाही. त्यावरील सुरकुत्या दूर केल्या जातात. हेच कारण आहे की, फिल्म, मॉडेलिंग आणि कॉर्पोरेट फिल्डमध्ये याचा वापर केला जातो. इंजेक्शनच्या माध्यमातून बोटुलिनम टॉक्सिन सारखे केमिकल चेहऱ्याच्या आतमध्ये टाकले जातात.
-शोधातून असे समोर आले आहे की, इंजेक्शन तुमची विचार शक्ती पूर्णपणे नष्ट करते. सर्वसामान्यपणे एखादी संवेदनशील व्यक्ती ज्या प्रकारे दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करते पण या इंजेक्शन नंतर व्यक्तीची ती क्षमता सुद्धा कमी होते.
-अभ्यास हा कॅलिफोर्नियातील युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिक आणि संशोधकांसोबत बोटॉक्सचे मालक सुद्धा यामध्ये भाग घेतला. त्यांनी आपल्या निगराणी खाली दहा महिलांच्या कपाळावर बोटॉक्स इंजेक्शन दिले आणि त्यानंतर दोन-तीन आठवड्यांनी त्यांचे मेंदूचे स्कॅनिंग ही केले. अशातच समोर आले की, त्यांच्या भावना प्रभावित झाल्या आहेत.
-दक्षिण ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी रिसर्चर डॉ. फर्नांडो मार्मोलेजो-रामोस यांचे सुद्धा असे म्हणणे आहे की, या इंजेक्शनच्या वापरामुळे तुम्हाला दुसऱ्यांच्या भावना कळत नाहीत. दुसऱ्यांमध्ये तुम्ही स्वत:ला वेगळे आणि एकटे समजता.(Botox Injections)
हे देखील वाचा-खुप वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने होऊ शकतात ‘या’ समस्या
-एका क्लिनिक अधिकाऱ्यांचे सुद्धा हेच म्हणणे होते की, बोटॉक्समुळे तुमच्या भावना प्रभाविच होऊ शकतात. काही लोक फॅशनच्या नादात चेहरा आकर्षक दिसण्यासाठी याचा वापर करतात. पण त्याचे परिणा उलट होतात.