तुमच्यासोबत सुद्धा काही वेळेस असे झाले असेल की, एखादे काम करताना अचानक मनात आलेला एखादा विचार तुम्हाला विचलित करतो. अशा स्थितीत तुम्हाला कामकाज बाजूला ठेवावेसे वाटते. अशा प्रकारच्या काही स्थिती निर्माण होतात त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांच्या गोष्टींमुळे सुद्धा चिडचिड होते. तुमच्या मनाला त्या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात ज्या तुम्ही करत आहात असे वाटत राहते. तुमच्यासोबत सुद्धा असेच होत असेल तर समजून जा तुमचे मन अशांत आहे. जेव्हा मन अशांत असते तेव्हा प्रत्येक गोष्टी तुम्हा निगेटिव्ह वाटतात. अशातच मनाला शांत करणे अत्यंत गरजेचे आहे. मन शांत करण्यासाठी तुम्ही काही प्रकारचे उपाय करू शकता. त्यामुळे तुमचे लक्ष सुद्धा केंद्रित करण्यास मदत होईल.(Boost mental health)
विचारांपासून पळू नका
जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या मनात चांगले-वाईट विचार येतात. अशातच मनाला शांत करण्यासाठी विचारांपासून दूर पळण्याची गरज नाही. तर मनाला शांत करणे अशावेळी महत्त्वाचे असते. मनाला शांत करण्यासाठी तुम्ही योग्य-अयोग्य मधील फरक समजून घेत त्यानुसार रिअॅक्ट केले पाहिजे.
जर तुम्ही तुमच्याच विचारांपासून पळ काढत असाल तर अधिक स्ट्रेस येईल. त्यामुळे विचारांना आधी समजून घ्या आणि मन शांत कसे करता येईल याचा विचार करा.
एक्सरसाइज करणे गरजेचे
मनावर ताबा मिळवण्यासाठी आपल्या विचारांवर कंट्रोल करणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला स्ट्रेस फ्री आणि डिप्रेशनपासून दूर राहणे गरजेचे आहे. स्ट्रेस आणि डिप्रेशन फ्री लाइफसाठी नियमित रुपात एक्सरसाइज करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुमचे तन आणि मन ही शांत होते.
स्वत:ला व्यस्त ठेवा
जेव्हा तुमच्याकडे रिकामा वेळ असतो तेव्हा मनात विविध विचार येत राहतात. या विचारांमध्ये सर्वाधिक विचार हे वाईट असतात. अशातच कोणत्याही कारणास्तव रिकामे बसणे योग्य नव्हे. खासकरुन जेव्हा तुम्ही स्ट्रेच्या स्थितीत असता. प्रयत्न करा की, तुम्ही स्वत: ला व्यस्त ठेवाल. व्यस्त राहिल्याने व्यक्तिच्या मनात वाईट विचार कमी येतात. त्याचसोबत तुमचे मानसिक आरोग्य ही स्थिरावले जाते.
विचार लिहा
मनात आलेले विचार तुम्ही लिहित असाल तर तुमचे मन हलके होण्यास मदत होईल. तुम्हाला शांत वाटेल. जर तुम्हाला निगेटिव्ह विचार येत असतील तर सर्वात प्रथम ते एखाद्या वहीवर किंवा पानावर लिहा. असे केल्याने तुम्हाला तुमचे मन हलके आणि फ्रेश झाल्यासारखे वाटेल. (Boost mental health)
मेडिटेशन करा
मनाच्या शांतीसाठी सकाळी उठून मेडिटेशन करणे अत्यंत गरजेचे आहे. खासकरुन जेव्हा तुम्ही एखाद्या स्ट्रेसच्या स्थितीत असता. दररोज सकाळी उठून योगाभ्यास किंवा मेडिटेशन केल्यास तर याचा फायदा नक्कीच होईल. तुमचे मन शांत होईल आणि तुम्ही सकारात्मक पद्धतीने विचार करू शकता.
हेही वाचा- बसून-बसून झोपणे ठरु शकते जीवघेणे
शरीराला हेल्दी ठेवायचे असेल तर मन शांत असणे गरजेचे आहे. जर मन शांत ठेवायचे असेल तर नकारात्मक विचारांपासून दूर रहावे लागेल. यासाठी तुम्ही वरील काही टीप्सचा वापर करू शकता.
