Home » सहकाऱ्यांशी उत्तम संबंध टिकून राहण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर फॉलो करा

सहकाऱ्यांशी उत्तम संबंध टिकून राहण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर फॉलो करा

by Team Gajawaja
0 comment
Bond with colleagues
Share

कार्यालयात आपल्या सहकाऱ्यांशी उत्तम नाते ठेवणे सर्वांनाच आवडते. परंतु काही लोक त्यासाठी प्रयत्न करत असले तरीही तसे होत नाही. त्यांना तुमच्या काही गोष्टी खटकतात. त्यामुळे पुढे जाऊन वाद ही निर्माण होण्याची शक्यता असते. अशातच कार्यालयात गुड रिलेशनशिप ठेवण्यासाठी केवळ पुढील काही टीप्स जरुर फॉलो करा. (Bond with colleagues)

ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी मजबूत नाते ठेवणे फायद्याचे असते. ऐवढेच नव्हे तुमच्यावरील कामाचा बोझा ही कमी होतो आणि कठीण टास्कमध्ये डील करणे ही सोप्पे होते. तुमच्या सहकाऱ्यासोबतचे उत्तम संबंध तुमचा आत्मविश्वास ही वाढवू शकतात.

-सहकाऱ्यांशी हसा
ऑफिसच्या हसकाऱ्यांशी उत्तम संबंध निर्माण करण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर हसू आणा.खरंतर जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील हास्य समोरच्या व्यक्तीला भावते तेव्हा तो तुमच्याशी कनेक्ट होतो. अशातच सहकाऱ्यांशी हसा.

-सहकाऱ्यांचे सुद्धा ऐका
कार्यालयात तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत बोलणे टाळत असाल किंवा त्यांच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष करत असाल तर त्यापासून दूर रहा. त्यामुळे सहकाऱ्यांचे सुद्धा काही वेळेस ऐकत जा. ते भले सल्ला देतील पण तो वेळोवेळीच वापरावे असे नाही. पण तुम्हाला सहकाऱ्याशी उत्तम संबंध ठेवायचे असतील तर सहकाऱ्यांचे सुद्धा ऐका.

-चहाच्या ब्रेकसाठी जा
सहकाऱ्यांसोबत वेळ मिळेल तेव्हा चहाच्या ब्रेकसाठी जा. परंतु नेहमीच असे करणे टाळा. पण कधीतरी तुम्ही टी ब्रेकसाठी जा आणि तेथे तुमचा वेळ त्यांना ही द्या. (Bond with colleagues)

-शो ऑफ करण्यापासून दूर रहा
कही वेळेस सहकाऱ्यांवर आपली छाप पाडण्यासाठी अधिकच शो ऑफ केले जाते. अशातच तुमचे सहकारी तुम्हाला अधिक महत्व देत नाहीत. त्यामुळे सहकाऱ्यांच्या समोर तुम्ही जसे आहात तसेच रहा. यामुळे तुमचे सहकाऱ्याशी असलेले नाते ही मजबूत होईल.

-लंचसाठी एकत्रित बसा
ऑफिसच्या वेळी काही लोक लंचसाठी एकटे बसणे पसंद करतात. पण सहकाऱ्यांसोबत लंचसाठी बसल्यास मैत्री वाढू शकते. त्यामुळे लंचसाठी सुद्धा एकत्रित बसण्याचा प्रयत्न करा.

हे देखील वाचा- झोपली तेव्हा ३२ वर्ष पण जाग येताच झाली होती १७ वर्षाची, मुलाऐवजी प्रियकराला शोधू लागली

-उगाचच बोलणे टाळा
जर तुम्हाला कार्यालयातील सहकाऱ्यांशी उत्तम संबंध जपायचे असतील तर त्यांच्याशी बोलताना ही काही गोष्टींचा विचार करा. उगाचच एखाद्याची थट्टा करणे किंवा काही माहिती नसताना माहित असल्यासारखे दाखवणे टाळा. समोरच्या व्यक्तीला तुम्ही दिखावा म्हणून वागत असल्याचे कधीच जाणवून देऊ नका.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.