नावात काय आहे हे शेक्सपिअरचे वाक्य जगप्रसिद्ध आहे. मात्र नावातच सर्वकाही आहे. पण उत्तर कोरियामध्ये ठेवण्यात येणा-या नावात बरचं काही असणार आहे. आणि हे बरच काही म्हणजे, बॉम्ब, तोफा आणि सॅटेलाईट आहे. अशी कोणाची नावे असतील का….पण उत्तर कोरियाची बातच काही वेगळी आहे. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांनी एक विचित्र फर्मान काढलं आहे. हे फर्मान ऐकून तुम्हाला कदाचित हसायला येईल पण उत्तर कोरियामधील पालकांनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे. आपल्या मुलांची नावं गोड असावीत असं प्रत्येक पालकांना वाटतं. पण हुकुमशाह किम जोंग उनने देशात नव्या जन्म झालेल्या बालकांची नावं बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाइट ठेवावीत असे आदेश दिले आहेत. किम जोंग उन (Kim Jong Un) एवढ्यावरच थांबला नाही तर उत्तर कोरियामध्ये मुलांच्या नावाबाबत हा नवा नियम लागूही केली आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी मुलांची नावं बॉम्ब, तोफा आणि क्षेपणास्त्र ठेवल्यानं मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागी होईल, असे अजब तत्तज्ञानही मांडले आहे. हुकूमशहा किम जोंग उन अनेकदा आपल्या विचित्र निर्णयांमुळे चर्चेत असतो. नावाबाबत असाच त्यानं आता नवा आदेश दिला असून त्यामुळे उत्तर कोरियामधील पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मात्र या पालकांना आपली नाराजी जाहीरही करता येत नाही, हेच त्यांचे दुःख आहे.
हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हा त्याच्या अतिरेकी स्वभावामुळेही ओळखला जातो. आता किमला आपल्या देशातील मुलांनीही मवाळ विचारसरणी सोडावी असे वाटत आहे. यावर त्यानं उपया शोधला असून उत्तर कोरियातील सॅटेलाईटची जी नावं आहेत, तिच नावं नवजात बालकांची ठेवावीत असा नियम त्यांनी काढला आहे. यामुळे मुलांमध्ये देशाप्रती प्रेम निर्माण होईल, तसेत मुलांच्या नावात मवाळपणाऐवजी देशभक्तीची भावना वाढीस लागेल असे किमला वाटते. किम एवढ्यावरच थांबला नाही, त्यांनी उत्तर कोरियामधील लहान मुलांची गोड असणारी नावंही बदलण्याचे आदेश दिले आहेत. आता उत्तर कोरियातील मुलांची नावं चोंग इल (बंदूक), चुंग सिम (निष्ठा), पोक इल (बॉम्ब) आणि उई सॉंग (उपग्रह) अशा स्वरुपाची असून पालकांनी ठराविक महिन्यात नावं बदललावी असाही आदेश आहे. ज्या पालकांनी मुलांची नावं प्रेम, सौंदर्य आणि अशा अर्थाची ठेवली आहेत, त्यांनी ही नावं त्वरित बदलावीत असेही आदेश किमनं दिले आहेत. किमच्या या आणखी नव्या आदेशानं उत्तर कोरियामधील नागरिकांनी विरोध केला. पण उत्तर कोरियामध्ये किम जो ला विरोध म्हणजे मृत्यूच…त्यामुळे हा विरोधही छुप्पा स्वरात होत आहे.
==========
हे देखील वाचा : मुलांचे बचत खाते सुरु करण्यासाठीचे योग्य वय कोणते?
==========
हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) याची ओळखच अशा विचित्र नियमांनी झाली आहे. उत्तर कोरियाचे माजी हुकूमशहा किम जोंग-टू यांच्या निधनाच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त उत्तर कोरियात 11 दिवस शोक करण्याचे आदेश दिले होते. यावेळी देशातील नागरिकांच्या हसण्यावर, नवीन खरेदीवर आणि दारू पिण्यास बंदी घालण्यात आली होती. विदेशी संगीतापासून उत्तर कोरियाच्या लोकांना लांब राहावे लागते. सर्व देशात फक्त एकाच प्रकारचे संगित लावले जाते. सरकारच्या आवडीचे संगित देशातील संगित चॅनेलवर अखंड चालू असते. त्याव्यतिरिक्त संगित ऐकल्यास आजन्म तुरुंगवासाची शिक्षा त्या व्यक्तिला मिळते. आपण सहज कोणालाही तुमचं वय काय…हा प्रश्न विचारतो. पण उत्तर कोरियामध्ये हुकुमशहा किम जोंग उनचे(Kim Jong Un) वय काय…हा प्रश्न विचारला तर तो गुन्हा ठरतो. मग प्रश्न विचारणा-याला थेट तुरुंगात डांबण्यात येते. उत्तर कोरियामध्ये जर कोमी डेनिम जीन्स घातली, तर त्या व्यक्तीला थेट मृत्युदंड दिला जातो. उत्तर कोरियामध्ये पॉर्न फिल्म पाहण्यास सक्त मनाई आहे. जर कोणी पॉर्न चित्रपट पाहतांना दिसले, तर त्याला थेट मारण्यात येते. किम जोंग याने आपल्या प्रेयसीला अशाच गुन्ह्यात तिच्या कुटुंबियांसमोरच मारले होते. उत्तर कोरिया हा देश नास्तिक आहे. कोणी धार्मिक पुस्तक आणले तर त्यांना मारले जाते. 2013 मध्ये एका स्टेडियममध्ये जाहीररित्या 80 ख्रिश्चन धर्मियांना मारले गेले. कारण त्यांच्याकडे बायबल मिळाले. यावरुन आंतराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली होती. किम जोंगचा अनेकांना विरोध केला. त्याच्यावर टिका केली. पण किमला या सर्वांचा काहीही फरक पडला नाही. उत्तर कोरियामध्ये आपल्याला शुल्लक वाटतील अशा घटनांमध्येही तुरुंगवासाची शिक्षा आहे. आणि जर कोणी तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्या कैद्यालाच नाही तर त्याच्या तीन पिढ्यांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागते.
उत्तर कोरियाच्या या नियमांविरोधात विरोध करता येत नाही. या सर्व विचित्र नियमांमध्ये आता नव्या नियमाची भर पडली आहे. तोफ, बंदुका या नावानं आता उत्तर कोरियामधील मुलांची ओळख ठरणार आहे.
सई बने…