Home » बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी केली कॅन्सरवर मात

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी केली कॅन्सरवर मात

by Team Gajawaja
0 comment
These Bollywood Celebrities Overcome Cancer
Share

कॅन्सर नाव ऐकूनच अंगावर शहारा उभा राहतो. श्रीमंतांचा आजार म्हणून हा आजार ओळखला जातो. पूर्वी कॅन्सर हा शब्द खूपच कमी ऐकायला मिळायचा. मात्र मधल्या काही काळापासून कॅन्सर हा शब्द खूपच सामान्य झाला आहे. अंदाजे १० पैकी ४/५ लोकांना कॅन्सर झाल्याचे सर्रास ऐकायला मिळते. याला मनोरंजनक्षेत्र देखील अपवाद नाही. बॉलिवूडमध्ये तर अभिनेत्रींना कॅन्सर होण्याचे प्रमाण जरा जास्तच वाढल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलने तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सांगितले. याला काही दिवस उलटत नाही तोपर्यंत अभिनेत्री महिमा चौधरी देखील कॅन्सरग्रस्त झाल्याचे समजले आहे. एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने बॉलिवूड गाजवलेल्या महिमाला कॅन्सरने जखडल्याचे वृत्त सर्वांनाच धक्का देत आहे. (These Bollywood Celebrities Overcome Cancer )

१९९७ साली शाहरुख खानसोबत ‘परदेस’ सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी महिमा चांगलीच गाजली. तिने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले. मात्र तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा अधिक तिच्या वैयक्तिक आयुष्याने जास्त लक्षवेधून घेतले. मागील बऱ्याच काळापासून महिमा बॉलिवूडपासून लांब आहे. मात्र नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ती स्तनांच्या कॅन्सरने ग्रस्त असून सध्या त्यावर किमोथेरपी घेत असल्याचे सांगितले. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते असलेल्या अनुपम खेर यांच्याशी चर्चा करताना महिमाने तिच्या या आजाराबद्दल खुलासा केला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये महिमाला ओळखणे देखील मुश्किल झाले आहे. तिच्या डोक्यावर अतिशय छोटे केस असून ती खूपच अशक्त झाल्याचे देखील दिसते. अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते महिमासोबत संवाद साधताना दिसते. खिडकीजवळ बसलेल्या महिमाला अनुपम खेर विचारतात की, “तू काय विचार करत आहेस?” यावर ती म्हणते, “मी उपचार घेत असताना एक दिवस मला फोन आला तुमचा (अनुपम खेर) फोन पाहिल्यावर मला जाणवले की हा फोन महत्वाचा आहे. तुम्ही मला एका सिनेमाची ऑफर दिली. दरम्यान मला माझ्या उपचारादरम्यान अनेक वेबसिरीज आणि चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. मात्र तेव्हा माझ्या डोक्यावर केस नव्हते त्यामुळे मला खूपच विचित्र भावना येत होत्या.” (These Bollywood Celebrities Overcome Cancer)

पुढे महिमा तिच्या कॅन्सरबद्दल अधिक माहिती देताना म्हणते, “तुम्ही माझे मित्र आहात म्हणून तुम्हाला सांगते नाहीतर बराच काळ मी माझ्या कॅन्सर होण्याची बातमी आईवडिलांना देखील सांगितली नव्हती. सुरुवातीला महिमा खूपच धीराने बोलते. मात्र नंतर ती खूपच भावूक होते. या व्हिडिओमध्ये तिने अनेक ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या महिलांना प्रेरणा देखील दिली. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर देखील महिमाला प्रेरित करत तिला या लढाईत अधिक बळ देताना दिसले. 

अनुपम खेर यांनी या ७ मिनिट आणि ३० सेकंदाचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “महिमा चौधरीची कॅन्सरच्या विरोधात असलेली लढाई: मी साधारण एक महिन्यापूर्वी अमेरिकेतून महिमाला माझ्या ५२५ व्या ‘द सिग्नेचर’ या सिनेमात काम करण्याची ऑफर देण्यासाठी फोन केला. आम्ही फोनवर बोलत असताना मला समजले की तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. तिची बॉडीलँग्वेज पहिली तर ती जगातील सर्व महिलांना आशा देणारी आहे. तिची इच्छा होती की, जेव्हा ती याबद्दल बोलेल तेव्हा मी याचा हिस्सा असावे. तिने मला आशावादी म्हटले, “मात्र माझी प्रिय महिमा तू माझी खरी हिरो आहेस. मित्रांनो तिला तुमचे खूप प्रेम आणि आशीर्वाद पाठवा. ती आता सेटवर परतली आहे. आता ती तिची उडान घेण्यासाठी सज्ज झाली आहे आणि मी सर्व निर्माता आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छितो की हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तिच्या प्रतिभेचा वापर करून घेऊ शकतात. तिला माझा सलाम.” (These Bollywood Celebrities Overcome Cancer)

====

हे देखील वाचा – American Idol: या यशस्वी कार्यक्रमाची संकल्पना नव्हती ‘ओरिजिनल’

====

महिमाला कॅन्सर झाल्याचे समोर येताच तिच्या फॅन्ससोबतच तिच्या शुभचिंतकांनी तिला या आजारातून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्रींना कॅन्सर होण्याचे प्रमाण खूपच वाढले असून, अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी सेलिब्रिटींनी या कॅन्सरवर सकारात्मक पद्धतीने मात केली आहे. 

सोनाली बेंद्रे 

सोनाली बेंद्रेला २०१९ मध्ये हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती सर्वांना दिली. पुढे तिने अमेरिकेतून जाऊन यावर उपचार घेतले. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर सोनालीने या आजारावर मात केली आणि ती मुंबईला आली. आता सोनाली टेलिव्हिजनवर सक्रिय असून एका डान्स शोचे परीक्षण करते. 

ताहिरा कश्यप 

बॉलिवूडचा अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपनेही कॅन्सरशी लढा दिला आहे. २०१८ साली ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजले. ताहिरानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून या आजाराची माहिती दिली. तिने देखील अनेक काळ यावर उपचार घेतला सर्जरी केली आणि या आजारातून ती बरी झाली. ताहिरा आयुष्यमानची पत्नी असण्यासोबतच एक उत्तम लेखिका आणि  दिग्दर्शिका आहे. (These Bollywood Celebrities Overcome Cancer)

मनीषा कोईराला 

अभिनेत्री मनीषा कोईराला देखील कॅन्सर झाला होता. वयाच्या ४२ व्या वर्षी अर्थात २०१२ साली मनीषाला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. ६ महिने अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली. कॅन्सरवर मात केल्यानंतर तिने ‘Healed: How Cancer Gave Me A New Life’ नावाचे एक पुस्तक लिहिले ज्यामध्ये तिने या काळातील परिस्थिती आणि संघर्ष याबद्दल सांगितले. ( cancer )

किरण खेर 

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर यांना देखील ब्लड कॅन्सर झाला होता. ही बाब त्यांनी बऱ्याच दिवसांनंतर सर्वांसमोर आणली. त्यांनी मुंबईमध्ये अनेक महिने उपचार घेतला. त्यानंतर त्या पुन्हा आपल्या कामावर परतल्या. 

याशिवाय लिसा रे, मुमताज, अनुराग बसू, राकेश रोशन आदी कलाकारांना देखील कॅन्सरने जखडले होते (These Bollywood Celebrities Overcome Cancer)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.