Bollywood : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल लग्नानंतरही चर्चेत आहे. कपल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राहतात. आपल्या हनीमूनवेळचे काही फोटोही कपलने शेअर केले होते. खरंतर, सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नासाठी परिवारात वाद असल्याचे बोलले जात होते. याबद्दलच्या काही गोष्टी दिसूनही आल्या. भावाने सोनाक्षीच्या लग्नात उपस्थिती लावली नव्हती. आता कपलच्या लग्नाला दोन महिने झाले आहेत. अशातच अभिनेत्रीने आपले वांद्रे येथील घर विक्री करण्यास काढले आहे.
सोनाक्षी सिन्हा विक्री करतेय घर
सोनाक्षी आणि जहीरने जून महिन्यात एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. ज्या घरात अभिनेत्रीचे लग्न झाले तेच घरी तिने आता विक्रीस काढले आहे. खरंतर, असे बोलले जात आहे की, अभिनेत्रीने एक मोठे घर खरेदी केले असून तेथे ती लवकरच शिफ्ट होमार आहे. एका सूत्रांनी सांगितले की, जहीर इक्बालच्या कंस्ट्रक्शन इमारतीत एक मोठे अपार्टमेंट अभिनेत्रीने खरेदी केले आहे.
सोनाक्षीने खरेदी केलेली पहिली प्रॉपर्टी
वर्ष 2023 मध्ये सोनाक्षीने इंस्टाग्रामवर तिने एक अपार्टमेंट खरेदी केल्याची पोस्ट शेअर केली होती. पण रिपोर्ट्सनुसार,अभिनेत्रीने मार्च 2020 मध्ये अपार्टमेंट खरेदी केले होते. सप्टेंबर 2023 पर्यंत अभिनेत्रीने त्याच इमारतीत आणखी एक अपार्टमेंट खरेदी केले होते. एका मुलाखतीत सोनाक्षीने अपार्टमेंटची एक झलकही शेअर केली होती. सोनाक्षी स्वत:हून खरेदी केलेल्या प्रॉपर्टीसाठी खूप आनंदीत होती.
वांद्रे येथील घरात लग्न
सोनाक्षीने वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये लग्न केले. या घरातील काही फोटोही अभिनेत्रीने शेअर केले होते. यावेळी आई आणि वडील शत्रुघ्न सिन्हा देखील लग्नसोहळ्यावेळी भावूक झाल्याचे दिसून आले होते. हेच घर अभिनेत्रीने आता विक्री करण्यास काढल्याचे बोलले जात आहे.
धर्मामुळे निर्माण झाला होता लग्नाचा वाद
जहीर इक्बाल मुस्लिम धर्माचा असून सोनाक्षी सिन्हा हिंदू आहे. वेगवेगळा धर्म असला तरीही दोघांनी आपला धर्म कायम ठेवला आहे. कपलने रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते. सोनाक्षीने मुस्लिम मुलाशी लग्न केल्याचे समाजाला पटलेले नाही. या दोघांच्या लग्नावरुन जोरदार विरोध देखील करण्यात आला होता.