Bollywood News : मीडियाच्या कॅमेरासमोर सेलिब्रेटी हसताना आणि पोज देताना दिसतात. काही सेलिब्रेटींना दररोज पॅपाराझी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करतात. पण जया बच्चन अशा सेलिब्रेटी आहे ज्या पापाराझी समोर आल्यानंतर संतापतात. कॅमेऱ्यामॅनला ओरडण्यास सुरुवात करतात आणि याचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियात आजवर खूप व्हायरल झाले आहेत. पण जया बच्चन यांच्या अशा वागण्याबद्दल नातू कपूर यांनी कमेंट केली आहे.
नीतू कपूर यांनी म्हटले की, ” हे सर्वकाही नाटकी आहे. मला वाटते जया मुद्दाम अशा पद्धतीने पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर वागतात. याशिवाय जया बच्चन आणि पापाराझींमध्ये काहीतरी गडबड असल्याचेही वाटते.”
नीतू कपूर यांनी पापाराझीसोबतचे जया बच्चन यांचे असलेल्या नात्याबद्दल खुलेपणाने करणच्या शो मध्ये बातचीत केली आहे. जया बच्चन नेहमीच पापाराझींवर संतापलेल्या दिसतात. जया बच्चन नेहमीच रागात बोलतात. पण त्यांच्या अशा वागण्याला नीतू कपूर यांनी ढोंग असल्याचे म्हटले आहे. मला असे वाटते त्या मुद्दाम पापाराझींसमोर अशा वागतात. मला असेही वाटते की, जयांकडून एकदा कधीतरी पापाराझींवर संताप व्यक्त केला असेल… पण त्या तश्या नाहीत. यावर करणनेही म्हटले की, खरंच जया बच्चन रागीट स्वाभावाच्या नाहीत. (Bollywood News)
View this post on Instagram
दरम्यान, जया बच्चन यांनी करण जौहरचा सिनेमा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये रणवीर सिंहच्या आईची भुमिका साकारली होती. सिनेमामध्ये जयाने जया बच्चन यांनी एका रागीट आईची भुमिका साकारली होती. यानंतर जया बच्चन यांच्यावरुन मीम्सही सोशल मीडियात व्हायरल झाले होते. खरंतर जया बच्चन यांना खूप वेळा पापाराझींना ओरडतानाचे व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.