Bollywood Movies : बॉलिवूडमधील हँडसम हंक म्हणून ओखळल्या जाणाऱ्या हृतिक रोशनचा बॉलिवूडमध्ये 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. हृतिकचा पहिला सिनेमा कहो ना प्या है असून तो वर्ष 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत ब्लॉकबस्टर ठरला होता. याच सिनेमाच्या माध्यमातून अमीषा पटेलनेही डेब्यू केला होता. दोन्ही कलाकारांना रातोरात फेम मिळाले होते. पण तुम्हाला माहितेय का, कहो ना प्या है सिनेमासाठी हृतिकला घेणार नव्हते.
कहो ना प्यार है सिनेमाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते. पण सिनेमाची कथा ज्यावेळी लिहिली जात होती तेव्हा राकेश रोशन सिनेमात शाहरुखला कास्ट करण्याचा विचार करत होते. या सर्व गोष्टींमध्ये हृतिकचाही समावेश होता. त्याचवेळी हृतिकने वडिलांना म्हटले की, तुम्ही शाहरुखसोबत अनेक सिनेमे केले आहेत. आता एखाद्या नव्या अभिनेत्याला घ्यावे. खरंतर, राकेश रोशन यांनी शाहरुख खानला घेऊन ‘करण-अर्जुन’, ‘कोयला’सारखे सिनेमे केले होते.
हृतिकला असा मिळाला सिनेमा
हृतिकने जेव्हा आपल्या वडिलांना सिनेमातील नव्या कलाकाराबद्दल विचारले असता त्यांनी यावर विचार केला. अशातच हृतिकला राकेश रोशन यांनी सिनेमातून लाँच करण्याचा निर्णय घेतला. या सिनेमासाठी हृतिकला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि बेस्ट डेब्यूचा पुरस्कारही मिळाला होता. वेगवेगळ्या मंचावर सिनेमाने 92 पेक्षा अधिक पुरस्कार जिंकले होते. याशिवाय वर्ष 2000 मध्ये कहो ना प्यार है सिनेमाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये देखील दाखल करण्यात आले.
सिनेमाने किती कमावले?
बॉक्स ऑफिस इंडियानुसार, कहो ना प्यार है सिनेमाने जगभरात 80 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. सिनेमा तयार करण्यासाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. सिनेमात हृतिक रोशन आणि अमीषा पटेलसह अनुपम खेर, मोहनिश बहल, दलीप ताहिल, आशीष विद्यार्थी सारखे कलाकार झळकले होते.
