Home » डॉक्टर सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये……

डॉक्टर सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये……

by Team Gajawaja
0 comment
सारा तेंडुलकर Sara Tendulkar
Share

क्रिकेटचा देव असा ज्याचा उल्लेख केला जातो त्या सचिन तेंडूलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) लवकरच मोठ्या पडद्यावर येत असल्याची चर्चा आहे. रणवीर सिंगसोबत एका चित्रपटासाठी सारा तेंडूलकरला बॉलिवूडच्या मोठ्या दिग्दर्शकानं साईन केलं असून, सारा आता बॉलिवूडची नवीन क्वीन होणार, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली आहे.  

सचिन आणि अंजली तेंडूलकर यांची मोठी लेक सारा, कायमच लाईम लाईटमध्ये असते. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेऊन सारा आपल्या आईसारखी डॉक्टर होण्यासाठी लंडनला रवाना झाली. मात्र काही दिवसांपूर्वी सारा एका जाहिरातीमध्ये दिसली आणि सचिनच्या लेकीच्या बॉलिवूड पदार्पणाच्या बातम्या पुन्हा रंगू लागल्या.

वास्तविक लहानपणापासून बॉलिवूडपासून दूर असली तरी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar), कायम चर्चेत राहिली आहे. साराचे सौंदर्य आणि राहणीमान पाहता ती कुठल्याही बॉलिवूड काय पण हॉलिवूडच्या अभिनेत्रीलाही मात देईल.

सचिन ज्या महागड्या घरात राहतो, त्याच्याच शेजारी ऐश्वर्या राय राहत होती. छोट्या साराची तेव्हापासून ऐश्वर्या बरोबर गट्टी जमली. आत्ताही सारा ऐश्वर्याचा प्रत्येक सल्ला ऐकते. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सारानं शिक्षण पूर्ण करावं, असा सल्ला तिची आई अंजली आणि ऐश्वर्याने दिला होता. सारानं या दोघींचा सल्ला मानून युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून शिक्षण पूर्ण केलं. आता ही डॉ. सारा सचिन तेंडूलकर आपल्या करिअरची वाट निश्चित करत असून, बॉलिवूड तिची प्रथम पसंती आहे.  

एका आंतरराष्ट्रीय कपड्यांच्या ब्रॅण्डसाठी सारानं मॉडेलिंग केलं. याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले. इंस्टाग्रामवर 1.6 मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या साराच्या या फोटोंनी तिच्या चाहत्यांना सुखद धक्का मिळाला. 

बॉलिवूडमध्ये येण्यासाठी शनाया कपूर, सुहाना खान, इब्राहिम अली खान, पलक तिवारी, अगस्त्य नंदा हे स्टारकीड रांगेत आहेत. आता त्याच रांगेत सारा तेंडूलकर (Sara Tendulkar) हे नावही सामील झाले आहे. साराला बॉलिवूडची पार्श्वभूमी नसली तरी तिनं वैद्यकीय शिक्षणाबरोबर अभिनयाचे धडेही लंडनमध्ये गिरवले आहेत. विशेष म्हणजे सचिन आणि अंजली या दोघांनीही तिच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.  

======

हे देखील वाचा – इरफान खानचा असाधारण अभिनयप्रवास, टेलिव्हिजनपासून बॉलिवूड व्हाया हॉलिवूडपर्यंत

======

याआधीही सारा शाहीद कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा होती. मात्र त्याचवेळी आपली लंडनमध्ये शिक्षण घेणारी लेक, बॉलिवूडपासून दूर आहे, अशी माहिती स्वतः सचिन तेंडूलकरने माध्यमांना दिली होती. त्यानंतर या सर्व चर्चांना विराम लागला. मात्र वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर सारा सोशल मीडियावर अधिक सक्रीय झालीये.  

अवघ्या 24 वर्षांची सारा अतिशय सुंदर आहेच, शिवाय ती हजरजबाबी असल्याची माहितीही तिला ओळखणारे देतात. मध्यंतरी रॉकस्टार जस्टीन बीबर भारतात आल्यावर साराने त्याच्याबरोबर काढलेले फोटो सोशल मिडीयावर गाजले होते. आता हीच सारा रणवीर सिंगसोबत कुठल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय याची उत्सुकता सचिनच्या चाहत्यांना लागली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.