2003 मध्ये Boom सिनेमातून पदार्पण करणारी अभिनेत्री कतरिना कैफ आज बॉलिवूड मधील सुपरस्टार म्हणून ओळखली जाते. मात्र तिचा येथवर पोहचण्याचा प्रवास हा खडतर आणि संघर्षाने भरलेला होता. १६ जुलै १९८३ मध्ये विक्टोरिया हॉन्गकॉन्गमध्ये जन्मलेली कतरिना ही मोठी होण्यापूर्वीच तिच्या वडिलांनी परिवाराची साथ सोडी. तिची आई सुजैन टरकोट हिने कतरिनासह तिच्या सहा बहिण-भावंडांना सांभाळले. वडिलांनी कधीच मदत केली नाही. तिच्या आईला कामासाठी फिरावे लागले. हेच कारण आहे की, कतरिनाला कधीच शाळेत जाता आले नाही.(Bollywood Actress)
वयाच्या 14 व्या वर्षी एक ब्युटी कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर तिचे नशीब बदलण्यास सुरुवात झाली. मात्र तिचे खरं नशीब पालटले ते म्हणजे २००३ मध्ये. जेव्हा ती भारतात आली. ऐकेकाळी आर्थिक तंगीत आयुष्य जगणारी कतरिना आज अरबो रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. कतरिना जन्म भले हॉन्गकॉग मध्ये झाला असेल पण तिची वाढली चीन, जापान, फ्रान्स, स्विर्त्झलँन्ड, पोलँन्ड, बेल्जियम आणि लंडनमध्ये. कामासाठी तिच्या आईला सतत देश बदलावे लागले होते.
फिरायला आली होती भारतात
कतरिना कैफ भारतात काम करण्यासाठी नव्हे तर मित्रमैत्रीणींसोबत फिरण्यासाठी आली होती. मुंबईत होणाऱ्या एका फॅशन शो मध्ये गेली. याच शो दरम्यान तिची भेट फिल्ममेकर कैजाद गुस्ताद यांच्याशी झाली. त्यांनी तिला फॅशन शो मध्ये बूम सिनेमासाठी विचारले. २००३ मध्ये तो सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमात कतरिनाने सुपरमॉडलची भुमिका साकारली होती. (Bollywood Actress)
पहिलाच सिनेमा फ्लॉप
२००३ मधील बूम मधून आपल्या सिनेमातील करियरची सुरुवात तिने केले. पण सिनेमा फ्लॉप झालाय त्यानंतर दीर्घकाळ तिच्याकडे एकही सिनेमा नव्हता. कतरिनाने त्याच दरम्यान मॉडलिंगमध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरु केला. इंडियन फॅशनवीक मध्ये फॅशन डिझाइनर रोहित बहलसाठी वॉक करत कतरिना चर्चेत आली. त्यानंतर ती किंगफिशर कॅलेंडर, कोकाकोला, एलजी, फेविकॉच्या जाहिरातीत सुद्धा झळकली. बॉलिवूडमध्ये काम न मिळाल्याने कतरिनाने तेलुगु सिनेमा मल्लिसवरी (2004) मध्ये काम केले. या सिनेमात कतरिनाला 7.5 लाखांचे मानधन दिले गेले आणि ती साउथ मधील हाइएस्ट पेड अभिनेत्री झाली होती.
हेही वाचा- ‘ही’ अभिनेत्री सलमानचा करायची तिस्कार… पण सोहेल सोबत होते रिलेशन!!!
सलमान खान सोबत मैत्री झाल्यानंतर कतरिना बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अधिक प्रसिद्ध होऊ लागली. 2004 नंतर तिला पुन्हा सिनेमे मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कतरिनाने आपल्या करियरमध्ये ‘नमस्ते लंडन’, ‘एक था टाइगर’, ‘धूम-3’ आणि ‘जब तक हे जान’ सारखे हिट सिनेमे दिले. आत तिची ओळख एक यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते.