फिल्म इंडस्ट्रीमध्ये सिनेकलाकारांमध्ये तुलना होत राहते. काही जुन्या लिजेंड्री स्टार्सला युथ अॅक्टर्ससोबत कंम्पेअर केले जाते. एखाद्यावेळी ही तुलना खरोखर योग्य असते तर कधीची चुकीची. एकावेळी वर्सेटाइल बॉलिवूड अभिनेता संजीव कुमार यांची अजय देवगण सोबत तुलना केली जायची. मात्र आज अजयने याचा विरोध केला होता. अशीच तुलना शाहरूख खान आणि शाहिद कपूर यांच्यामध्ये करण्यात आली होती. शाहिदने या तुलनेवर रिअॅक्ट केले होते. (Bollywood)
शाहिदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले होते की, करियरच्या सुरुवातीला त्याची तुलना शाहरूख खान याच्यासोबत केली जायची. याबद्दल अधिक माहिती देताना असे म्हटले होते की, अशी तुलना करणे योग्य नव्हते. हे एक प्रकारचे नुकसानदायकच आहे. याचा परिणाम कलाकारांच्या मनावर ही होतो. परंतु प्रत्येक कलाकारांची एक युनिकता असते. त्यामुळे अशी तुलना केल्याने त्यावर मर्यादा येतात.

bollywood
याव्यतिरिक्त शाहिदने असे म्हटले होते की, अशा तुलनेमुळे तरुण कलाकारांवर प्रेशर येते. ते आपले शंभर टक्के देऊ शकत नाही. एका अभिनेत्यासाठी हे गरजचे आहे की, करियरच्या सुरुवातीला त्याने झोकून काम केले पाहिजे. त्याचसोबत आपल्यातील काही युनिकता शोधली पाहिजे. शाहिद कपूरचे फॅमिली बॅकग्राउंड पाहिले तर तो अभिनेता पंकज कपूर यांचा मुलगा आहे. ते सुद्धा बॉलिवूड इंडस्ट्री मधील दिग्गज कलाकार आहेत. (Bollywood)
शाहरूखच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तर त्याला बॉलिवूड इंडस्ट्रीमधील बादशाह असे म्हटले जाते. शाहरूखने आपल्या करियरच्या सुरुवातीला काही सुपरहिट सिनेमांत काम केले होते. त्याचसोबत रोमँन्टिक सिनेमेही पसंद केले गेले. सध्या शाहरूख आपल्या जवान सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाहरूख खानसाठी 2023 चे वर्ष लकी ठरले आहे. पठाण आणि जवान सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्यानंतर आता शाहरूख खान लवकरच ‘डंकी’सिनेमातून झळकणार आहे. जो डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा- प्रियंका चोपडाने सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली? गदर-2 च्या दिग्दर्शकांनी सांगितले सत्य