बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अभिनयाबद्दल चाहत्यामध्ये काय क्रेझ आहे हे वेगळं सांगायला नको. नवाजुद्दीन नेहमीच लोकांना आणि समाजाला जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या अभिनयातही तीच गोष्ट दिसून येते.
अलीकडेच नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबई लोकलमध्ये प्रवास केला आणि त्याचा हा व्हिडिओ एका चाहत्याने रेकॉर्ड केला जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नवाजुद्दीन डोक्यावर रुमाल बांधलेला आणि डोळ्यांवर काळा चष्मा घातलेला दिसत आहे.
नवाज लोकांमध्ये मुक्तपणे फिरताना दिसला
नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याला कोणी ओळखू नये म्हणून चेहऱ्यावर मोठा मास्क लावला आहे. व्हिडिओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्या स्टेशनवर फिरताना दिसत आहे.
जेव्हा त्याच्या एका चाहत्याने त्याला ओळखले तेव्हा नवाजुद्दीन त्याला कॅमेरा खाली करायला सांगतो आणि प्रेमाने म्हणतो – मत कर, पागल है क्या.
====
हे देखील वाचा: सुमोना चक्रवर्तीने कपिल शर्मा शो सोडला? नवीन प्रोमोमुळे वाढला गोंधळ
====
नवाजुद्दीन सिद्दीकीने बदलला आपला लूक
पुढे व्हिडिओमध्ये तो मुंबईच्या लोकलमध्ये बसलेला दिसतो. नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा लूक पाहून त्याला ओळखणे इतके अवघड झाले होते की, गर्दीने भरलेल्या ट्रेन आणि रेल्वे स्टेशनवर त्याला कोणीही ओळखू शकत नाही. फुल स्लीव्ह टी-शर्ट आणि पँट घातलेला नवाजुद्दीन एकदम वेगळा दिसत होता.
ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांचे केले निरीक्षण
या संपूर्ण काळात नवाजुद्दीन सिद्दीकी आजूबाजूच्या वातावरणाचे निरीक्षण करताना दिसत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चाहत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
फॅनने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘मुंबई लोकल ट्रेनच्या सीटवर नवाजुद्दीन सिद्दीकी माझ्या समोर बसला आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी नवाजुद्दीन सिद्दीकीला विचारले की त्याने त्याच्याशी संवाद साधला का?
====
हे देखील वाचा: ५ वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर ‘ब्रह्मास्त्र’चं शूटिंग पूर्ण, आलियाकडून खास पोस्ट शेअर
====
नवाझुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत नवा बंगला
काही दिवासांपूर्वीच मुंबईतील नवाझुद्दीनच्या घराचं काम पूर्ण झालं आहे. नवाझुद्दीनने या घराचं नाव त्याच्या वडिलांच्या आठवणीत ‘नवाब’ असं ठेवलं आहे. नवाझुद्दीननं त्याच्या या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.