‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमा सर्वांना आठवतच असेल या सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मंदाकिनी यांना अजूनही कोणी विसरले नसेल. त्यांचे सौंदर्य, बोल्डनेस आजही सिनेमा बघताना लोकांना घायाळ करतो. या सिनेमात मंदाकिनी यांनी बोल्ड सीन देत खूपच प्रसिद्धी मिळवली. अतिशय मोठे, उज्ज्वल आणि यशस्वी करिअर असणाऱ्या मंदाकिनी यांच्या एका चुकीमुळे त्यांच्या भविष्यावर आणि स्वप्नांवर पाणी फिरले. बॉलिवूडमध्ये यश आणि लोकप्रियता मिळवत असणाऱ्या मंदाकिनी यांचा एक फोटो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत झळकला आणि खूपच व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्या आणि दाऊदच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले. एका रात्रीत त्यांच्या स्वप्नांची आणि करिअरची राखरांगोळी झाली. आता तब्ब्ल २६ वर्षांनी मंदाकिनी त्यांच्या मुलाच्या म्युझिक व्हिडिओमधून पुन्हा एकदा कमबॅक करण्यास सज्ज झाल्या आहेत. तत्पूर्वी जाणून घेऊया मंदाकिनी यांच्या बॉलिवूडमधील काही हिट चित्रपटांबद्दल.
राम तेरी गंगा मैली (1985)
मंदाकिनी यांनी राज कपूर यांच्या ‘राम ‘तेरी गंगा मैली’ सिनेमात आपल्या करिअरला सुरुवात केली. या सिनेमात त्यांनी दिलेल्या बोल्ड सीन्सची तर आजही चर्चा होताना आपल्या दिसते. या सिनेमातील गाणी देखील प्रचंड गाजली, आजही या गाण्याची क्रेझ लोकांमध्ये आहे. राजीव कपूर, दिव्या राणा, सुषमा सेठ, कुलभूषण खरबंदा, रजा मुराद आदी कलाकारांच्या दमदार अभिनयाची मेजवानी या सिनेमात प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. हा सिनेमा आजही आपण ‘झी 5’ वर पाहू शकतो.
तेजाब (1988)
एन चंद्र दिग्दर्शित या सिनेमात माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर जरी मुख्य भूमिकेत असले तरी मंदाकिनी यांनी निभावल्या ‘निकिता’ या भूमिकेने सिनेमात एक महत्वाचे आणि वेगळे वळण आणत सिनेमाला एक ग्लॅमर मिळवून दिले.
लडाई (1989)
दीपक शिवदासानी दिग्दर्शित ‘लडाई’ या चित्रपटात मंदाकिनी, रेखा, मिथुन चक्रवर्ती, शक्ति कपूर, अनुपम खेर, डिंपल कपाडिया आणि आदित्य पंचोली यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा सिनेमा देखील खूपच गाजला. आता हा चित्रपट आपण ‘झी 5’ वर पाहू शकतो.
प्यार के नाम कुर्बान (1990)
‘प्यार के नाम कुर्बान’ हा मंदाकिनी यांचा एक ऍक्शन ड्रामा सिनेमा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बब्बर सुभाष यांनी केले होते. सिनेमात डिंपल कपाड़िया, मिथुन चक्रवर्ती, गुलशन ग्रोवर, डॅनी डेन्जोंगपा आदी दिग्गज कलाकार होते. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर खूपच यश मिळाले. हा चित्रपट आता आपण एमएक्स प्लेयरवर पाहू शकतो.