बहुतांश वेळा आपण रात्री झोपताना असा विचार करतो की सकाळी आपल्याला ४ वाजता जाग येईल. किंवा घड्याळ न पाहताच आपल्याला कळते की, आता किती वेळ वाजले आहेत. अशातच आपले शरिर हे एखाद्या घड्याळाप्रमाणे काम करते का? जे आपल्याला मनानुसार अनुरुप करते किंवा एका निर्धारित वेळेवर आपल्या आतमध्ये अलार्म वाजतो का? (Body Clock)
काही लोक असे म्हणतात की, त्यांच्या शरिरात एक असे घड्याळ आहे जे त्यांना मनानुसार झोपण्याचा सिग्नल देते. त्याचसोबत वाट्टेल त्या वेळेला जागवते. काही लोकांना ही अद्भूत क्षमता पाहण्यास मिळते की, त्यांना रात्री झोपताना ज्या निर्धारित वेळेवर उठायचे असते त्यावेळी घड्याळ्याच्या शिवाय ही उठतात. म्हणजेच त्यांच्या निर्धारित वेळेत ते उठतात. असा अनुभव बहुतांश लोकांना येतो पण त्याचे कारण काय? आपल्या शरिरात एक अशी स्थायी लय असते जी आपल्या शरिराला घड्याळाच्या वेळेनुसार सेट करते. आपण आपोआप जसे वेळेचे भान राखतो ते काही गोष्टींवर अवलंबून असते.

बॉडी क्लॉकचा प्रयोग काय सांगतो?
बॉडी क्लॉक संदर्भात काही प्रयोग सुद्धा झाले. काही महिन्यांपर्यंत काही प्रयोगकर्त्यांना एका गुफेत बंद केले, जेथे प्रकाशाचा किरण सुद्धा येत नाही. घड्याळ नसल्याने त्यांना किती वाजले आहेत हे सुद्धा कळणार नाही. त्यांना अशा स्थितीत काही महिने ठेवण्यात आले. त्यांना गॅस, हिटर, दिवा, पुस्तक अशा विविध सुविधा सुद्धा दिल्या. जेणेकरुन ते गुहेत उत्तमपणे राहू शकतात. ते आपल्या बेसकॅंम्पमधून आपल्या उठण्याची, खाण्याची किंवा झोपण्याच्या सुचना टेलिफोनच्या माध्यमातून देत. ते आपल्या मलमुत्राच्या बाटल्या अशा ठिकाणी ठेवत जेथून वैज्ञानिक त्यांना न पाहताच घेऊन जाऊ शकतात.
अशा प्रकारचा आणखी एक प्रयोग झाला. ज्यामध्ये लोकांना जमिनीच्या खाली बनवण्यात आलेल्या घरांमध्ये ठेवले गेले. ते सुद्धा बाहेरच्या वैज्ञानिकांना दैनंदिन कामकाजाबद्दल माहिती देत होते. (Body Clock)
लोक ठरवलेल्या वेळेवर उठले आणि झोपले
बहुतांश लोक जे गुफेत किंवा जमिनीखाली राहत होते, ते निर्धारित वेळेत झोपले आणि त्याप्रमाणे ते उठले सुद्धा. दरम्यान, त्यापैकी काही जण लोक आपल्या दैनंदिन कामात अनियमतता पाळत असल्याचे ही दिसले.
प्रयोग सांगतात आंतरिक घड्याळ असतेच
या सर्व प्रयोगांच्या आधारावर असे मानले गेले आहे की, आपल्या शरिरात वास्तवात एखादे घड्याळ तर आहेच. पण वास्तविक रुपात घड्याळ नाही तर आपल्या शरिराला अशी सवय झालेली असते की, वेळेनुसार काही गोष्टी करण्याची.
हे देखील वाचा- आर्टिफिशियल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनावरांशी बोलू शकणार व्यक्ती
मेंदू आणि शरिर एकसारखी प्रतिक्रिया देतात
मेंदूत विचार केलेल्या वेळेनुसार आपले शरिर सुद्धा तशाच प्रतिक्रिया देते. जेव्हा शरिराला एका निर्धारित वेळेत काम करण्याची सवय होते तेव्हा ते तसे करते. त्यावेळी भले घड्याळात सकाळ असो किंवा रात्र दाखवत असेल. याचा संबंध आपल्या मनाशी सुद्धा आहे.
त्याचसोबत या विषयासंदर्भातील शोध झाले आणि काही शोध ही सुरु आहेत. मात्र सर्वजण असे म्हणतात की, आपले शरिर ज्या प्रकारे प्रतिसाद देते त्यावरुन कळते की, शरिराच्या आतमधील सिस्टिम खरंच इनबिल्ट क्लॉक प्रमाणे काम करते.शरिरातील या घड्याळाचे नाते आपल्या मेंदूच्या चेतन आणि अचेतनचा सुद्धा भाग असतो.