ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणे अगदी कमी खर्चात होत असल्याने बहुतांश लोक दूरवरचा जरी प्रवास असेल तरी हाच पर्याय निवडतात. काही वेळेस असे होते की, एखाद्या कारणास्तव तुम्हाला ट्रेनच्या प्रवासाआधी बोर्डिंग स्टेशन बदलण्याची वेळ येते. पण तुम्ही जेव्हा तिकिट बुकिंग करता त्यावर ज्या स्थानकाचे बोर्डिंग निवडले आहे पण तेथून तुम्हाला ट्रेन पकडायची नसेल तर तुम्ही तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. परंतु यावेळी लक्षात ठेवा की, बोर्डिंस स्टेशनमध्ये बदल केवळ ऑनलाईन पद्धतीनेच करता येतो. (Boarding Station Change)
या समस्येवर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने एक खास सुविधा सुरु केली होती. त्यानंतर तुम्ही अगदी सहज बोर्डिंग पॉइंट बदलू शकता. खरंतर काही लोकांना अशी समस्या येत होती. त्यामुळेच रेल्वेने ही सुविधा सुरु केली होती. रेल्वेने माहिती देत असे म्हटले आहे की, आयआरसीटीसीच्या तिकिट बुकिंग पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही स्टेशन बदलू शकता.
कोणाला मिळते ही सुविधा
जर तुम्हाला बोर्डिंग स्टेशन खुप दूरवरचे मिळाले असेल तर तु्म्ही ते बदलून आपल्या जवळच्या स्टेशनचे बुकिंग करु शकता. लक्षात ठेवा की, ट्रेनचे बोर्डिंग स्टेशन बदलण्याची परवानगी आणि सुविधा केवळ त्याच लोकांना मिळते जे आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन तिकिट बुक करतात. VIKAP ऑप्शनच्या मदतीने बुक करण्यात आलेल्या तिकिटांवर सुद्धा बोर्डिंगची सुविधा मिळणार नाही.
२४ तास आधी बदलले जाईल स्टेशन
रेल्वेची ही सुविधा त्याच लोकांसाठी सोप्पी आहे ज्यांनी स्वत: ऑनलाईन किंवा एजेंट्सच्या अथवा पॅसेंजर रिजर्वेशन सिस्टिमच्या माध्यमातून रेल्वेचे तिकिट बुक केले आहे. पण रेल्वेच्या मते विकल्प ऑप्शन असणाऱ्या पीएनआरसाठी बोर्डिंग स्टेशन बदलले जाऊ शकत नाही. बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल हा तुम्हाला केवळ २४ तास आधीच केला जाऊ शकतो.
केवळ एकदाच बदलू शकतो बोर्डिंग स्टेशन
आयआरसीटीसीच्या बेवसाइटनुसार, जर एखाद्या प्रवाशाने बोर्डिंग पॉइंट बदलला तर तो मूळ पॉइंट पासून प्रवास करु शकत नाही. नियमानुसार बोर्डिंग पॉइंट हा केवळ एकदाच बदलता येईल. (Boarding Station Change)
हे देखील वाचा- भारतातील पहिली वॉटर मेट्रो
अशा प्रकारे बदला बोर्डिंग स्टेशन
सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या लॉग इन आयडीच्या माध्यमातून आयआरसीटीसीच्या तिकिट बुकिंग पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तिकिट बुकिंग हिस्ट्रीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ती तिकिट निवडा ज्याचा बोर्डिंग पॉइंट तुम्हाला बदलायचा आहे. जेव्हा तुम्ही त्यावर क्लिक कराल तेव्हा एक नवे पेज तुमच्यासमोर सुरु होईल. त्यानंतर अखेरच्या स्टेपमध्ये तुम्ही सहज तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकता.