Home » Health : निरोगी आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या ब्लु टी सेवनाचे फायदे

Health : निरोगी आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या ब्लु टी सेवनाचे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health | Top Marathi Headlines
Share

आपल्या भारतीय लोकांची सकाळची सुरुवात ही चहाशिवाय होत नाही. उठल्यानंतर सर्वात आधी हातात चहाचा कप पाहिजे तेव्हा कुठे दिवस सुरु झाल्यासारखे वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर लगेचच चहा पिणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अजिबातच चांगले नसते. किंबहुना चहा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तसा घातकच समजला जातो. अनेकदा डॉक्टर देखील चहा बंद करण्याचा सल्ला देतात. मात्र आपल्याला चहाची एवढी सवय असते की, चहा नाही तर दिवस कसा जाईल? चहा नाही तर काय प्यायचे? असे एक न अनेक प्रश्न आपल्याला पडतात. (Health)

मात्र आजच्या आधुनिक काळात तर चहामध्ये देखील अनेक प्रकार आले आहेत. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले आणि आरोग्यवर्धक चहा देखील बाजारात सहज उपलब्ध होतात. यात हर्बल टी, ग्रीन टी, ओलॉन्ग चहा, ब्लॅक टी, लेमन टी आदी यासोबतच सध्या एक चहाचा प्रकार कमालीचा लोकप्रिय होताना दिसत आहे आणि तो म्हणजे ब्लु टी. अनेकांना ब्लु टी ऐकून नक्कीच ऑड वाटले असेल. ब्लू टी म्हणजे निळ्या रंगाचा चहा? असा चहा कधी असतो का? कोण पितो असा चहा? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले असतील. आज आपण या लेखातून याच ब्लु टीबद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. (Marathi News)

‘ब्लू टी’ला बटरफ्लाय टी असेही म्हणतात. एक वैशिष्ट्य फुलांपासून ब्लू टी तयार केला जातो. हा चहा अपराजिता फ्लॉवर पासून बनविला जातो. हा चहा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अपराजिताचे हे फूल गोकर्णाचे फुल किंवा शंखपुष्पी म्हणूनही ओळखले जाते. अपराजिताची फुले मुख्यतः भारत, व्हिएतनाम, थायलंड, बाली आणि मलेशिया या देशांमध्ये आढळतात. (Todays Marathi Headline)

Health

निळा चहा कसा बनवता?
हा चहा तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये एक कप पाणी गरम करून घ्या. पाणी किंचित कोमट झाल्यावर त्यात ५ ते ६ अपराजिताची फुले घाला. ते चांगले उकळू द्या. आता गॅस बंद करा, या चहामध्ये एक चमचा मध घालून गरम-गरम सर्व्ह करा. ब्लु टी हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा चहा खूप फायदेशीर मानला जातो. हा चहा प्यायल्याने त्वचेसोबतच शरीरालाही अनेक फायदे होतात. जाणून घेऊया ब्लु टीचे आरोग्यवर्धक फायदे. (Top Marathi Headline)

​शरीर डिटॉक्स करते
ब्लू टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, शरीर डिटॉक्स होते ज्यामुळे अनेक आजार टाळता येतात.

हृदयाचे आरोग्य सुधारते
ब्लू टी पिल्याने हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ब्लू टी प्यायल्यास शरीरातील कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते. ब्लू टीमध्ये बायोफ्लेव्होनॉइड्स नावाचे एक संयुग आढळते, जे शरीराला संरक्षणात्मक अँटिऑक्सिडंट्स प्रदान करण्याचे काम करते. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. (Marathi Latest News)

​वजन कमी करण्यास ​
ब्लू टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर रोज सकाळी फक्त एक कप निळा चहा प्यायला तर काही दिवसात तुम्हाला तुमच्या वजनात फरक जाणवेल.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
ब्लू टी तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील चांगली आहे कारण ती अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. ती फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते. तारुण्य टिकवण्यासाठी ब्लू टी फायदेशीर.

​नियमित पाळीसाठी
आजच्या काळात अनेक महिलांना अनियमित पाळीची मोठी आणि गंभीर समस्या आहे. ज्या महिलांना अनियमित मासिक पाळी येण्याची समस्या आहे त्यांनी ब्लू टू पिल्याने ही समस्या दूर होऊ शकते. याचे दररोज सेवन केल्याने मासिक पाळी काही कालावधीतच नियमित होऊ लागते. (Social Updates)

स्मरणशक्ती वाढवते
‘ब्लू टी’ मध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास खूप मदत करू शकतात. अल्झायमरच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठीही ब्लू टी खूप फायदेशीर आहे. हा चहा प्यायल्यानंतर माणसाला खूप आराम वाटतो.

Health

उत्तम नजर
निळा चहा प्यायल्याने आपली दृष्टी सुधारते. हा चहा प्यायल्याने डोळ्यात जळजळ आणि सूज येण्याची समस्या देखील दूर होते. जाणकारांच्या मते नजरेची कोणतीही समस्या असल्यास ब्लू टीने ती नक्कीच कमी होते. (Top Stories)

​सुरकुत्या कमी होतात
दररोज ब्लू टी प्यायल्याने वृद्धत्व मंदावते. वाढत्या वयामुळे शरीरावत, चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आणि बारीक रेषा या चहाच्या सेवनामुळे दूर हातात. अँटी एजिंगच्या समस्येवर ब्लू टी रामबाण उपाय आहे.

=========

हे ही वाचा : Health : जाणून घ्या Heart Attack आणि Cardiac Arrest यातला नेमका फरक

==========

​ताण आणि नैराश्य कमी होते
नैराश्य किंवा चिंताग्रस्त व्यक्तीला ब्लू टी प्यायल्याने आराम मिळतो. यामध्ये असणारे अमीनो अ‍ॅसिड मानसिक आरोग्य चांगले ठेवते, ज्यामुळे तणाव निर्माण होत नाही. (Social News)

​मधुमेहाचा धोका कमी
जर तुम्ही रोज एक कप निळा चहा प्यायला तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. या चहाने शरीरातील साखरेची पातळी कधीच वाढणार नाही.

(टिप्स : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.