Home » Blue Aadhaar Card का गरजेचे आहे?

Blue Aadhaar Card का गरजेचे आहे?

आधार कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. पण तुम्हाला ब्लू आधार कार्ड म्हणजे काय हे माहितेय का? हेच आपण या लेखातून जाणून घेऊया सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
Blue aadhaar card
Share

आधार कार्डला आपले ओळखपत्र म्हणून शासकीय कामकाज असो अथवा बँक खाते सुरू करण्यासाठी वापरले जाते. यावर लिहिण्यात आलेला 11 अंकी क्रमांक युनिक असतो. देशभरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपले आधार कार्ड तयार करणे अत्यंत गरज आहे. तुमच्यापैकी बहुतांश जणांना आधार कार्ड बद्दल माहिती असेल. पण देशात एकापेक्षा अनेक प्रकारचे आधार कार्ड तयार केले जातात हे माहितेय का? त्यापैकीच एक म्हणजे ब्लू आधार कार्ड. आता विचार कराल ब्लू आधार कार्ड म्हणजे नक्की काय? हेच आपण जाणून घेणार आहोत.(Blue Aadhaar Card)

ब्लू आधार कार्ड म्हणजे काय?
ब्लू आधार कार्ड हे 5 वर्षाखालील मुलांचे तयार केले जाते. या आधार कार्डाला बाल आधार कार्ड ही म्हटले जाते. घरबसल्या ब्लू आधार कार्ड तयार करता येते. ब्लू आधार कार्ड हे सामान्य आधार कार्डच्या तुलनेत वेगळे असते. पाच वर्षाखालील मुलाचे ब्लू आधार कार्ड तयार करण्यासाठी कोणतेही बायोमेट्रिक्स (हाताचे ठसे) घेतले जात नाहीत. ब्लू आधार कार्डसाठी आई-वडीलांचे आधार कार्ड आणि फोटो आवश्यक असतात. मुलाचे वय 5 आणि 15 वर्षाचे झाल्यानंतर आपले बायोमॅट्रिक्स अपडेट करावे लागते. युआयडीएआयच्या वेबसाइटच्या मदतीने ब्लू आधार कार्ड तयार करू शकता. याआधी ब्लू आधार कार्ड तयार करण्यासाठी जन्म दाखला लागायचा. पण आता जन्म दाखल्याशिवाय ब्लू आधार कार्ड तयार करता येते.

What is blue Aadhaar Card? Blue Aadhaar Card benefits | by PB | Nov, 2023 | Medium

असा करा ऑनलाईन अर्ज
-ब्लू आधार कार्ड तयार करण्यासाठी सर्वात प्रथम युएआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.uidai.gov.in/  भेट द्या
-येथे आधार कार्डचा पर्याय दाखवला जाईल, त्यावर क्लिक करा.
-आता एक नवी विंडो सुरू होईल. येथे मुलाचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी सारखी माहिती द्यावी लागेल.
-मुलाचे जन्म ठिकाण, संपूर्ण पत्ता, जिल्हा, राज्य इत्यादी माहिती द्यावी लागेल.
-अर्ज भरताना तो काळजीपूर्वक भरावा आणि नंतर सबमिट करावा. (Blue Aadhaar Card)

ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर युएआयडीएआयच्या सेंटरला भेट द्यावी लागेल. येथे जाण्यापूर्वी तुम्ही अपॉइटमेंट घेऊ शकता. यासाठी तुम्हाला युएआयडीएआयच्या वेबसाइटवर अपॉइंटमेंटचा ऑप्शन दिसेल. यासाठी कोणताही शुल्क आकारला जात नाही हे नेहमी लक्षात ठेवा.


हेही वाचा- 1 डिसेंबर पासून सिम कार्ड खरेदी-विक्रीचे नवे नियम लागू होणार


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.