साडी म्हणजे आपल्या भारतीय स्त्रियांचे पहिले प्रेम. प्रत्येक भारतीय स्त्रीचा आवडता पोशाख म्हणून साडीला ओळखले जाते. साडीमध्ये स्त्रीचे सौंदर्य काही औरच दिसते. काळानुसार साडी ही देखील बदलत गेली. सुरुवातीला साधी समजली जाणारी साडी आज स्टाईल स्टेटमेंट म्हणून ओळखली जाते. या साडीमध्ये देखील अनेक प्रयोग केले जाऊ लागले किंबहुना केले जातात.
साडी म्हटले की ब्लाऊज आलेच. ब्लाऊजशिवाय साडी नेहमीच अपूर्ण असते. आजच्या काळात तर ब्लाऊजचे डिझाइन, पॅटर्न, स्टाईल इतकी वेगळी आणि आकर्षक आहे की, हे ब्लाऊजच साडीला अधिक सुंदर आणि आकर्षक बनवतात. आजकाल बाजारात ब्लाऊजच्या असंख्य व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात.
कोणत्याही साडीसाठी परफेक्ट ब्लाऊज असणे खूप महत्त्वाचे असते. ब्लाउजचे फॅब्रिक, त्याची डिझाईन्स, त्याचे पॅटर्न आदी अनेक गोष्टी जुळून आल्या की योग्य ब्लाऊज तयार होतो. कधी कधी आवडीच्या नादात आपण चुकीचा ब्लाऊज विकत घेतो किंवा शिवून घेतो. आणि साडी परिधान केल्यावर कळते तो ब्लाऊज सूट होत नाही. त्यामुळे ब्लाऊज घेताना, बनवताना डिझाईन्स बघताना आपल्या शरीराराच्या प्रकारानुसार तो ब्लाऊज शिवणे फार आवश्यक असते.
स्लिम मुलींसाठी ब्लाऊजचे पॅटर्न डिझाइन वेगळ्या असतात आणि हेल्दी मुलींसाठीचे डिझाइन पॅटर्न वेगळे असतात. त्यामुळे आपण जर आपला लूक चांगला दिसावा यासाठी प्रयत्न करत असाल तर योग्य ब्लाऊज निवडणे आवश्यक आहे. आज आपण या लेखातून स्लिम मुलींसाठी चांगल्या दिसणाऱ्या काही ब्लाऊजच्या डिझाइन आणि पॅटर्नबद्दल जाणून घेणार आहोत.
कॉलर नेक ब्लाऊज
स्लिम महिलांवर कॉलर नेक असलेले ब्लाऊज अतिशय स्टाइलिश दिसते. वर्किंग वुमन असलेल्या महिलांना कॉलर नेक डिझाईन्स प्रोफेशनल लूक देतात. हा ब्लाऊज आपल्या खांद्याचा पूर्ण भाग व्यापतो, ज्यामुळे तुमचे खांदे रुंद दिसतात. स्लीव्हलेस कॉलर नेक ब्लाऊज हा पार्टी वेअरसाठी उत्तम पर्याय आहे.
पफ स्लीव्हज ब्लाऊज
सध्या पफ स्लीव्हज खूप ट्रेंडमध्ये आहेत. अनेक सेलिब्रिटींना आपण या ब्लाऊजमध्ये पाहतो. हा पॅटर्न बारीक हातांना स्टायिश लूक देतो. पाहिजे असल्यास क्वार्टर एरियापर्यंत देखील अशा स्लीव्हज ठेऊन ब्लाऊज शिवू शकता येतो. चंदेरी किंवा बनारसी साड्यांवर असे ब्लाउज डिझाईन्स खूप स्टायलिश दिसतात.
बोट नेक ब्लाऊज
आजकाल बोट नेक ब्लाऊज ट्रेंडमध्ये आहेत. बोट नेक ब्लाऊजमुळे खांद्याचा भाग अधिक विस्तृत दिसतो. त्यामुळे बोट नेक ब्लाउजचे डिझाइन चांगले दिसतात. यामध्ये आपले हात बारीक दिसत नाहीत. जर तुम्हाला नवीन डिझाइन वापरायचे असेल तर बोट नेक हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.
हेवी वर्क ब्लाऊज
हेवी वर्क असलेले ब्लाऊज तुम्हाला अधिक आकर्षक दिसतात. या प्रकारचे ब्लाऊज घातल्यामुळे सडपातळ हात मोठे दिसतात. हेवी वर्क असलेले ब्लाऊज पार्टीसाठी उत्तम आणि स्टायलिश पर्याय आहे.
लॉंग स्लीव्ह ब्लाऊज
कॉलर किंवा बोट नेक ब्लाऊज ऐवजी गोल नेक किंवा इतर डिझाईन्स ट्राय करायच्या असतील तर लॉंग स्लीव्ह ब्लाऊज डिझाइन्स ट्राय करू शकता. हे तुमचे बारीक हात झाकण्यास मदत करतील.