Home » मधुमेह असलेल्या रुग्णांच्या ‘या’ चुकांमुळे होते रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाते

मधुमेह असलेल्या रुग्णांच्या ‘या’ चुकांमुळे होते रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाते

by Team Gajawaja
0 comment
Blood Sugar Control
Share

सध्याच्या काळात मधुमेह या आजारामुळे बहुतांश लोक प्रभावित झाले आहेत. जसे लोकांचे दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे. या आजारावर योग्य वेळीच निदान केले नाही तर तो गंभीर असू होऊ शकतो. अशातच तुमच्या आरोग्याला मोठा धोका ही उद्भवतो. तुम्हाला जेव्हा मधुमेह होतो त्यानंतर वेळोवेळी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पहावे लागते. त्याचसोबत तुम्ही कोणती फळं, भाज्या खाल्ल्या पाहिजेत किंवा कोणत्या सवयी सोडल्या पाहिजेत हे सुद्धा डॉक्टरांकडून सांगितले जाते. मात्र काही गोष्टींमुळे इंन्सुलिनचे प्रमाण वाढल्याने समस्या उद्भवू शकते. त्याचसोबत काही लहान-लहान चुकांमुळे सुद्धा तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. ज्या गोष्टींकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. तर जाणून घेऊयात अशी कोणती कारण आहेत ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. (Blood Sugar Control)

वेळेवर नाश्ता करणे
तुम्हाला नाश्त्याकडे लक्ष द्यावे लागते. कारण मधुमेह असलेल्या रुग्णाला वास्तवात नाश्ता म्हणजे फार महत्वाचे भोजन असल्याचे मानले जाते. युएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशन यांच्या मते, जर सकाळी नाश्ता न करता थेट दुपारी जेवल्यास रक्तातील साखर वाढते. त्यामुळे तुम्हाला नेहमीच वेळेवर नाश्ता करणे फार महत्वाचे आहे.

हिरड्यांमध्ये आजार
अमेरिकन डेंटल एसोसिएशनच्या मते, हिरड्यांमध्ये आजार झाल्यास तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. जेव्हा हिरड्यांची समस्या अधिक गंभीर होते तेव्हा पेरियोडोंटाइसट असे त्याला म्हणतात. त्या कारणामुळे दीर्घ काळापर्यंत रक्तातील साखरेच्या स्तराला धोका उद्भवतो. अशातच मधुमेहाच्या रुग्णांनी काळजी घ्यावी.

Blood Sugar Control
Blood Sugar Control

पाण्याची कमतरता
आपल्या शरिरात पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या शरिरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. डिहायड्रेशनच्या कारणास्तव तुम्हाला हाइपरग्लेसेमिया होऊ शकतो. शरिरात पाण्याच्या कमतरतेमुळे काही गोष्टी बिघडतात कारण रक्तातील साखर वाढल्याने वारंवार लघवी येते, त्यामुळेच तुम्हाला डिहाइड्रेशन होते.

रक्तातील साखर नियंत्रणात रहावी म्हणून हे सोप्पे उपाय पहा

योग्य आहार
उच्च ब्लड शुगरला नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार घेण्याची आवश्यक्यता असते. आहारात योग्य प्रकारच्या पदार्थांचे सेवन न केल्यास रक्तातील साखर वाढते. अशातच तुम्ही आहारात फळ आणि भाज्यांचा समावेश करावा. त्याचसोबत ड्राय फ्रुट्सचा सुद्धा वापर केला पाहिजे.

हे देखील वाचा- हिमोफिलिया आजार नक्की काय आहे? जाणून घ्या अधिक

नियमित व्यायाम
नियमित व्यायाम, योगा आणि मेडिटेशन केल्याने तुमचे शरिर आणि मन स्वस्थ राहते. अशातच तुम्ही मानसिक रुपात सुद्धा स्वस्थ राहता. यामुळे सकारात्मकेचा प्रभाव हा ब्लड शुगरवर होतो म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. (Blood Sugar Control)

रुटीन चेकअप
तुम्हाला मधुमेह झाला असेल तर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे ते तपासून पहावे. त्याचसोबत वेळोवेळी डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्याकडून आपल्या चेकअप बद्दलच्या काही गोष्टी समजून घ्याव्यात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.