2025 हे वर्ष अनेक खगोलीय घटनांचे वर्ष आहे. सध्या आकाशात काही ग्रह एकाच रेषेत आलेले दिसत आहेत. ही ग्रहांची परेड बघण्यासाठी खगोलप्रेमींची मोकळ्या मैदानात गर्दी होत आहे. याशिवाय या वर्षात 12 प्रमुख खगोलीय घटना होणार आहेत. त्यात 4 ग्रहणे, 3 सुपरमून आणि चारवेळा ग्रहांची युती होतानाचे विलोभनीय दृष्य बघता येणार आहे. यात शनिग्रह त्याच्या कड्यांशिवाय बघता येणार आहे. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण पुढच्या मार्च महिन्यात येणार असून यावेळी ‘ब्लड मून’ ही असणार आहे. त्यामुळे जगभरातील खगोलप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता असली तरी हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे भारतीय खगोलप्रेमी नाराज आहेत. (Blood Moon)
यावर्षात 12 प्रमुख खगोलीय घटना होणार असल्यामुळे या 2025 वर्षाला खगोलीय घटनांचे वर्ष म्हणण्यात येत आहे. यावर्षी 2 चंद्रग्रहण आणि 2 सूर्यग्रहण होणार आहेत. मात्र भारतातून यातील फक्त एकच ग्रहण दिसणार आहे. 2025 वर्षातील पहिले चंद्रग्रहण 14 मार्चमध्ये होणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. यादरम्यान पृथ्वीची सावली चंद्राला पूर्णपणे झाकून टाकेल. यामुळे चंद्र गडद लाल रंगात दिसेल. या घटनेला ‘ब्लड मून’ म्हणतात. 14 मार्च रोजी होणारे वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतातून बघता येणार नाही. खगोल अभ्यासकांच्या मते हे चंद्रग्रहण सहा तासांपेक्षा जास्त काळ चालेल. या काळात ग्रहण उपछाया, आंशिक आणि पूर्ण ग्रहणाच्या टप्प्यांतून जाईल. उपछाया ग्रहण सकाळी 9.27 वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल. आंशिक ग्रहण सकाळी 10.39 वाजता सुरु होईल. पूर्ण चंद्रग्रहण सकाळी 11.56 मिनिटांनी सुरु होईल. पूर्ण चंद्रग्रहण दुपारी 1.1 वाजता संपणार आहे. आंशिक चंद्रग्रहण दुपारी 2.17 मिनिटांनी संपेल तर उपछाया चंद्रग्रहण दुपारी 3.30 मिनिटांनी संपणार आहे. अर्थात ही भारतीय वेळ असली तरी ग्रहण भारतातून दिसणार नाही. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण युरोपमध्ये दिसणार आहे. (International News)
याशिवाय अन्य खगोलीय घटनाही या वर्षात होणार आहेत. या वर्षात एका ओळीत सात ग्रह दिसणार आहेत. सध्या ही खगोलीय घटना आकाशात सायंकाळनंतर सहजपणे दिसून येत आहे. शनि, बुध, नेपच्यून, शुक्र, युरेनस, गुरू आणि मंगळ हे सात ग्रह आकाशात एका सरळ रेषेत आहेत. ही अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना सध्या लाखो खगोलप्रमी रात्री बघत आहेत. 8 मार्चपर्यंत या अनोख्या घटनचे साक्षीदार होण्याची संधी आहे. एकाच वेळी काही ग्रह एकाच रेषेत असणे असामान्य नाही. परंतु सर्व ग्रह एकाच रेषेत असणे दुर्मिळ घटना असल्याचे खगोलीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. या आश्चर्यकारक खगोलीय घटनेला ग्रह संरेखन असे म्हणतात. यालाच प्लॅनेटरी परेड असेही म्हटले जाते. या परेडमधील शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि हे ग्रह कोणत्याही उपकरणाशिवाय पाहता येत आहेत. तर नेपच्यून आणि युरेनस हे ग्रह दुर्बिणीने बघितल्यावर दिसतात. काही शास्त्रज्ञांच्या मते, ही खगोलीय घटना दर 396 अब्ज वर्षांनी घडत आहे. अर्थात ही घटना अत्यंत दुर्मिळ असून खगोलप्रेमींना रात्री आकाशातील या परेडला नक्की पहावे असे आवाहनच जगभरातील खगोलअभ्यासकांनी केले आहे. (Blood Moon)
==============
हे देखील वाचा : Marie Curie या महान महिलेमुळे कॅन्सरग्रस्तांवर यशस्वी उपचार होत आहेत !
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
या वर्षातले पहिले सूर्यग्रहणही मार्च महिन्यात होणार आहे. 29 मार्च रोजी होणारे हे आंशिक सूर्यग्रहणही भारतातूतन दिसणार नाही. हे ग्रहण उत्तर अमेरिका, ग्रीनलँड, आइसलँड, उत्तर अटलांटिक महासागर, युरोप आणि वायव्य रशियामध्ये दिसणार आहे. 7 सप्टेंबर रोजी दुसरे पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. याशिवाय युरोप, अंटार्क्टिका, पश्चिम प्रशांत महासागर, ऑस्ट्रेलिया आणि हिंद महासागर क्षेत्रातही दिसणार आहे. ही अद्भुत घटना 7 सप्टेंबर रोजी रात्री 8.58 ते पहाटे 2.25 पर्यंत बघता येणार आहे. यातही चंद्र गडद लाल रंगात असणार आहे. 2025 चे शेवटचे आंशिक सूर्यग्रहण हे 21-22 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहणही भारतातून दिसणार नाही. हे आंशिक सूर्यग्रहण मध्ये पाहता येणार आहे. याशिवाय नोव्हेंबर 2025 मध्ये शनि ग्रहाला बघण्याची संधीही खगोलप्रेमींना मिळणार आहे. ही दुर्मिळ घटनाही 15 वर्षानंतर होणार आहे. (International News)
सई बने