Blackhead Remove Remedies : सुंदर दिसण्यासाठी डेली रुटीनमध्ये कितीही ब्युटी ट्रिटमेंट केल्यानंतर स्किन केअर रुटीन फॉलो करणे अत्यावश्यक असते. बदलत्या ब्युटी ट्रेंडनुसार मार्केटमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण सर्वच प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स त्वचेसाठी फायदेशीर ठरतील असे नाही. काही प्रोडक्ट्समुळे त्वचेचे नुकसान देखील होऊ शकते. यामुळेच नाकावर ब्लॅकहेड्सही निर्माण होतात. नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. जेणेकरुन त्वचेला फायदा होईल. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर….
ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा
-बेसन पीठ
-काकडी
बेसनाचे फायदे
बेसनाचे अनेक फायदे त्वचेला होतात. त्वचेवर जमा झालेले टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
-त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून बेसनाचे पीठ फायदेशीर मानले जाते.
-बेसन आपल्या त्वचेला डीप क्लिन करण्यास मदत करते. याशिवाय चेहऱ्यावर पोर्सला डीप क्लिन करण्यासही मदत होते.
काकडीचे फायदे
-काकडीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात, जे त्वचेमध्ये ओलरसपणा तयार करण्यास मदत करतात.
-काकडीत असेही गुण असतात जे त्वचेला डीप क्लिन करण्यास फायदेशीर ठरतात.
-काकडीमध्ये मिनिरल्स आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे पोर्सचा आकार वाढवण्यापासून मदत करतात. (Blackhead Remove Remedies)
अशाप्रकारे करा ब्लॅकहेड्स रिमूव्ह
-नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी सर्वप्रथम काकडी किसून घ्या
-एका वाटीत किसलेली काकडी आणि दोन ते तीन चमचे बेसनाचे पीठ मिक्स करा.
-दोन्ही गोष्टी व्यवस्थितीत मिक्स करुन चेहऱ्यावर लावा.
-हलक्या हाताने स्क्रब चेहऱ्याला मसाज करा.
-जवळजवळ दोन ते तीन मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर स्क्रब लावून ठेवा. यानंतर स्वच्छ पाण्यने धुवा.
-हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यानंतर त्वचेमध्ये काही बदल झालेले दिसून येतील.