Home » Black Turmeric : भारताच्या काळ्या सोन्याला परदेशात मोठी मागणी !

Black Turmeric : भारताच्या काळ्या सोन्याला परदेशात मोठी मागणी !

by Team Gajawaja
0 comment
Black Turmeric
Share

हळद ही भारतीय जेवणातील प्रमुख घटक आहे. हळदीचे औषधी गुणधर्मही अनेक असल्यामुळे भारतीय हळदीला परदेशातही मोठी मागणी आहे. मात्र पिवळ्या रंगाच्या हळदीसोबत भारतात होणारी काळ्या रंगाची हळदीचीही सध्या परदेशी बाजारात चढ्या दरानं विक्री होत आहे. भारतात आसाम, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड या भागात काळ्या हळदीची शेती मोठ्या प्रमाणात होते. ही काळी हळद शेतक-यांसाठी काळ्या सोन्याच्या रुपात फायदा मिळवून देत आहे. यातही मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्यात होणारी काळी हळद सध्या दुबईमध्ये सोन्याच्या भावात विकली जात आहे. याशिवाय आफ्रिका आणि ओमानमध्येही या हळदीला वाढती मागणी आहे.
भारतात तयार होणारी हळद ही जगात सर्वश्रेष्ठ समजली जाते. या हळदीचा औषधी गुणधर्मही मोठा आहे. यासोबत भारतातील काळी हळदही आता लोकप्रिय होत आहे. काळ्या हळदीला मिळणारा चढा भाव आणि त्याच्या लागवडीमध्ये असलेली कमी मेहनत यामुळे भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या काळ्या हळदीच्या लागवडीकडे वळले आहेत. (Black Turmeric)

काळ्या हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याची मागणी औषधी कंपन्यांमध्ये आहे. भारतासह परदेशी औषधी कंपन्यांमध्येही या हळदीला मागणी असल्यामुळे हळदीची शेती कऱणारे शेतकरी खुश आहेत. भारतातील आसाम, बिहार, छत्तीसगड सारख्या राज्यात काळ्या हळदीची शेती करण्याचे प्रमाण वाढले आहे. या हळदीला दुबई, आणि आफ्रिकामध्ये मोठी मागणी आहे. यासोबत मध्य प्रदेशमधील सागरमध्ये गेल्या पाच वर्षापासून काळ्या हळदीच्या शेतीमध्ये वाढ झाली आहे. हे शेतकरी पूर्वी पिवळ्या रंगाची हळद लावत असत. मात्र आता त्यांनी काळ्या हळदीची शेती सुरु केल्यामुळे त्यांना पाचपट अधिक आर्थिक फायदा होत आहे. ही काळी हळद शेतावरच विकली जात आहे. अनेक भारतीय आयुर्वेदिक कंपन्या या हळदीची खरेदी कऱण्यासाठी शेतक-यांच्या शेतापर्यंत पोहचत आहेत. भारतातील मान्यवर आयुर्वेद कंपन्या सागरमध्ये हळदीच्या खरेदीसाठी येतात. (Marathi News)

या शेतक-यांनी काळ्या हळदीचा दर्जा चांगला ठेवला आहे. मातीचा पोतही चांगला असल्यामुळे आणि या शेतीमध्ये कुठल्याही रासायनिक औषधांचा वापर होत नसल्यामुळे आयुर्वेदिक कंपन्या या काळ्या हळदीची खरेदी करण्यासाठी थेट शेतावरच जात आहेत. त्यामुळे शेतक-यांना होणा-या फायद्यात वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षापासून सागरमध्ये मोठ्या प्रमाणात काळी हळद लावली जात आहे. सुरुवातीला ज्या शेतक-यांना प्रती हेक्टर 10 ते 12 क्विंटल काळ्या हळदीचे उत्पादन मिळत होते, त्यांच्या उत्पादनात आता 40 टक्के वाढ झाली आहे. यासाठी शेतक-यांना कृषी विभागातर्फे योग्य मार्गदर्शन करण्यात येत असून शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. या सर्वांमुळे काळी हळद लावणीचा खर्च अत्यल्प येत असला तरी त्यातून मिळणारा आर्थिक फायदा वाढला आहे. काळ्या हळदीची शेती करण्याकडे आता शेतक-यांचा कल वाढला आहे, कारण साधारण नऊ महिन्यात हे पीक तयार होते. तसेच या काळ्या हळदीला कमी पाण्याची गरज असते. त्यामुळे शेतकरी या काळ्या हळदीच्या लावगवडीकडे वळले आहेत. या काळ्या हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारात 5 हजाराहून अधिक प्रति किलोचा भाव मिळत आहे. (Black Turmeric)

ही हळद खरेदी कऱण्यामध्ये औषधी कंपन्यांची अधिक संख्या आहे. कारण यात पिवळ्या हळदीपेक्षा अधिक औषधी गुणधर्म असल्याची माहिती आहे. काळ्या हळदीमध्ये कर्क्यूमिनचे प्रमाण सर्वाधिक असते. शिवाय काळ्या हळदीमध्ये अँथोसायनिनचे प्रमाण जास्त असते, म्हणूनच ही हळद गडद जांभळ्या रंगाची दिसते. आसाम, छत्तीसगड मधील आदिवासी समाजात या काळ्या हळदीचा अधिक वापर होत असे. शक्यतो ही हळद घरगुतीवापरासाठी तयार केली जायची. त्याची विक्री होत नसे. मात्र आता या हळदीला मिळणारा दर पाहून काळी हळद मोठ्या प्रमाणात लावली जात आहे. (Marathi News)

===============

हे देखील वाचा : Taliban : तालिबानने बामियानमधील बुद्धमूर्ती नष्ट का केल्या?

Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !

===============

यापाठोपाठ उत्तराखंडमध्येही काळ्या हळदीच्या शेतीमध्ये वाढ झाली आहे. काळ्या हळदीमध्ये दमाविरोधी, अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटी-कन्व्हल्संट, वेदनाशामक, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-अल्सर असे विशेष गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेदिक कंपन्यांकडून त्याला मोठी मागणी आहे. दुबईमध्ये या काळ्या हळदीचा सौंदर्यप्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तिथून या काळ्या हळदीला मोठी मागणी असल्यामुळे शेतक-यांचे काळ्या हळदीचे उत्पादन शेतावरच विकले जात आहे. (Black Turmeric)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.