Home » भाजपा अध्यात्मिक प्रकोष्ठच्यावतीने सरकारला इशारा – रविंद्र चव्हाण यांची माहिती

भाजपा अध्यात्मिक प्रकोष्ठच्यावतीने सरकारला इशारा – रविंद्र चव्हाण यांची माहिती

by Correspondent
0 comment
Share

भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक प्रकोष्ठच्यावतीने देवालये पूर्ववत देवदर्शनासाठी सुरु करण्यासाठी संघर्ष करणार आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवार २९ ऑगस्ट २०२० रोजी महाराष्ट्रात गावोगावी खेडोपाडी शहरात नगरात जोरदार घंटानाद आंदोलन करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिली.

गुढी पाडवा नववर्ष स्वागत यात्रा नाही…
आम्ही निमूटपणे स्वीकारलं आणि पाडवा घरीच….

रामनवमीला श्रीरामाचे मुखदर्शन नाही….हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या चरणस्पर्शाला पारखे झालो…अंतर राखलं….

माता भगिनींनी वट पौर्णिमेचा व्रत घरातूनच जपलं….
चातुर्मास सुरु झाला….आषाढी एकादशीला आम्ही विठोबाच्या दर्शनाला आतुर झालो…अजून नको…अंतर राखा…म्हणून माऊलीला मनातूनच दंडवत घातला…. गुरुपौर्णिमेला दत्तगुरूंना साष्टांग नमस्कार राहूनच गेला…
पवित्र श्रावण महिना आला….आणि गेला….श्रावणी सोमवारी शिवशंकराच्या पिंडीवर बेलपत्री वाहिलीच नाही….म्हटलं असू दे… दहीहंडीच्या उत्साहाला मुरड घातली….. गणपती बाप्पा आले…आज गौरी पूजनही संपन्न झाले….

राज्य सरकारने आता बास करावे…. भक्तांना देवदर्शनाची आस लागली आहे….लवकरात लवकर देवालय सुरु करा….

लवकरात लवकर देवालय सुरु करावी यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.