Home » जनसंघ ते भाजपची स्थापना, असा आहे पक्षाचा इतिहास

जनसंघ ते भाजपची स्थापना, असा आहे पक्षाचा इतिहास

by Team Gajawaja
0 comment
BJP History
Share

भारताच्या राजकरणात भाजप जगभरातील पॉलिटिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासाचा विषय आहे. चार दशकांमध्ये पक्षाने लोकसेभत २ जागांवरुन ३०३ जागांचा दीर्घ प्रवास केला आहे. अटल-अडवाणी यांची जोडी ते मोदी-शाह यांच्या जोडीपर्यंत, पक्षाने प्रत्येक दक्षकात एक नवी कामगिरी केली. आज ही देशात भाजप आपल्या कामगिरीने प्रत्येक घरात पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तुम्हाला भाजप पक्षाचा इतिहास माहिती आहे का? जनसंघ ते भाजप पक्ष हा प्रवास काही सोप्पा नव्हता त्यामागे काही घटनांचा ही समावेश आहे. त्याच बद्दल आपण जाणून घेऊयात. (BJP History)

भारतीय जनसंघाची स्थापना आणि इतिहास
भारतीय जनसंघाची स्थापना करण्यामागे दोन मुख्य कारणं होती. पहिले कारण म्हणजे महात्मा गांधी यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणे. दुसरे म्हणजे नेहरु-लियाकत करार. दरम्यान, या व्यतिरिक्त ही काही कारणे होती. परंतु ही दोन कारणे मुख्य मानली जातात.

खरंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये खुप दंगली झाल्या. यामध्ये अल्पसंख्यांकावर खुप अत्याचार केले जाऊ लागले. अशातच या दंगली थांबवण्यासाठी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये एक करार झाला. ज्याला नेहरु-लियाकत करार असे म्हटले जाते. या करारात असे म्हटले गेले की, दोन्ही देश आपल्या-आपल्या देशात अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना करतील. त्यावेळी तत्कालीन नेहरु सरकारमध्ये उद्योगमंत्री श्यामा प्रसाद मुखर्जींनी या कराराला मुस्लिम तुष्टिकरण सांगत राजीनामा दिला.

BJP History
BJP History

मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर श्यामा प्रसाद मुखर्जी यानी आरएसएसच्या दुसऱ्या सरसंघचालक माधवरावत गोवळकर यांची भेट घेतली. मानले जाते की, गोवळकर आणि मुखर्जी यांच्या भेटीमुळेच भारतीय जनसंघाचा पाया रचला गेला. मे १९५१ मध्ये भारतीय जनसंघ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि २१ ऑक्टोंबर १९५१ रोजी भारतीय जनसंघाची स्थापना केली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्ज याचे पहिले अध्यक्ष बनले.

भारतीय जनसंघटनेची स्थापना दिल्लीतील एका महाविद्यालयातील एका लहान खोलीत झाली होती. भारतीय जनसंघनाने केशरी रंगाचा झेंडा हा पक्षाचा झेंडा म्हणून स्विकारला. त्यानंतर भारतीय जनसंघाला ‘दीवा’ असे निवडणूक चिन्ह मिळाले.(BJP History)

भारतीय जनसंघाने १९५२ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. यामध्ये एकूण ९४ जागांवर आपले उमेदवार उतरवले. यापैकी केवळ तीन उमेदवार श्यामा प्रसाद मुखर्जी, दुर्गा चरण बनर्जी आणि उमाशंकर त्रिवेदी हे निवडणूक जिंकू शकले. त्यानंतर १९५७ मध्ये लोकसभा निवडणूक भारतीय जनसंघाने ४ जागांवर विजय मिळवला. १९६२ मधील लोकसभा निवडणूकीत १४ जागा तर १९५७ मध्ये ३५ व १९७१ मध्ये २२ जागांवर दणदणीत विजय मिळवला.

१९७५ मध्ये देशाच्या तत्काल पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात एमर्जेंन्सी लागू केली. हा काळ भारतीय जनसंघासाठी टर्निंग पॉइंट होता. त्या स्थितीच्या विरोधात देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्रित झाले आणि सर्वांनी मिळून जनता पक्षाची स्थापना केली. अशा प्रकारे भारतीय जनसंघाचे जनता पक्षात विलय झाले. एमर्जेंन्सीनंतर झालेल्या निवडणूकीत जनता पार्टीने काँग्रेसचा पराभव करत आपले सरकार स्थापन केले. १९८० मध्ये जनता पक्ष फुटला आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या.

जनता पक्ष फुटल्यानंकर समाजवादी नेत्यांनी मिळून लोकदलाची स्थापना केली. दुसऱ्या बाजूला भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले.(BJP History)

पक्षाने आपली पहिली लोकसभा निवडणूक १९८४ मध्ये लढली. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर या निवडणूकीत काँग्रेसला अधिक सहानुभूती मिळू लागली होती. त्यामुळे भाजपला केवळ २ जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर १९८९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला ८५ जागांवर विजय मिळाला. १९९१ मध्ये आपल्या जागांची संख्या वाढवत १२० केली.

हे देखील वाचा- अर्थसंकल्प २०२३: टेक्सपेअर्स ते शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

भारतीय जनता पक्षाला १९९६ च्या लोकसभा निवडणूकीत १६१ जागा मिळाल्या. त्यानंतर १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला १८२.१८२ जागा मिळाल्या. ५ वर्ष केंद्राच्या सत्तेत राहिल्यानंतर भाजपला २००४ च्या लोकसभा निवडणूकीत १३८ जागा मिळाल्या. त्यानंतर २००८ च्या लोकसभा निवडणूकीत ११६, २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागांवर दणदणीत विजय मिळवला. सातत्याने दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताचे सरकार बनले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.