Home » जगातील विचित्र रेस्टॉरंट! जेथे खाल्ल्यानंतर भींत चाटायला लावतात

जगातील विचित्र रेस्टॉरंट! जेथे खाल्ल्यानंतर भींत चाटायला लावतात

by Team Gajawaja
0 comment
Licking the wall
Share

जगातील अशी काही रेस्टॉरंट आहेत जे आपल्या फूड्ससाठी आणि खवय्यांसाठी खुप प्रसिद्ध आहेत. चमचमीत, तोंडाला पाणी सुटेल आणि स्पेशल डिश असे कॉम्बिनेशन असलेल्या रेस्टॉरंटमध्ये कोणाला जायला आवडणार नाही. मात्र असे ही काही रेस्टॉरंट आहेत, जे आपल्या खाण्यासह अन्य काही गोष्टींसाठी नावजलेली आहेत. उदाहरणार्थ, अहमदाबाद मधील नेचर ‘कॉल टॉयलेट कॅफे’ (Nature Call Toilet Cafe). येथे तुम्हाला टॉयलेट सीटवर बसून खायला लावले जाते. हे किती विचित्र आणि किळसवाण असले तरीही लोक तेथील अन्नपदार्थांचा आस्वाद घेताना जरुर दिसून येतात. परंतु तुम्हाला माहित आहे का, जगातील असे एक रेस्टॉरंट आहे जेथे लोकांना खाल्ल्यानंतर भिंत सुद्धा चाटायला लावली जाते. (Licking the wall) हा प्रकार ऐकून थोडे विचित्र वाटेल पण हे सत्य आहे. असे खरंच होते आणि तेथे खाण्यासाठी आलेली लोक हे करतात.

अमेरिकेतील एरिझोना येथील The Mission या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला खाल्ल्यानंतर जीभेने भिंत चाटायला लावली जाते. कारण हे रेस्टॉरंट जेवढे आपल्या अन्नपदार्थांसाठी सर्वोत्कृष्ट आहेच पण त्याहून अधिक भिंत चाटण्याच्या प्रकारामुळे ओळखले जाते. अशातच तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल ना की, येणारी लोक असे नक्की का करत असतील?

हे देखील वाचा- चमचमीत, चटकदार आणि स्वस्तात मस्त अशा मुंबईतील खाऊगल्ल्या

Licking the wall
Licking the wall

खरंतर ती रेस्टॉरंट पिंक हिमालयन सॉल्ट म्हणजे गुलाबी मीठाने तयार करण्यात आली आहे. याच कारणास्तव येथे अन्नपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येणारी लोक एकदा तरी भिंत आपल्या जीभेने चाटून बघतात. WLBT3 यांच्या मते, ही भिंत येथील प्रमुख शेफ यांनी आणली होती. त्यानंतर या कॉन्सेप्टने जगभरातील लोकांना भुरळ घातली. त्यामुळेच द मशीन रेस्टॉरंटमध्ये लोकांची खाण्यासाठी गर्दी असतेच पण जीभेने भींत चाटण्यासाठी सुद्धा ते तितकेच उत्सुक असतात.(Licking the wall)

याबद्दल तुम्हाला आता आणखी एक प्रश्न पडला असेल की, कोरोनासारख्या काळात या रेस्टॉरंटमध्ये लोक जाणे पसंद करणार नाहीत. कारण एकच भिंत ही अनेकांनी चाटली असेल. अशातच या भिंतीमुळे किती आजार होऊ शकतात? यावर रेस्टॉरंटच्या एका स्टाफने उत्तर सुद्धा दिले आहे. त्याने असे म्हटले की, ही भिंती जरी रॉक सॉल्टने तयार केली असली तरीही यामध्ये काही गुणधर्म आहेत जे शरिरासाठी आवश्यक असतात. याच कारणामुळे ती भिंत चाटल्याने कोणीही आजारी तर पडत नाही. परंतु रेस्टॉरंट मधील स्टाफकडून त्याची वेळोवेळी स्वच्छता ठेवली जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.