Home » Bisleri च्या ब्रँन्डचे पाणी कसे झाले लोकप्रिय? वाचा यशाची कहाणी

Bisleri च्या ब्रँन्डचे पाणी कसे झाले लोकप्रिय? वाचा यशाची कहाणी

by Team Gajawaja
0 comment
Bisleri
Share

प्रत्येकालाच माहिती असते प्रत्येक पाण्याची बॉटल ही बिस्लेरी नसते हे आपण नेहमीच आपण ऐकत आलो आहोत. त्यामुळेच आपण बिस्लेरीचे (Bisleri) पाणी सर्वाधिक भरोश्याचे आणि भारतातील सर्वोत्कृष्ट मिनरल वॉटर असल्याचे मानत असल्याने तहान जरी लागली तरी आपण दुकानदाराकडे एक बिस्लेरी द्या असे सहज बोलतो. परंतु तुम्हाला बिस्लेरीच्या ब्रँन्डचे पाणी कसे लोकप्रिय झाले हे तुम्हाला माहिती आहे का? तर पाहूयात बिस्लेरीच्या यशाची कथा नक्की काय आहे.

बिस्लेरीचा इतिहास
बिस्लेरीची स्थापना इटलीतील Suignor Felice Bisleri यांनी केली होती. तर १९६५ मध्ये इटलीतील नोसेरा उम्ब्रा मध्ये त्यांच्या नावाने जन्मलेल्या ब्रँन्डेड पाणी विक्री करण्याचा फॉर्म्युला आपल्या देशात सर्वात प्रथम Felice Bisleri घेऊन आले होते. Suignor Felice Bisleri हे एक व्यापारी इन्वेंटर आमि एक केमेस्टिरी कंपनी होती. तेव्हा बिस्लेरीचे मालक होते डॉ. रोजिज. सुरुवातील ती मलेरियावरील औषध तयार करणारी कंपनी होती. हेच औषध विक्री करण्यासाठी त्यांच्या कंपनीची मुंबईत एक शाखा सुद्धा होती.

भारतात व्यापारवाढ होत असल्याने बिस्लेरीचे मालक रोजिज यांना काहीतरी वेगळे करायचे होते. त्यावेळी मुंबईत मिळणाऱ्या पाण्याची गुणवत्ता ही वाईट होती. तेव्हा रोजिज यांना वाटले की, आपण बिस्लेरीची कॉन्सेप्ट ही भारतात सुरु करुयात आणि हा व्यवसाय भारतात फार यशस्वी होईल. भारतातीलच बिस्लेरी कंपनीचे कायदे सल्लागार असलेले खुसरु संतुक यांच्यासोबत १९६५ मध्ये ठाण्यात बिस्लेरीच्या पाण्याचा पहिला वॉटर प्लांन्ट स्थापन केला.

बिस्लेरिने सुरुवातीला मार्केटमध्ये दोन प्रोडक्ट लॉन्च केले. ते म्हणजे बिस्लेरीचे पाणी आणि दुसरे म्हणजे बिस्लेरी सोडा. हे दोन्ही प्रोडक्ट्स सुरुवातीला मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये मिळायचे. मात्र हळूहळू ते मार्केटमध्ये सुद्धा आले. सुरुवातीला बिस्लेरी ही पाण्यापेक्षा सोड्यामुळे अधिक ओळखली जात होती. त्यामुळे बिस्लेरीचे पाणी अधिकाधिक विक्री करण्यास त्यांना अपयश आले होते. याच कारणामुळे खुसरु संतुक यांना आपले हे ब्रँन्ड्स पुढे चालू ठेवायचे नव्हते.

Bisleri
Bisleri

बिस्लेरीला पार्ले कंपनीने खरेदी केले
बिस्लेरीच्या (Bisleri) पाण्याला मिळालेल्या अपयशानंतर खुसरु संतुक यांनी आपली ही कंपनी विक्री करण्याचे ठरविले. याबद्दलची बातमी प्रथम पार्ले कंपनीचे चौहान ब्रदर यांना मिळाली. अशातच रमेश चौहान यांनी १९६९ मध्ये बिस्लेरी (इंडिया) लिमिडेट रुपात खरेदी केले. बिस्लेरी इंडिया लिमिडेट कंपनी ही पार्लेने ४ लाखांमध्ये खरेदी केली होती. बिस्लेरी खरेदी करण्यामागील रमेश चौहान यांचे उद्देश असा होता की, या ब्रँन्डच्या माध्यमातून त्यांना सोड्याचे उत्पादन करायचे. तेव्हा बिस्लेरीचे देशभरात फक्त ५ दुकान होती. त्यापैकी ४ मुंबईत आणि एक कोलकाता येथे होते. रमेश चौहान यांनी बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्याचे दोन ब्रँन्ड बबली आणि स्टिल सोबत बिस्लेरी सोडा सुद्धा लॉन्च केला होता. पार्ले समूहाने काही वर्षांपर्यंत सोडा आणि पाणी दोन्ही नावांनी बिस्लेरी ब्रँन्डच्या नावाने विक्री केली. पण त्यावेळी सॉफ्ट ड्रिंक्स हे काचेच्या बॉटलमध्ये विक्री केले जायचे आणि पिऊन झाल्यानंतर ती बॉटल परत द्यावी लागायची.

हे देखील वाचा- ‘या’ शहरात माणसांपासून जनावरांपर्यंत सर्वजण आहेत दगडाचे, कहाणी ऐकून व्हाल सुन्न

काही काळाने पार्लेने एक रिसर्च केला आणि त्यांना कळले की. भारतातील सार्वजनिक ठिकाण, रेल्वे स्थानक आणि अन्य ठिकाणी स्वच्छ पाणी मिळत नसल्याने लोक प्लेन सोडा खरेदी करुन पितात. तेव्हा पार्ले कंपनीला वाटले की, या ठिकाणी आपण स्वच्छ पाणी उपलब्ध करुन द्यावे जेणेकरुन लोकांना भासणारी पाण्याची समस्या कमी होईल. अशातच बिस्लेरीच्या पाण्याचा ब्रँन्ड ही अधिक वाढेल. त्या वेळी पार्लेने डिस्ट्रिब्युटर्सची संख्या वाढली आणि त्या ठिकाणांवर पाण्याची सोय करुन दिली. वेळेनुसार ब्रँन्डचे प्रमोशन आणि ब्रँन्डच्या पॅकेजिंगमध्ये नवेनवे बदल करुन मार्केटमध्ये बिस्लेरीच्या पाण्याचा ब्रँन्ड हा अधिक लोकप्रिय झाला.

सन २००० मध्ये मिळाली आव्हानं
बिस्लेरीचे (Bisleri) यश पाहून आणि त्यांच्यापासून प्रेरित होत वर्ष २००० मध्ये बेली, एक्वाफिना आणि किनले सारख्या कंपन्यांनी सुद्धा शुद्ध पाण्याचे दावे केले आणि ते सुद्धा मार्केटमध्ये उतरले. त्यामुळे दुसऱ्या ब्रँन्डकडून दिली जाणारी टक्कर पाहता बिस्लेरीने विविध आकारातील आकर्षक पॅकेजिंग बाजारात उतरवले. तसेच त्यांनी आपल्या जाहिरातींमध्ये सुद्धा बदल केला. अशातच त्यांना ब्रँन्ड अधिक मजबूत झाला. २००३ मध्ये बिस्लेरीने युरोपात सुद्धा आपल्या उद्योगाची घोषणा केली.

आज बिस्लेरीच्या बॉटलबंद पाण्याचा ६० टक्के हिस्सा मार्केटमध्ये भारतात आहे. त्याचसोब त १३५ प्लांन्टच्या जोरावर दोन कोटी लीटरहून अधिक दररोज पाण्याची विक्री करणारा बिस्लेरी ब्रँन्ड हा देशात-विदेशात अधिक लोकप्रिय आहे. तसेच ५ हजारांहून अधिक डिस्ट्रिब्युटर्स आणि ३५०० डिस्ट्रिब्युटर्सच्या माध्यमातून साडे तीन लाख रिटेल आउटलेट्सपर्यंत त्यांचा ब्रँन्ड पोहचवला जातो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.