तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा येत्या ६ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. ते ९० वर्षांचे होणार आहे. त्यांचा जन्म ६ जुलै १९३५ रोजी ईशान्य तिबेटमधील तक्तसेर भागात झाला. दलाई लामा हे त्यांचे नाव नसून, ही एक पदवी आहे. ज्याचा अर्थ होतो ‘ज्ञानाचा महासागर’. दलाई लामा यांचे खरे नाव तेनजीस ग्यात्सो असे आहे. जगभरातील बौद्ध लोकं यांना आपले धर्मगुरू मानतात. तेनजीस हे केवळ दोन वर्षांचे असतानाच त्यांना दलाई लामा ही पदवी देण्याचे मान्य करण्यात आले होते. ते १५ वर्षांचे असताना त्यांनी राजनैतिक जबाबदारी स्वीकारली. (Marathi News)
चीनच्या अखत्यारीत असलेल्या तिबेटला सोडवण्यासाठी वयाच्या १९ व्या वर्षी तेनजीस हे चिनी नेत्यांशी बोलणी करण्यासाठी बिजिंगला गेले होते. दलाई लामांनी चिनी सरकारसोबत चर्चा केली, मात्र चीनने तिबेटच्या बाबतीत कोणतेही सहकार्य केले नाही. त्यानंतर २१ व्या वर्षी तेनजीस अर्थात दलाई लामा हे भारतात आले. २३ व्या वर्षी तेनजीस यांनी तिबेट सोडण्याचा निर्णय घेतला. सैनिकाच्या वेशात ते तिबेटमधून निघाले आणि भारतातील अरुणाचल प्रदेशात आले. त्यांना भारतात येण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी लागला होता. त्यांनी पुढे भारतातच वास्तव्य करणे पसंत केले. असे असले तरी त्यांचा कायम तिबेटी स्वातंत्र्यासाठी लढा सुरूच राहिला. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे तिबेटी समुदाय त्यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करतात. (Top Trending News)
दरम्यान आतापर्यंत १३ दलाई लामा होऊन गेले असून तेनजीस हे सध्याचे चौदावे दलाई लामा आहेत. चीनने तिबेट देशावर केलेल्या विरोधामुळे त्यांनी भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील धरमशाला येथे आश्रय घेतला आहे. गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या विचाराने ते प्रेरित झालेत. दलाई लामा हे संपूर्ण जगभरात फक्त एक धर्मगुरु नाहीत, तर ते एक प्रभावशाली विचारवंत, लेखक आणि जागतिक शांततेचे प्रतीक म्हणूनही ओळखले जातात. दरम्यान दलाई लामा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त कोणालाही माहिती नाही. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया दलाई लामा यांच्या एकूण संपत्तीबद्दल. (Todays Marathi Headline)
एका मोठ्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बौद्ध धर्मगुरु असलेल्या दलाई लामा यांची एकूण संपत्ती तब्बल १५० दशलक्ष डॉलर अर्थात १३०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी दलाई लामा यांची राहणी अतिशय साधी आहे, त्यामुळे त्यांच्या संपत्तीचा अंदाज कोणालाही येत नाही. लामा यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. दलाई लामा हे त्यांची संपत्ती त्यांच्या भाषणातून, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या रॉयल्टीमधून, विविध दान, खाजगी शिक्षणातील पैशांमधून आणि अनेक मार्गातून कमवतात. माहितीनुसार दलाई लामा यांना दिलेल्या सर्व दानाच्या रकमेचा खर्च हा गरजू लोकांच्या भल्यासाठी आणि मुलांच्या शैक्षणिक योजनांसाठी खर्च केला जातो.(Top Stories)
===========
हे ही वाचा :
Wajid Ali Shah : ‘एक कलाप्रेमी राजा : वाजिद अली शाह’, पण या कारणास्तव राहिला चर्चेत
Tara Bhawalkar : मराठी लोकसाहित्य आणि स्त्रीवादी साहित्य क्षेत्रातील संशोधक- डॉ. तारा भवाळकर
===========
यंदाचा दलाई लामा यांचा वाढदिवस खूपच खास असणार आहे. कारण यावर्षी ते ६ जुलै त्यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या दिवशी आपला उत्तराधिकारी जाहीर करणार आहेत. त्यांनी घोषणा केली आहे की त्यांच्यानंतरही तिबेटसाठी लढा देणारी संस्था चालूच ठेवणार आहे. त्यामुळे दलाई लामा यांच्यानंतरही हा लढा चालूच राहणार आहे. त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे चीनसह अनेक बौद्ध राष्ट्रांचेही लक्ष लागले आहे. दरम्यान दलाई लामा हे मागील सहा दशकांपासून भारतात राहत आहेत. ते स्वतःला भारताचे पुत्र मानतात.(Social News)