संपूर्ण जगामध्ये भारतीय लष्कर हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आणि शक्तिशाली समजले जाते. भारतीय लष्कराची स्थापना १८९५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेन्सी सैन्याच्या बरोबरीने भारतीय सैन्याची स्थापना करण्यात आली. पुढे १९४७ मध्ये जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याचे भारतीय लष्करामध्ये विलीनकऱण करण्यात आले. भारतीय लष्कराला (Indian Army) फार मोठा इतिहास आहे. (Indian Amry)
‘सेवा परमो धर्म:’ हे ब्रीदवाक्य सार्थ करणारे भारतीय लष्कर नेहमीच आपल्या मोठ्या पराक्रमासाठी आणि आपल्या शौर्यासाठी चर्चेत असते. आपल्या भारत मातेचे रक्षण करताना प्रत्येक वीर जवान जीवर उदार होऊन सर्वात पुढे उभा असतो. भारताच्या इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला भारतीय जवानांचे आणि त्यांच्या बलिदानाचे अनेक क्षण दिसतील. या भारतीय लष्करामध्ये आजपर्यंत अनेक असे शूर, सन्माननीय वीर होऊन गेले ज्यांच्या पराक्रमाच्या कथा आजही गाजतात आणि येणाऱ्या पिढीला प्रेरणा देतात. (Marathi News)
असे एका होते ज्यांनी त्यांच्या पराक्रमामुळे मोठी प्रसिद्धी मिळवली आणि भारतीय लष्करामध्ये आपले नाव आणि शौर्य सुवर्ण अक्षरांनी कोरले. आम्ही बोलत आहोत, स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा (K. M. Cariappa) यांच्याबद्दल. करिअप्पा यांनी आपल्या कार्याने स्वतःचे नाव भारतीय लष्करात अजरामर केले आहे. त्यांच्या नावाशिवाय कधीच भारतीय लष्कराचा इतिहास पूर्ण होणार नाही. (K. M. Cariappa)
आज २८ जानेवारी रोजी स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांची १२६ वी जयंती आहे. त्यानी त्यांच्या आयुष्यात देशाच्या संरक्षणासाठी अनेकदा प्राणाची बाजी लावली. त्यांचे कार्य इतके महान होते की, त्यांच्या शौर्याला सलाम म्हणून दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अशा या साहसी भारतीय लष्करप्रमुखाचा जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया करिअप्पा यांच्या शौर्याबद्दल आणि त्यांच्या आयुष्याबद्दल. (KM Cariappa Birth Anniversary)
करिअप्पा यांचा जन्म २८ जानेवारी १८९९ रोजी कर्नाटकातील मरकारा (कूर्ग) येथे झाला. 1917 मध्ये मडिकेरी येथील सेंट्रल हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये घेतले. सुरुवातीपासूनच करिअप्पा यांचा कल देश सेवेकडे होता. क्वेटा येथील स्टाफ कॉलेजमध्ये प्रवेश मिळविणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते. ते कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना समजले की, भारतीय लोकांना सेनामध्ये भरती केले जात असून, त्यांना भारतातच प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना देखील देश सेवा करायची होती म्हणून त्यांनी विलंब न करत लगेच अर्ज केला. करिअप्पा यांची निवड झाली आणि इंदोरमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरु झाले. पुढे त्यांनी कॉलेजमध्ये सातवा क्रमांक पटकावत पदवी संपादन केली. (Todays Marathi News)
पुढे करिअप्पा यांची ब्रिटिश लष्करामध्ये भरती करण्यात आली. या लष्करामध्ये त्यांनी अनेकविध पदांवर काम केले. दुसऱ्या महायुद्धात इराक, सिरिया आणि इराण (१९४१-४२), तसेच ब्रह्मदेशातील आराकान (१९४३-४४) येथील लष्करी मोहिमांत ते सहभागी होते. १९४७ साली लंडनच्या इंपीरियल डिफेन्स कॉलेजमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले. स्वंतत्र भारतात सेनाप्रमुख म्हणून १९४९–५३ या काळात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. १९४७ मध्ये यूनाइटेड किंगडमच्या इंपिरियल डिफेंस कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी जाणारे ते पहिले भारतीय ठरले.
१९५३ मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यानंतर करिअप्पा यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले. १९५६ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. १९५१मध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपति हॅरी ट्रूमैन यांनी ‘ऑर्डर ऑफ द चीफ कमांडर ऑफ द लीजन ऑफ मेरिट‘ने के. एम. करिअप्पा यांना सम्मानित केले होते. १९८३मध्ये करिअप्पा यांना भारतीय लष्करातील फील्ड मार्शल हा सन्मान देऊन गौरविण्यात आले होते.
करिअप्पा यांचे सुपूत्र यांचे सुपूत्र के सी करिअप्पा यांनी त्यांच्या पुस्तकात काही गोष्टी लिहील्या आहेत. त्या पैकीच एक म्हणजे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांना करिअप्पा हे त्यांना सत्तेपासून दूर करतील अशी भिती वाटत होती. त्यामुळं १९५३मध्ये नेहरूंनी करिअप्पा यांची ऑस्ट्रेलियाच्या उच्च आयुक्त पदी नियुक्ती केली.
१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या शेवटच्या दिवशी, फील्ड मार्शल करिअप्पा यांचा मुलगा स्क्वॉड्रन लीडर के सी करिअप्पा हे ए एस सहगल आणि कुक्के सुरेश यांच्यासह, पाकिस्तानी स्थानांवर हवाई बॉम्बहल्ला करण्यासाठी गेले होते. पाकिस्तानने विमानावर विमानविरोधी तोफांनी हल्ला केला. स्क्वॉड्रन लीडर करिअप्पा हे तरीही शत्रूच्या ठिकाणांवर हल्ले करत राहिले. मात्र त्यांच्या विमानाला देखील गोळ्या लागल्या आणि ते पाकिस्तानी हद्दीत पडले. पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले.
सांगितले जाते की के सी करिअप्पा यांनी स्वतःचे नाव आणि पद पाकिस्तानी सैन्याला सांगितले होते. मात्र त्यांनी त्यांच्या वडिलांचा उल्लेख केला नाही. असे असूनही, जेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयुब खान चौ यांना त्यांच्या वडिलांबद्दल कळले तेव्हा त्यांनी रेडिओवर घोषणा केली की के एम करिअप्पा यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. जर त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या मुलाला सोडता येईल.
================
हे देखील वाचा : Prayagraj : मस्क्युलर बाबा आणि एमटेक बाबा
Saif Ali Khan : पतौडी कुटुंबाचा शेवटचा नवाब
===============
यावर, फील्ड मार्शल करिअप्पा यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात उत्तर पाठवले होते. त्यांनी त्यांच्या मुलाला इतर युद्धकैद्यांप्रमाणेच वागवण्याची विनंती करत म्हटले होते की, “माझा मुलगा हा आता माझा नाही तर तो या देशाचा मुलगा आहे, जर तुम्हाला त्याला सोडायचे असेल तर सर्व युद्धकैद्यांना सोडावे लागेल.” पुढे काही दिवसांनी, के सी करिअप्पा यांच्यासह इतर युद्धकैद्यांनाही सोडण्यात आले होते.
भारतीय सेना दिन
ब्रिटिशांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतरही १४ जानेवारी १९४९ पर्यंत भारतीय लष्कराची कमान ही ब्रिटिश कमांडर जनरल रॉय फ्रान्सिस बुचर यांच्याकडे होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देखील भारतीय लष्कराचे अध्यक्ष हे ब्रिटीश वंशाचेच होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची संपूर्ण सत्ता भारतीयांच्या हाती सोपवण्याची वेळ आली. तेव्हा १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती. याच दिवशी फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा हे भारतीय लष्कराचे पहिले भारतीय जनलर झाले. तेव्हापासून १५ जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस (Indian Army Day) म्हणून साजरा करण्यात येतो. भारत सरकारने 1986 मध्ये करिअप्पा यांना फील्ड मार्शलचा दर्जा बहाल केला. के. एम. करिअप्पा यांचे 15 मे 1993 रोजी बंगळुरू येथे निधन झाले.