Home » Birmingham City : राजाचा नाही तर कच-याचा देश !

Birmingham City : राजाचा नाही तर कच-याचा देश !

by Team Gajawaja
0 comment
Birmingham City
Share

राजाचा देश म्हणून ओळखल्या जाणा-या ब्रिटनच्या मुख्य शहरात सध्या सगळीकडेच कच-याचे राज्य पसरले आहे. कारण गेल्या दोन महिन्यापासून येथील सफाई कर्मचारी संपावर आहेत. सफाई कर्मचा-यांसोबत केटरिंग विभागात काम करणा-या कर्माचा-यांनीही संप पुकारल्यामुळे ब्रिटनच्या प्रमुख शहरातील रस्त्यांवरही आता कच-याचे ढीग दिसू लागले आहेत. कच-याची दुर्गंधीही येऊ लागल्यानं रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहेत. 14 फेब्रुवारी 2025 पासून सफाई आणि केटरिंग विभागातील कर्मचारी वेतन आणि अन्य मागण्यावरुन संपावर आहेत. या मागण्यांवर अजूनही सररकारनं गांभीर्यांनं चर्चा केली नसल्याचा आरोप या कर्मचा-यांतर्फे कऱण्यात येत असून संप अधिक दिवस चालण्याची शक्यता आहे. (Birmingham City)

ब्रिटनच्या शहरांमधील प्रमुख शहर असलेल्या बर्मिंगहॅम शहरात 17 हजार टन कचरा रस्त्यावर पडला आहे. या शहरात कुठेही गेल्यास कच-याच्या काळ्या पिशव्या पडलेल्या दिसत आहेत. या पिशव्या गेल्या महिनाभरापासून अधिक कालावधीपासून येथेच पडून असल्यानं आता त्यापासून दुर्गंधी येऊ लागली आहे. आता या कच-याच्या ढिगावर उंदीरही फिरू लागल्यानं या भागात रोगराई पसरण्याची भीती आहे. मुख्यतः या भागात येणा-या पर्यटकांना याचा मोठा त्रास होत आहे. एरवी स्वच्छ आणि सुंदर देश म्हणून ओळखल्या जाणा-या देशात असा रस्त्यावर पडलेला कचरा पाहून पर्यटक त्रस्त झाले आहेत. महापालिका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या पगार वाढीच्या संघर्षावरुन अवघं शहरच कचराकुंडी झाल्यासारखे झाले आहे. (International News)

बर्मिंगहॅम हे ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. एक प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र म्हणून या शहराकडे बघितले जाते. याशिवाय या शहरामध्ये अनेक थिएटर, संगीत केंद्र, संग्रहालये आणि कलादालनं आहेत. ते बघण्यासाठी जगभरातील पर्यटक या शहरात येतात. या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे, येथील मोठ्या बागा. बर्मिंगहॅम शहराच्या जवळपास 8000 एकर क्षेत्रावर उद्याने आहेत. त्यामुळेच बर्मिंगहॅम हे ब्रिटनमधील सर्वात हिरवेगार शहरांपैकी एक शहर असल्याचे सांगितले जाते. येथील सटन पार्क तर युरोपमधील सर्वात मोठ्या उद्यानांपैकी एक आहे. यामुळे या भागात येणा-या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र आता या सुंदर आणि हिरवाईनं नटलेल्या शहराला कच-याचा विळखा पडला आहे. (Birmingham City)

याच बर्मिंगहॅम शहरात 17 हजार टन साठला आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जवळपास महिनाभर हा कचरा साठत असल्यानं त्याच्यापासून आता दुर्गंधी सुटली आहे. या कच-यावर उंदीर आणि झुरळे दिसू लागली आहेत. महापालिका कर्मचा-यांच्या संपाबाबत वरिष्ठांना महिना उलटूनही मार्ग काढता न आल्यानं, आहे त्या परिस्थितीत अधिक भर पडणार आहे. सध्या या शहराच्या सर्वच रस्तांच्यामध्ये कचरा भरलेल्या मोठ्या काळ्या पिशव्या पडल्या आहेत. तसेच शहरातील शाळा, इमारती आणि बागांच्या बाजुलाही या कच-याच्या पिशव्या दिसू लागल्या आहेत. यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना या कच-याच्या दुर्गंधीचा त्रास होत आहे. त्यातच या कच-यावर फिरणारे उंदीर चावण्याची भीती आता रस्त्यावर चालणा-या नागरिकांना वाटू लागली आहे. महापालिकेचे 350 कर्मचारी महिनाभरापासून संपावर असल्यानं शहराची स्वच्छता मोहीम बंदच झाली आहे. (International News)

=========

हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये

America Rules : अमेरिकेनं नागरिकांनी चिनी नागरिकांच्या प्रेमात पडू नका !

==========

ब्रिटीश संसदेही हा मुद्दा मांडला गेला असला तरी त्यावर अद्याप उपाय शोधण्यात आलेला नाही. यामुळे बर्मिंगहॅम शहरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. महापालिका कर्मचा-यांचा हा वाद डिसेंबर 2024 पासून सुरु आहे. कचरा गोळा करणाऱ्या कर्मचा-यांच्या वेतनात कपात करण्यात आली शिवाय ओव्हरटाईमवर बंदी घालण्यात आल्यानं त्यांच्यामध्ये नाराजी पसरली. महानगरपालिकेकडे या कर्मचा-यांनी पगारवाढीची मागणी केली, पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं या कर्मचा-यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. बर्मिंगहॅम कौन्सिल, कर्मचा-यांची पदावनती आणि वेतन कपातीच्या योजना अंमलात आणण्यावर ठाम आहे. त्यांनी संप सुरु झाल्यापासून शहरातील कचरा गोळा करण्यासाठी कंत्राटी कामगारांना नियुक्त केले आहे, परंतु या कंत्राटी कर्मचा-यांना काम करण्यापासून रोखण्यात येत आहे. त्यामुळेच अवघं बर्मिंगहॅम शहर कच-याच्या ढिगात रुपांतरीत झाले आहे. (Birmingham City)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.