जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्याला कळत नाही आपल्या आजूबाजूला नेमक्या कोणत्या गोष्टी घडतायत. कारण त्यावेळी आपण आरामात झोपलेलो असतो. याउलट जर तुम्हाला झोपायला नीट जागा नसेल तर तुमची झोप पूर्ण होईल का? तुम्ही सारखी चिडचिड कराल आणि झोप पूर्ण न झाल्याने तुमचे डोके दुखायला लागेल. हे झाले माणसांबद्दल पण पक्षी रात्रीच्या वेळेस कसे झोपत असतील याचा विचार केलाय का? कारण काही पक्षी हे उभ्या उभ्या झोपतात तेव्हा ते झाडांच्या फांदीचा आधार घेतात. मात्र तेव्हा ते खाली का नाही पडत असा प्रश्न कधी तुमच्या मनात उपस्थितीत झालायं का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेतच पण त्यामागील विज्ञान काय सांगते ते सुद्धा आपण पाहूयात.(Birds science hack)
रात्रीच्या वेळेस जेव्हा एखादा पक्षी उभ्या उभ्या झाडाच्या फांदीचा आधार घेत झोपतो तेव्हा तो खाली का नाही पडत असेल? त्यांचे फांदीवर झोपेत सुद्धा संतुलन कसे राखले जाते? हे सर्व समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रथम पक्षी कसे झोपतात त्याबद्दल जाणून घ्यावे लागेल. कारण माणसं ज्या प्रकारे झोपतात त्या पद्धतीने पक्षी कधीच झोपत नाहीत. ऐवढेच नव्हे तर ते आपल्यासारखे दीर्घकाळ झोपत नाहीत.
हे देखील वाचा- जेव्हा लोकांनी Egyptian Mummies खायला सुरुवात केली, नेमके काय घडले असेल?
पक्षी आपली झोप कधीच पूर्णवेळ घेत नाहीत. ते झोपेमध्ये असताना कधी कधी उठतात. याउलट आपण माणसं जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही. यादरम्यान आपल्याला काही स्वप्न ही पडतात. ते काही मिनिटांसाठी का होईना. मात्र पक्ष्यांचे असे नसते. ते आपल्यासारखे दीर्घकाळ झोपू शकत नाहीत. मजेशीर गोष्ट अशी की, चिमणी ही एक डोळा उघडा ठेवून झोपू शकतो. ती आपल्या मेंदूला अशा प्रकारचे कंट्रोल करते की, झोपेदरम्यान तिच्या मेंदूचा एक भाग हा नेहमीच अॅक्टिव्ह राहिल. ज्या बाजूचा मेंदूचा भाग अॅक्टिव्ह असेल त्याचा विरुद्ध भागाकडील तिचा डोळा ती उघडा ठेवते. म्हणून एक डोळ्याने पहायचे आणि दुसऱ्या बाजूने आपला मेंदू अॅक्टिव्ह ठेवायचा.(Birds science hack)
झोपेच्या अशा प्रकारच्या क्षमतेमुळे चिमणी झोपेच्या वेळी सुद्धा स्वत: चे एखाद्या धोक्यापासून बचाव करु शकते. झोपेवेळी झाडाच्या फांदीवरु खाली न पडण्यामागील एक कारण असे की, त्यांच्या मेंदूचा एक भाग अॅक्टिव्ह असतोच. पण दुसरे कारण असे आहे त्यांच्या पायांची घट्ट पकड. त्यांच्या पायांमध्ये ऐवढी ताकद असते की ते झाडाची फांदी घट्टपणे पकडून ठेवून उभ्या उभ्या झोपू शकतात. याच कारणामुळे ते रात्री झोपताना झाडावरुन खाली पडत नाहीत.